Tiatr competition
Tiatr competition  Gomantak Digital Team
ब्लॉग

Blog : तियात्र सादरीकरण झाले महाग

गोमन्तक डिजिटल टीम

सुशांत कुंकळयेकर

गोव्‍यात ‘तियात्र’ जरी लोकप्रिय असला तरी व्‍यावसायिकदृष्‍ट्या त्‍याचे प्रयोग सादर करणे तियात्र निर्मात्यांच्या हाताबाहेर जाऊ लागले आहे. पूर्वी एका प्रयोगाचा खर्च ३० ते ३५ हजार रुपये असायचा. आता तो खर्च ६० ते ७० हजार दरम्‍यान पोहोचला आहे. पावसाच्या मोसमात गावात होणारे सर्व प्रयोग सध्‍या बंद झाले असून फक्‍त थिएटर्समध्‍ये चालू असलेल्‍या शोवरच तियात्रिस्‍त आपली गुजराण करत आहेत.

ओल्गा

हॉलचे भाडे, तियात्रिस्‍तांचा खर्च, वाहतूकीचा खर्च, बँड अाणि जाहिरात यांचा एकत्रित खर्च पाहिल्‍यास एका प्रयोगासाठी किमान ७० हजार रुपये खर्च करावे लागतात. त्‍यामुळे प्रयोग हाऊसफुल झाला नाही तर तियात्र निर्माता नुकसानीत जाऊ शकतो अशी माहिती तियात्र निर्माते व दिग्‍दर्शक सॅमी तावारिस यांनी दिली.

‘चांगले अभिनय करणारे कलाकार, चांगले कॉमेडियन आणि चांगले कांतोरिस्‍त (गायक) असल्‍याशिवाय प्रेक्षक तियात्राला येत नाहीत आणि हे लोकप्रिय कलाकार प्रत्‍येक प्रयोगाचे किमान 3000 रुपये मानधन घेतात. त्‍याशिवाय इतर कलाकारांचेही मानधन असते. सुरुवातीच्‍या काही प्रयोगांतून जो गल्‍ला जमा होतो त्‍यावरच बाकीचे प्रयोग किती होणार हे ठरलेले असते.’ असे तावारिस यांनी सांगितले.

प्रिन्स जेकब

सध्‍या सर्वात अधिक मानधन घेणार्‍या गायकांमध्‍ये फ्रान्‍सिस द तुये, सॅबी द दिवार, लाॅरी त्रावासो, पॉलिटिकल सिंगर म्‍हणून प्रसिद्ध असलेल्‍या ओल्‍गा तसेच रोझफन्‍स यांचा क्रमांक लागतो. तर काॅमेडियनमध्‍ये प्रिन्‍स जॅकब, सॅली, जॉन डिसिल्‍वा, हम्‍बर्ट यांचा समावेश होताे. त्‍याशिवाय उल्‍हास तारी, मार्कूस वाझ या कलाकारांनाही मागणी असून अनेक तियात्रात यांचा समावेश असतो.

तियात्र सादर करणे आता महाग झाल्‍याने कित्‍येकवेळा कुणातरी स्‍पॉन्‍सररला हाताशी धरुन तियात्र सादर करावे लागतात अशी माहिती तियात्र क्षेत्राशी संबंधित असलेले तियोतिन डिकॉस्‍ता यांनी दिली. विदेेशात तियात्र घेऊन जाण्‍यासाठीही असेच स्‍पॉन्‍सरर मिळविले जातात आणि त्‍यात अधिक करून राजकारण्‍यांचा समावेश असतो असे त्यांनी सांगितले.

फ्रान्सिस दि तुयें

तियात्र महाग पण तिकीटांचा दर कमीच

तियात्र सादर करणे जरी महाग झाले असले तरी लोक तियात्रांपासून दूर जाऊ नयेत यासाठी तिकिटांचे दर कमीच ठेवले जातात अशी माहिती हौशी तियात्र कलाकार मार्कुस गोन्‍साल्‍वीस यांनी दिली. मडगाव रवीन्‍द्र भवनमध्‍ये तियात्र शो असल्‍यास पूर्वी १०० रुपये हा तिकिटाचा दर होता. आता त्‍यात वाढ करुन तो १५० रुपये करण्‍यात आला आहे. व्‍यावसायिक मराठी नाटकांच्‍या तिकिटांच्‍या तुलनेत हा दर निम्‍माही नाही असे त्‍यांनी सांगितले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

घोडगावयलो

उत्क्रांतीचे झाड

Chhatrapati Shahu Maharaj : छत्रपती शाहू महाराजांचे पुण्यस्मरण

Hit & Run Case : घाेगळ येथे ‘हिट अँड रन’ प्रकरणात पत्रकार जखमी

Garbage Project : वेर्णा येथील कचरा प्रकल्पाला विरोध

SCROLL FOR NEXT