Valmiki Falero Dainik Gomantak
ब्लॉग

बोलघेवडा- गप्‍पीष्‍ट- इतिहास संशोधक: वाल्मिकी फालेरो

वाल्मिकी फालेरो यांना त्‍यांचा उल्‍लेख इतिहास संशोधक म्‍हणून केलेला कधीच आवडला नाही.

गोमन्तक डिजिटल टीम

सुशांत कुंकळयेकर

वाल्मिकी फालेरो हे खरे तर गोव्‍याच्‍या इतिहासाचे एक गाढे अभ्‍यासक होय. गोव्‍याच्‍या इतिहासासंदर्भात त्‍यांच्‍याकडे इत्थंभूत माहिती असायची. गोव्‍याच्‍या इतिहासासंदर्भात कुठलीही अडचण आली तर बिनधास्‍त फालेरोंना फोन लावणे हे नित्‍याचे बनले होते.

वास्‍तविक असे अभ्‍यासक, संशोधक हे काहीसे रूढ स्‍वभावाचे असतात. त्‍यांनी लिहिलेली माहिती ही क्लिष्ट या प्रकारात मोडणारी असते. मात्र वाल्मिकी अत्‍यंत वेगळे होते. ‍याचे कारण म्‍हणजे, त्‍यांचा गप्‍पीष्‍ट आणि बोलघेवडा स्‍वभाव.

त्‍यांच्‍याकडे बोलताना एकप्रकारची मजा यायची. त्‍यांनी दिलेली माहिती अत्‍यंत मोलाची असायची. मात्र ते एवढ्या सहजपणे ती द्यायची की समोरच्‍याला आपण फालेरोंच्‍या तोंडून एक गोष्‍ट ऐकत तर नाही ना असे वाटायचे.

काही वर्षापूर्वी मी मडगाव शहराच्‍या इतिहासावर एक लेखमाला लिहिली होती. त्‍यातील काही लेख प्रसिद्ध झाल्‍यानंतर फालेरो यांनी स्वतःहून मला फोन केला आणि माझ्‍या लेखमालेचे त्‍यांनी कौतुक केले. वास्‍तविक ते स्‍वत: चांगले संशोधक असतानाही त्‍यांनी मला स्‍वत:हून फोन करणे मला अपेक्षित नव्‍हते.

किंबहुना हा सुखद धक्‍का होता. त्‍या दिवसांपासून माझी आणि वाल्मिकी फालेरो यांची नाळ एवढी जुळली की कुठलेही निमित्त काढावे आणि त्‍यांच्‍याकडे गप्‍पा सुरु कराव्‍या हे जवळपास नित्‍याचेच झाले होते. या गप्‍पा एकेकदा तास-तास चालू असायच्‍या.

या गप्पांतून फालेरो हे केवढ्या ताकदीचे अभ्‍यासक हे कळून यायचे. विशेषतः: गोव्‍यातील पुराण कथांबद्दलचा त्‍यांचा अभ्‍यास गाढा होता. असे असूनही फालेरो यांना त्‍यांचा उल्‍लेख इतिहास संशोधक म्‍हणून केलेला कधीच आवडला नाही. ते नेहमी म्‍हणायचे, मी इतिहासाचा प्रेमी पण संशोधक नाही.

एक मात्र खरे, मी चांगला कथानक सांगणारा आहे, असे ते म्हणायचे. फालेरो यांचे स्‍वत:बद्दलचे हे परिक्षण एका अर्थाने खरेही होते. कारण त्‍यांची लिहिण्‍याची शैलीच एवढी चांगली असायची की, त्‍यांचे वाचायला हाती घेतलेले पुस्‍तक खाली ठेवण्‍याचे मन होत नव्‍हते.

नुकतेच त्‍यांचे गोवा मुक्‍तीलढा आणि त्‍या अनुषंगाने गोव्‍यात होणाऱ्या घडामोडी यावर प्रसिद्ध झालेले पुस्‍तक त्‍याचाच प्रत्‍यय आणून देते. मडगावच्‍या होली स्पिरीट चर्चवर त्‍यांनी लिहिलेले पुस्‍तक हा एका अर्थाने संपूर्ण मडगावचा इतिहास म्‍हटले तर वावगे ठरणार नाही.

मी वाल्मिकी फालेरो यांचे नाव खरे तर १९७८ च्‍या आसपास ऐकले. त्‍यावेळी मी शाळेत शिकणारा विद्यार्थी होतो. मात्र त्‍यावेळीच गोव्‍यात सुरु झालेल्‍या वेस्‍ट कोस्‍ट टाइम्‍स या दैनिकावर येणाऱ्या त्‍यांच्‍या बातम्‍या आणि लेख यांनी मला त्‍या विद्यार्थी दशेतही भारावून सोडले होते.

त्‍यावेळी गोव्‍यातील इंग्लिश पत्रकारिता आजच्‍या एवढी आक्रमक नव्‍हती. अशा परिस्‍थितीत फालेरो ज्‍या आक्रमकरीत्या वार्तांकन करायचे ते पाहून त्‍यावेळच्‍या तरुणाईच्या गळ्‍यातील ते ताईत बनले होते.

संपूर्ण जगाप्रमाणेच गोव्‍यातही कोविडची लाट आली आणि कुणालाही कधीही न घाबरणारे वाल्मिकी फालेरो हे कोविडला मात्र घाबरले. कोविडची साथ पसरल्‍यावर त्‍यांनी लोकांजवळचा संपर्कही तोडला.

ते कुणाला फारसे भेटणे या काळात पसंत करत नव्‍हते. कोविड ओसरल्‍यावरही त्‍यांची ही भीती काही कमी झाली नाही. त्‍यांनी हल्‍लीच्‍या काळात लोकसंपर्क जवळपास टाळला होता. मात्र फोनवर ते कुणाकडेही बोलण्‍यास तयार असायचे.

त्‍यांना कोविडमुळे कुठलाही त्रास झाला नाही. मात्र ज्‍या दिलदार काळजामुळे ते सर्वांच्‍या जवळचे झाले होते त्‍या काळजानेच शेवटी घात केला. त्‍यांचा दुर्दैवी अंत हृदयाच्‍या झटक्‍यामुळेच झाला ही शोकांतिका म्‍हणावे का...?

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Live Updates: गोव्यानं नोंदवला सलग चौथा विजय; मोहितच्या गोलंदाजीसमोर मिझोरामचा संघ ढेर!

Rajbagh Beach: राजबाग किनाऱ्याने घेतला 'मोकळा श्वास'! पर्यटन खात्याकडून सात बेकायदेशीर बांधकामे उद्ध्वस्त

Goa Onion Rates: कांद्याने आणले डोळ्यात पाणी! नासाडीमुळे दोन दिवसात दरांमध्ये तब्बल २० रुपयांनी वाढ, जाणून घ्या सध्याचा भाव

Margao News: स्वच्छतेसंदर्भात मडगाव पालिकेचा महत्त्वाचा निर्णय; या कारणासाठी नागरिक, पर्यटकांकडून वसूल केला जाईल दंड

Cash For Job Scam: प्रिया यादवचा आणखी एक कारनामा उघड; डिचोलीतील चार बहिणींना घातला 80 लाखांना गंडा

SCROLL FOR NEXT