Margao Dainik Gomantak
ब्लॉग

...आणि राशोल ओसाड पडले

गोमन्तक डिजिटल टीम

वाल्मिकी फालेरो

Margao मठग्राम हा एक स्वयंपूर्ण गाव होता, हे आपण गेल्या भागात पाहिले. मठग्राममधील मध्यवर्ती चौकाच्या तिन्ही बाजूंची घरे (पश्चिमेकडील बाजूस मांड, गावकरी व बाजार होते) आजच्या घरांच्या तुलनेत लहान होती.

प्रत्येक घराची रुंदी सुमारे पाच मीटर असेल (किंवा एखाद्याकडे एकापेक्षा जास्त गावकरी घर वाटप केले असल्यास किंवा घर विस्तारित कुटुंबामध्ये विभागले असल्यास त्याचे अंश असतील). हे असे अनुमान आपण दोन निरीक्षणांवरून काढू शकतो.

एक म्हणजे २०व्या शतकाच्या सुरुवातीला बुबोनिक प्लेग नियंत्रण उपाय म्हणून पाडलेल्या घरांची रुंदी आणि दुसरे म्हणजे अस्तित्वात असलेल्या काही घरांच्या एकत्रीकरणाचा आणि विभाजनाचा ज्ञात इतिहास. ही दोन्ही निरीक्षणे आपणास जवळजवळ एकाच निष्कर्षाकडे घेऊन जातात.

त्या नंतरची चौकातील घरे एकमेकांना खेटून आहेत. अनेक घरे समान भिंतींनी विभक्त केल्याने त्यांचे छप्पर एका घरातून दुसऱ्या घरापर्यंत विस्तारलेले आढळते.

याला समाजातील एकतेचे प्रतीकात्मक प्रतिबिंब म्हणा (किंवा त्याऐवजी, एकीचे बळ सांगणाऱ्या ‘एकत्र राहिल्यास कुठल्याही संकटांचा सामना करू, विभक्त झाल्यस संपून जाऊ’ या उक्तीप्रमाणे असेल) आच्छादित छप्परांनी घरांच्या सर्व-महत्त्वाच्या बाह्य भिंती झाकल्या आहेत, आणि भिंती मातीच्या बनवल्या गेल्या आहेत.

पावसाचे पाणी साचले तर एकाची नाही तर आजूबाजूच्या घरांची पडझड ठरलेली! पोर्तुगीजपूर्व काळात या चौकात कोणतेही मजली घर अस्तित्वात असल्याची माहिती नाही.

जुन्या घरातील राजांगणे नैसर्गिक प्रकाश आणि हवा आतील भागांत खेळती ठेवतात. रुआ द नॉर्ते (सध्याचा मॉन्स. गंगानेल्ली रेबेलो रोड) बाजूच्या घरांमध्ये, अंतर्गत अंगणातील पावसाळ्याचे पाणी भूमिगत गटाराच्या सहाय्याने घराच्या राहत्या भागाच्या खाली वाहून उत्तरेकडे नाल्यात सोडले जात असे.

नाले अडथळेमुक्त असल्याची खात्री करण्यासाठी नियमित अंतरावर तपासणी चेंबर्स असत. पिण्याच्या पाण्याच्या विहिरी एका व्यवस्थित व सरळ रेषेत आहेत, (आज पाहण्यायोग्य, गूगल अर्थचे आभार) ज्या या परिसरातील जवळपास सरळ रेषेत असलेला भूजल प्रवाह अधोरेखित करतात.

मठग्रामचा मध्यवर्ती चौक कसा दिसत असेल याचे अंदाजे चित्र चितारण्यासाठी अद्याप टिकून असलेल्या दुर्मीळ व जुन्या घरांचे निरीक्षण करणे आवश्यक आहे.

... डायस यांचे घर त्याच्या कमी-स्लंग छतासह स्क्वेअरच्या उभ्या स्केलला सूचित करते, तर ग्रेशियास-फ्लोर घर आणि त्याच्या शेजारील पाशेको यांच्या घराचे दोन भाग, शेजारच्या घरांची छत एकमेकांमध्ये कशी अखंडपणे विलीन होते हे आजही दाखवतात.

मध्यभागी मंदिर असल्याचे जमेस धरून(आजच्या चर्चच्या उंचीचा काही भाग), कोणीही पूर्वीच्या चौकाचे चित्र काढू शकतो.

