Goa Election: कुंकळ्ळीत इच्छुकांची भावूगर्दी  Dainik Gomantak
ब्लॉग

Goa Election: कुंकळ्ळी मतदारसंघात इच्छुकांची भावूगर्दी

अधिकृतपणे उमेदवार जाहीर झाल्यानंतरच येथील रागरंग अधिक स्पष्ट होणार आहेत.

दैनिक गोमन्तक

कुंकळ्ळी: कुंकळ्ळी मतदारसंघात विधानसभा निवडणुकीत उमेवारीसाठी सर्वच पक्षात एकाहून अधिक इच्छुक नेते असल्याने येथे चुरस निर्माण झाली आहे. अधिकृतपणे उमेदवार जाहीर झाल्यानंतरच येथील रागरंग अधिक स्पष्ट होणार आहेत. आगामी निवडणूक आमदार डायस यांच्यासाठी आव्हान असून काँग्रेस सोडल्यावर भाजपचे कार्यकर्ते व डायस समर्थक पूर्वाश्रमीचे काँग्रेस कार्यकर्ते डायस यांना स्वीकारतात का हे पाहावे लागणार आहे. सासष्टीतून तीन आमदारांनी काँग्रेस सोडली होती. मात्र, क्लाफास सोडून इतर दोघांना भाजपच्या चिन्हावर निवडणूक लढवणार, असे जाहीर करण्याचे धाडस झालेले नाही. काँग्रेसची उमेदवारी कोणाला मिळते व आम आदमी पक्ष तसेच संतोष देसाई किती प्रभावशाली ठरतात यावर निवडणुकीची दिशा ठरणार आहे.

आम आदमी पक्षानेही उमेदवार निश्चित केला आहे. काँग्रेसचा बालेकिल्ला असलेल्‍या मतदारसंघात काँग्रेचा उमेदवार कोण? हा वाद सुरू आहे. उमेदवारी एल्विस गोम्स यांना की युरी आलेमाव यांना मिळणार? यातच काँग्रेसची शक्ती खर्च होत आहे. विद्यमान आमदार क्लाफास डायस यांनी काँग्रेसचा त्याग करून भाजपमध्ये प्रवेश केल्यापासून येथे काँग्रेस पक्ष दिशाहीन बनल्यामुळे युरी आलेमाव यांना काँग्रेस पक्षात निमंत्रण दिले होते. पोलिस अधीक्षक सॅमी तवारीस याचंही नाव काँग्रेस गोटातून ऐकायला मिळत आहे.

'आप’ चाही बोलबाला!

भाजपचे नेते क्लाफास यांच्या कार्यावर समाधानी आहेत. भाजपच्या उमेदवारीवर प्रथम हक्क क्लाफास यांचा असला तरी सुदेश भिसे आणि विशाल देसाई यांनीही उमेदवारीवर दावा सांगितला आहे. एल्विस गोम्स यांनी पक्ष सोडल्यावर आम आदमी पक्षाला आलेली मरगळ काढून टाकून पक्षात जान घालण्याचे काम हल्लीच ‘आप’मध्ये आलेले प्रशांत नाईक व तियात्र कलाकार मिलाग्रीस दि चांदोर हे करीत आहेत. प्रशांत नाईक यांनी मतदारांना मोफत रेशन वाटून ‘आप’च्या प्रचाराचा नारळ फोडला आहे. पण चांदोर यांचीही रिंगणात उतरण्यासाठी तयारी सुरू आहे. युगोडेपाचे अध्यक्ष जोर्सन फर्नांडिस यांनीही निवडणुकीत उतरण्याचा निर्धार जाहीर केला होता.

क्‍लाफास यांचे भवितव्‍य काय?

दोन वर्षांपूर्वी विकासकामे होत नसल्याच्या कारणाने आमदार क्लाफास डायस यांनी काँग्रेसशी घटस्फोट घेऊन भाजपशी गाठ बनली होती. तेव्हापासून क्लाफास भाजपच्या परिवारातील सदस्य बनले असून भाजपची उमेदवारी आपल्यालाच मिळणार असा दावा ते करतात. निवडणूक लढविणार तर भाजपच्या उमेदवारीवर अन्यथा निवडणूकच लढणार नाही, असा पवित्रा त्यांनी घेतला आहे.

भायलो-भितरलो वाद

विकास करून व अनेकांना नोकऱ्या देऊनही ज्योकिम आलेमाव या मतदारसंघात का पराभूत झाले, याचे उत्तर ‘भायलो-भितरलो’ हा वाद. मतदारसंघाच्या बाहेरील उमेदवार नको, ही घोषणा ज्योकिमच्या विरुद्ध गेली. आता युरीलाही बाहेरील उमेदवार हाच मोठा अडथळा आहे.

