E-Calendar 2023 Dainik Gomantak
ब्लॉग

E-Calendar 2023: आयकॉनिक 11 : फॅशन ई-कॅलेंडर

दिवाडी येथील ‘मर्क्यूअर गोवा देवाया’पेक्षा अधिक सुंदर जागा आम्हाला शोधून सापडली नसती.

गोमन्तक डिजिटल टीम

-प्रसाद पानकर

या महिन्याच्या कॅलेंडर शूटसाठी आमच्याकडे काही चांगल्या कल्पना होत्या पण त्यासाठी निवडलेले मॉडेल उपल्ध होऊ शकत नव्हते. शेवटी मी ‘मासेमारी’ या विषयाचा विचार केला आणि तो सर्वांना आवडला देखील.

मासेमारी हा विषय मला ‘लाईफस्टाईल ॲक्टिव्हीटी’ म्हणून दाखवायचा असल्याकारणाने शूटसाठी आम्हाला आकर्षक अशीच जागा हवी होती. दिवाडी येथील ‘मर्क्यूअर गोवा देवाया’पेक्षा अधिक सुंदर जागा आम्हाला शोधून सापडली नसती.

गेल्या महिन्याचे कॅलेंडर शूटदेखील आम्ही याच जागेत केले होते. जेव्हा मी या शूटसाठी त्या जागेचे सर्वेसर्वा, वरूण अल्बुकर्क यांना फोन केला तेव्हा आम्हाला त्यांची परवानगी क्षणार्धात मिळाली.

या शूटसाठी मी ज्या मॉडेलना फोन केला ते एकतर व्यस्त होते तर काहींनी फोन उचललाही नाही. रोहीणी शर्मा बेंगलोरमध्ये होती पण जेव्हा मी तिला फोन केला तेव्हा तिने या शूटसाठी गोव्यात यायचे आनंदाने मान्य केले.

(शूटच्या दिवशी सकाळीच ती गोव्यात पोहोचली) रिया गावसला फोन करताच तिने आपली उत्सुकता व्यक्त केली. सिमरन गाड ही नवी मुलगी होती. मला या शूटसाठी तीन मुली हव्या होत्या आणि या तिघीजणी छायाचित्रात फारच सुंदर दिसल्या आहेत!

या महिन्यात आमच्यापैकी सारेजण पूर्णपणे कामात व्यस्त होते. त्यामुळे कसाबसा वेळ काढून या महिन्याच्या अगदी शेवटच्या दिवशी आम्ही हे शूट करु शकलो.

त्या दिवशी पाऊस धुवांधार कोसळत होता पण माझी मनोदेवता मला सांगत होती की शूटच्या वेळी पाऊस थांबेल आणि काय सांगू? तसेच घडले! तुमच्या मनात असलेल्या विश्‍वासाला हे विश्‍व प्रतिसाद देत असते आणि हे असे आमच्या बाबतीत पहिल्यांदाच घडत नव्हते!

आमच्या साऱ्या मॉडेल, आमची टीम (नेव्हील, दिपेश, छायाचित्रकार निषाद म्हाळशी, स्टायलिस्ट कँडीस ग्रे) उत्साहात होती. पाऊस कोसळतच होता पण तोपर्यंत कॅंडीसने साऱ्या मॉडेलना तयार केले आणि अचानक पाऊस थांबला.

अगदी आम्हाला हव्या असलेल्या वेळी. आम्ही लगेच जागेकडे धावलो. कशाप्रकारचा प्रकाश हवा हे मी नेवीलला समजावले. तो आणि दिपेश कामाला लागले.

मला जरी हा शॉट नैसर्गिक प्रकाशात हवा होता तरी नेव्हील म्हणाला की आम्ही स्टूडिओ लाईट्‍स वापरू शकतो. त्याचे बरोबर होते व त्यामुळे फार छान फरक पडला. मॉडेलवर आम्ही समोरुन GODOX AD600 प्रकाश दिला तर बॅक लाईटसाठी GODOX AD200 चा वापर केला.

सारे काही व्यवस्थित मांडले गेले आणि निषादने छायाचित्र सुंदररित्या टिपले. मासेमारीचा आनंद घेणाऱ्या तीन मुलींचे छायाचित्र आम्हाला हवे होते आणि हसत-खेळत, चेष्टा-विनोद करत आम्ही ते छानपणे मिळवण्यात यशस्वी झालो होतो. ते सारे एकप्रकारचे जादुई क्षणच होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Karthik Aaryan In Goa: 'रुह बाबा'नं पुन्हा जिंकलं चाहत्यांचं मन; गोव्यात एन्जॉय करतानाचे फोटो केले शेअर!

Winter Care Tips: हिवाळ्यात त्वचेची घ्या विशेष काळजी; 'हे' घरगुती उपाय नक्की ट्राय करा!

Margao Police: हुल्लडबाजांना चाप; मडगाव पोलिसांनी जप्त केल्या मॉडिफाईड बुलेट

South Goa Beach: दक्षिण गोव्यातील समुद्र किनाऱ्यांची धूप वृध्दी सुरुच; राष्ट्रीय अभ्यासातून खुलासा!

Shruti Prabhugaonkar: गोमंतकीयांना कोट्यवधी रुपयांना गंडवणाऱ्या श्रुतीला अवघ्या १० दिवसात जामीन

SCROLL FOR NEXT