नवी दिल्ली: कोरोना (Covid-19)विषाणूने संपूर्ण जगात थैमान घातले आहे. हा विषाणू किती धोकादायक आहे, हे अख्ख्या जगाने दुसऱ्या लाटेदरम्यान (Corona Second Wave) पाहिले आहे. भारत सरकार सुद्धा सुरुवातीपासूनच कोरोनाबाबत गंभीर पावलं उचलत आहे. आता कोरोनाच्या संसर्गामध्ये थोडीशी घट झाली आहे, तर सरकारचा (Government) प्रयत्न आहे की सर्व राज्यांनी असे निर्णय घ्यावेत जेणेकरून भविष्यात कोरोना पुन्हा परत येवू नये. कोरोनानाची बदलती परिस्थिती लक्षात घेऊन केंद्र सरकारने राज्य सरकारांना मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. (Central government declare new Covid-19 rules for states 20 percent beds reserved for children)
9 जुलै रोजी 23000 कोटी रुपयांच्या कोविड पॅकेजची घोषणा केंद्र सरकारने केली. हे पॅकेज एका वर्षात वापरायचे आहे आणि ते एका वर्षात पूर्ण करायचे आहे. केंद्राच्या मार्गदर्शक सूचनांनुसार, या अनुदानातून, राज्यांना जिल्हा स्तरावरील लोकांना कोरोनापासून वाचवण्यासाठी मदत दिली जात आहे. राज्य सरकार कोविडविरोधात काय निर्णय घेत आहे कसं नियोजन करत आहे याचा संपूर्ण माहिती अहवाल तयार करून केंद्राला पाठवावा लागणार आहे.
20 टक्के बेड मुलांसाठी राखीव असतील
कोरोनाच्या सुरुवातीच्या दिवसांमध्ये, मूलभूत आरोग्य यंत्रणांबाबत बऱ्याच अडचणी होत्या. ब्लॉक स्तरावर रुग्णवाहिका उपलब्ध नव्हती. मात्र आता सरकारनेही याकडे लक्ष दिले आहे. केंद्राने सांगितले की प्रत्येक ब्लॉकमध्ये एक रुग्णवाहिका असेल आणि त्याचे भाडे केंद्राकडून दिले जाईल. औषधाचा बफर स्टॉक प्रत्येक जिल्ह्यात ठेवावा लागेल. पीएफए, ऑक्सिजन कंसेंट्रेटर देखील पुरेशा प्रमाणात उपलब्ध करून द्यावे लागतील. 1 लाख कॉन्सेन्ट्रेटर आणि 20 टक्के कोविड बेड हॉस्पिटलमध्ये मुलांसाठी राखीव असतील असे सांगण्यात आले आहे.
राज्यांना 1887.80 कोटींचा एडवांन्स
केंद्राचा 50% आगाऊ हिस्सा राज्यांना देण्यात आला आहे. म्हणजेच 13 ऑगस्ट रोजी 7500 कोटी जारी करण्यात आले. केंद्र आणि राज्य सरकारांना 60:40 च्या प्रमाणात खर्च करावा लागतो. ईशान्य भागात 90:10 च्या प्रमाणात शेअरिंग होणार. यापूर्वी 22 जुलै रोजी सरकारने राज्यांना 1887.80 कोटी रुपयांची एडवांन्स रक्कम दिली होती.
जिल्हा स्तरावर कोरोना टाळण्यासाठी केंद्राने राज्यांना मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत. सूत्रांनी उघड केले की कोरोनाच्या दुसऱ्या लाटेदरम्यान ऑक्सिजनची नाही तर लॉजिस्टिक्सची सर्वात मोठी कमतरता होती. आता जर भविष्यात कोरोनाची तिसरी लाट आली तर देशभरात 375 प्लांट्स उभारण्यात आले आहेत जेणेकरून अशा परिस्थितीत ऑक्सिजनची कमतरता भासू नये.
500 एडवान्स स्टेजमध्ये आहेत तर एकूण 1755 प्लांट उभारली जाणार आहेत. सुत्रानुसार 12 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या मुलांसाठी लसीचा परिक्षण सुरू आहे. एकदा या लसीच्या चाचण्या पुर्ण झाल्यानंतर मुलांचे लसीकरण देखील लगेच सुरू करण्यात येईल.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.