मठग्रामचे मूळ रहिवासी असलेले मठग्रामस्थ पूर्वीच्या मंदिराच्या चौकात लहान, कमी छताच्या एकमेकांना खेटून उभ्या असलेल्या व आतून एका घरातून दुसऱ्या घरात जाण्याची सोय असलेल्या घरांमध्ये राहत होते.

येथील कमी जागेत कदाचित खूप लोकवस्ती दाटीवाटीने राहत असावी. याच कारणास्तव सासष्टीकरांनी त्यांना ‘उंदीर’ हे टोपणनाव दिले. (सासष्टीतील जवळपास वीस गावांना अशी टोपणनावे दिली गेली होती.

यात कॅसॅनोव्हापासून ते भित्रे, वाघ ते कासव आणि गुन्हेगार ते चोर अशा नावांचाही समावेश होता! सत्तरपेक्षा काही अधिक व्यक्ती आणि कुटुंबांची टोपणनावे आपण बारकाईने तपासली तर एक गोष्ट सहज लक्षात येते की, यांपैकी बहुतेक टोपणनावे खुशामत करणारी नाहीत.

काही टोपणनावे इतकी आक्षेपार्ह आहेत की, या लेखात त्यांचा उल्लेख करणेही जिवावर येते. असे असूनही ही टोपणनावे पूर्वीच्या काळात सर्वतोमुखी प्रचलित होती आणि आता ती कुणाच्या फारशी लक्षांतही नाहीत.

असली तरी कुणी उल्लेख करायला जात नाही.) गंमत म्हणजे, उंदरांनी नंतर मडगावला तत्कालीन प्राणघातक बुबोनिक प्लेगचे वाहक बनून पछाडले(अगदी भुतांपेक्षाही जास्त!).

16 व्या शतकाच्या उत्तरार्धात बहुसंख्य लोक ख्रिस्तीकरण्याच्या छळापासून वाचण्यासाठी पळून गेल्यानंतर हे सर्व चित्र बदलले. हे त्यांचे पळून जाणे एकाच वेळी व एकदम झाले नाही. ख्रिश्‍चन होण्यास नकार देणाऱ्या मूळ रहिवाशांनी तेथून निघून जावे, असे आदेश निघून जाण्यास फारच कमी वेळ देऊन वारंवार जारी केले गेले.

घरे आणि मालमत्ता एकतर सोडून दिली गेली असावी किंवा संकटात विकली गेली असावी. ख्रिश्‍चन झालेल्या मोजक्या लोकांशिवाय मडगावचे जवळजवळ संपूर्ण मूळ गावकर असलेले लोक गाव सोडून गेले. मठग्रामला मरणकळा प्राप्त झाली(१९व्या शतकात घोडे आणि हेगडे ही दोनच मूळ गावकर कुटुंबे परत आली).

विशेष म्हणजे, मठग्रामच्या पुनर्जन्म हा हिंदू मान्यतेनुसार मोक्ष मिळेपर्यंत चालणाऱ्या जन्म-मृत्यू-पुनर्जन्म या चक्रासारखा झाला. निर्वाणानंतरही ख्रिस्ताचे पुनर्जीवित होण्यासारखाही आपण म्हणू शकतो.

आश्‍चर्याची गोष्ट म्हणजे मडगावची चर्च पुनर्जीवित झालेल्या ख्रिस्ताला समर्पित आहे. मडगावच्या नशिबी मुक्ती नाही. अलीकडच्या काही दशकांत मडगाव, वाहतूक कोंडी, गर्दी आणि गुन्हेगारीचे माहेरघर म्हणून झालेल्या नावलौकिकापासून मुक्ती मिळवू शकलेले नाही. यानंतर ५० वर्षांनी मडगावची स्थिती कशी असेल, याची कल्पनाही करवत नाही.

मठग्रामचे मडगाव होण्याच्या प्रवासातील अनेक स्थित्यंतरे सध्याच्या चर्च स्क्वेअरने पाहिली आहेत. केवळ हा आनंदाचा चौक असलेला चर्च स्क्वेअरच नव्हे तर आज चौकाच्या सीमेवर असलेली घरेही याची मूक साक्षीदार आहेत.