जो काँग्रेस पक्ष स्वबळावर राज्यात सरकार स्थापण्याचा दावा करतो, त्या पक्षाला उमेदवार जाहीर करण्याची भीती का वाटते? एल्विस यांच्या काँग्रेस प्रवेशाने राजकीय समीकरणे बदलली आहेत. युरी यांना उमेदवारी मिळाल्यास एल्विस यांचे पुढील पाऊल काय? युरी यांना उमेदवारी न मिळाल्यास युरी गप्प बसणार की पक्ष सोडून अपक्ष म्हणून निवडणूक लढविणार, याविषयीही अनेक तर्क काढले जात आहेत.

क्लाफास ही करामत करू शकणार?

मतदारसंघात सुमारे बत्तीस हजार मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. या पैकी अठरा हजार मतदार कुंकळ्ळी पालिका क्षेत्रातील आहेत, तर चौदा हजार मतदार चांदर, गिरदोली, माकाझान, पारोडा, आंबावली व बाळ्ळी पंचायत क्षेत्रातील आहेत. भाजपचे प्राबल्य कुंकळ्ळी व बाळ्ळी पंचायत क्षेत्रात सोडल्यास इतर ठिकाणी मर्यादित आहे. अल्पसंख्याकांना ‘कमळा’जवळ आकर्षित केल्‍यास ते यशस्वी होतील.

प्रदूषण मुद्दा गाजणार

या निवडणुकीत सर्वांत अग्रस्थानी असणार तो प्रदूषणाचा मुद्दा. प्रदूषित औद्योगिक वसाहतीवर उपाययोजना व आराखडा मतदारांना हवा आहे. बेकायदा डोंगर कापणी व शेतजमीन बुजविण्यावरूनही मतदारसंघात तीव्र संताप आहे. शिवाय सरकारी नोकरी हा तर कायम प्रश्‍न आहे.

‘आप’चाही बोलबाला!

भाजपचे नेते क्लाफास यांच्या कार्यावर समाधानी आहेत. भाजपच्या उमेदवारीवर प्रथम हक्क क्लाफास यांचा असला तरी सुदेश भिसे आणि विशाल देसाई यांनीही उमेदवारीवर दावा सांगितला आहे. एल्विस गोम्स यांनी पक्ष सोडल्यावर आम आदमी पक्षाला आलेली मरगळ काढून टाकून पक्षात जान घालण्याचे काम हल्लीच ‘आप’मध्ये आलेले प्रशांत नाईक व तियात्र कलाकार मिलाग्रीस दि चांदोर हे करीत आहेत. प्रशांत नाईक यांनी मतदारांना मोफत रेशन वाटून ‘आप’च्या प्रचाराचा नारळ फोडला आहे. पण चांदोर यांचीही रिंगणात उतरण्यासाठी तयारी सुरू आहे. युगोडेपाचे अध्यक्ष जोर्सन फर्नांडिस यांनीही निवडणुकीत उतरण्याचा निर्धार जाहीर केला होता.

क्‍लाफास यांचे भवितव्‍य काय?

दोन वर्षांपूर्वी विकासकामे होत नसल्याच्या कारणाने आमदार क्लाफास डायस यांनी काँग्रेसशी घटस्फोट घेऊन भाजपशी गाठ बनली होती. तेव्हापासून क्लाफास भाजपच्या परिवारातील सदस्य बनले असून भाजपची उमेदवारी आपल्यालाच मिळणार असा दावा ते करतात. निवडणूक लढविणार तर भाजपच्या उमेदवारीवर अन्यथा निवडणूकच लढणार नाही, असा पवित्रा त्यांनी घेतला आहे.

भायलो-भितरलो वाद

विकास करून व अनेकांना नोकऱ्या देऊनही ज्योकिम आलेमाव या मतदारसंघात का पराभूत झाले, याचे उत्तर ‘भायलो-भितरलो’ हा वाद. मतदारसंघाच्या बाहेरील उमेदवार नको, ही घोषणा ज्योकिमच्या विरुद्ध गेली. आता युरीलाही बाहेरील उमेदवार हाच मोठा अडथळा आहे.

- विजय देसाई

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Karthik Aaryan In Goa: 'रुह बाबा'नं पुन्हा जिंकलं चाहत्यांचं मन; गोव्यात एन्जॉय करतानाचे फोटो केले शेअर!

Winter Care Tips: हिवाळ्यात त्वचेची घ्या विशेष काळजी; 'हे' घरगुती उपाय नक्की ट्राय करा!

Margao Police: हुल्लडबाजांना चाप; मडगाव पोलिसांनी जप्त केल्या मॉडिफाईड बुलेट

South Goa Beach: दक्षिण गोव्यातील समुद्र किनाऱ्यांची धूप वृध्दी सुरुच; राष्ट्रीय अभ्यासातून खुलासा!

Shruti Prabhugaonkar: गोमंतकीयांना कोट्यवधी रुपयांना गंडवणाऱ्या श्रुतीला अवघ्या १० दिवसात जामीन

SCROLL FOR NEXT