Counselor on Covid campaign Dainik Gomantak
ब्लॉग

Goa Education: समुपदेशक कोविड मोहिमेवर

गेल्या काही वर्षांपासून शाळेतील कुमारवयीन मुलांमध्ये मानसिक व भावनिक आरोग्याच्या समस्या वाढत चालल्या आहे.

दशरथ मोरजकर

पर्ये : गेल्या आठ वर्षांपासून गोवा शिक्षण विकास महामंडळांतर्गत उच्च माध्यमिक व माध्यमिक विद्यालयामध्ये समुपदेशकांची नियुक्ती केली आहे. हे समुपदेशक विद्यार्थ्यांच्या मानसिक आरोग्याच्या समस्या हाताळत असून त्यातून बऱ्याच प्रमाणात समस्यांचे निवारण होत असते. पण, या समुपदेशकांना सरकारने ‘कोविड -19’ मोहिमेंतर्गत आरोग्य केंद्रात समुपदेशन व लसीकरण कामासाठी नियुक्ती केल्याने त्‍यांना विद्यालयात उपस्‍थिती लावता येत नाही. परिणामी विद्यालयातील विद्यार्थ्यांच्‍या मानसिक आरोग्याकडे दुर्लक्ष होत असल्याचे उघड होत आहे.

नुकत्याच सत्तरीतील एका विद्यालयात शिकणाऱ्या एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार झाल्याची घटना घडली. ‘फेसबुक’च्या माध्यमातून त्या संशयिताने पीडित मुलीला आपल्या जाळ्यात ओढले व अत्याचार केला. पुरुषी मानसिकतेतून मुलांना फसवले जाते. त्यापासून कसे सावध राहावे, याबाबतीत जर कुमारवयीन मुलांना योग्यवेळी मार्गदर्शन मिळाल्यास असे प्रकार कमी होणे किंवा टाळू शकतात. पण, कोविडच्या काळात विद्यालये बंद असल्याने अशी व्यवस्था उपलब्ध नाही. गेल्या वर्षी कोविडच्या काळात सुरवातीला ऑनलाईन पद्धतीने शाळा सुरू होत्या. त्या काळात मुलांची बरीच प्रकरणे या समुपदेशकांनी हाताळलेली होती. पण, यंदा शक्य झाले नाही.

मानसिक आरोग्याची वाढती प्रकरणे

गेल्या काही वर्षांपासून शाळेतील कुमारवयीन मुलांमध्ये मानसिक व भावनिक आरोग्याच्या समस्या वाढत चालल्या आहे. मुलांच्या शिक्षणाच्या समस्या, ऑनलाईन शिक्षणामुळे निर्माण झालेल्या समस्या, मुलांच्या घरातील कौटुंबिक समस्या, त्याचबरोबर मुलांमध्ये प्रेम, आकर्षणामुळे निर्माण झालेल्या समस्या यामध्ये आहे. गेल्या वर्षात कोविड काळात विद्यालयात समुपदेशक जायच्या. त्यावेळी त्यांनी अनेक प्रकरणे हाताळली होती. पण, यंदा शाळा सुरू होऊन दोन महिने उलटून गेले, तरीही त्‍यांना पुन्हा रुजू न केल्याने सरकार मुलांच्या मानसिक आरोग्याबद्दल सकारात्‍मक दिसत नाही.

समुपदेशकांचे विविध उपक्रम

  • इंटरनेट व सायबर सुरक्षा

  • लैंगिक समानता

  • मानसिक आरोग्य व भावनिक आरोग्य

  • आत्महत्या प्रतिबंध मार्गदर्शन

  • प्रभावी अभ्यास कौशल्य व प्रोत्साहन

  • मुलीतील मासिक पाळीतील स्वच्छता

  • पौष्टिक आहार

  • पालकत्व

  • कुमारवयीन मुले व जीवनकौशल्य

  • इतर मानसिक आरोग्यसंबधी महत्त्वाचे दिवस साजरे केले जातात.

समुपदेशनासाठी येणारे विषय

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

India vs Pakistan: पाकिस्तान पुन्हा फेल! टीम इंडियानं 88 धावांनी चारली पराभवाची धूळ, दीप्ती-क्रांतीची भेदक गोलंदाजी

LIVE सामन्यात भयंकर राडा; भारताच्या खेळाडूंमध्ये 'तू तू- मै मै', एकमेकांच्या अंगावर धावून गेले; अंपायर नसता तर... Watch Video

Bicholim Crime: खाऊचं आमिष दाखवून चिमुरडीवर कारमध्ये अत्याचार; 47 वर्षीय आरोपीला अटक

Dodamarg: 20 फूट खोल ओहोळात कोसळलेली कार, दुचाकीला वाचवण्याच्या प्रयत्नात अपघात; चालक सुदैवानं बचावला

Renuka Devi History: देव-असुरांमध्ये युद्ध चालू होते, श्रीविष्णूंनी वचन दिले की आदितीच्या गर्भातून जन्म घेतील; रेणुका मातेचा इतिहास

SCROLL FOR NEXT