१८व्या शतकाच्या मधल्या कालखंडात राशोलमधून मोठ्या प्रमाणात स्थलांतर झाले, जरी तिथल्या कुटुंबांनी (विशेषतः कुलासोे कुळातील) घरे, जमिनी आणि गणवकरी हितसंबंध खरेदी केले होते, परंतु राशोलमध्ये राहणे सुरूच ठेवले होते. एका अनपेक्षित घटनेने सासष्टीतील त्यांचे एकेकाळचे आश्रयस्थान उद्ध्वस्त केले.

पेद्रो मिंगेल द आल्मेदा पोर्तुगाल ई वास्कोन्सेलॉस, मार्कुस डी कॅस्टेलो नोवो आणि नंतर मार्कुस द अलोर्ना पहिला यांनी उत्तरेकडील भोसलेंना वश करून जुन्या काबिजादीसह पूर्वेला सुपा आणि दक्षिणेला अंकोल्यापर्यंतचा प्रदेश सुरक्षित करून ठेवला होता.

१७४५मध्ये राशोल किल्ल्याभोवती खंदकांचे जाळे तयार करण्याची कल्पनादेखील व्हॅस्कॉन्सेलॉस यांनी मांडली. एकतर खराब डिझाइन केलेले किंवा वाईट पद्धतीने अंमलात आणल्यामुळे, खंदकांनी तटबंदीच्या परिसराला अपूर्ण व असुरक्षित बनवले.

पाण्याचा निचरा व्यवस्थित न झाल्यामुळे स्थानिकांना तापाच्या साथीला सामोरे जावे लागले. परिणामी अनेक जण मृत्युमुखी पडले. रहिवासी पळून गेले आणि एकेकाळी सुरक्षित असलेले राशोल ओसाड पडले.

राशोलचे बहुतेक रहिवासी मडगावमध्ये, काही रायच्या इतर वाड्यांमध्ये आणि काही जण रायबंदर येथे स्थायिक झाले. १८६४पर्यंत मडगावची लोकसंख्या (ब्रिटिशांच्या ताब्यात असलेल्या भारतात स्थलांतरित झालेले, जहाजांवर गेलेले, पोर्तुगीज वसाहत असलेल्या आफ्रिकेत आणि पोर्तुगालमध्ये गेलेल्यांची संख्या मोठ्या प्रमाणात होती हे जमेस धरूनही) २,५२२ घरांमध्ये १२,२२५ रहिवासी एवढी होती.

राशोलहून आलेले लोक साधारणपणे बोर्डा येथे स्थायिक झालेले होते. बोर्डा हा भाग तेव्हा जवळजवळ निर्मनुष्यच होता. जेझुइट्स येण्यापूर्वी बोर्ड्यात किती गावकर कुटुंबे राहत होती हे माहीत नाही, परंतु ते गेल्यानंतर फक्त एकच कुटुंब उरले.

९व्या वांगोडाचे प्रभुसरदेसाई आणि त्यांची पत्नी सुनीता राणी यांनी ख्रिश्‍चन पंथ स्वीकारला आणि आंद्रादे हे आडनाव लावण्यास सुरुवात केली. बोर्डा येथील ते एकमेव गावकर कुटुंब होते. गावकरांच्या घरादरम्यान ॲड. लाझारो फालेरो आणि त्यांचे शेजारी क्लेमेंट राहत होते आणि त्यानंतर राय गावाची सीमा होती. (सोनसडा/बकभाट येथे, मडगाव-कुडतरी रस्त्यालगत).

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Subhash Velingkar: सुभाष वेलिंगकरांची अटक अटळ? कोर्टाचा दिलासा नाही, जामीन अर्जावर सोमवारी सुनावणी

Saint Francis Xavier: सुभाष वेलिंगकरांच्या अटकेसाठी उद्रेक; पर्यटक, विद्यार्थ्यांचे हाल, गोव्यात दिवसभर कुठे काय घडलं?

BKC ते आरे JVLR पंतप्रधान मोदींचा मेट्रोने प्रवास; शाळकरी विद्यार्थी, महिलांशी साधला संवाद पाहा Video

Goa HSE Board Exam: गोवा बारावी बोर्ड परीक्षेच्या वेळापत्रकात बदल, JEE परीक्षेमुळे मोठा निर्णय

गिरीत बंदिस्त खोलीत आढळला मृतदेह , संशयास्पद मृत्यूचा कुटुंबियांचा अंदाज; गोव्यातील ठळक बातम्या

SCROLL FOR NEXT