Drag Performance Dainik Gomantak
ब्लॉग

Drag Performance: क्रॉस-ड्रेसिंग, भन्नाट आवेश आणि उत्कट अभिव्यक्तीचे सादरीकरण

19 व्या शतकात थिएटर स्लॅंग (अपभाषा) म्हणून हा शब्द प्रथम वापरला गेला.

गोमन्तक डिजिटल टीम

Drag Performance ड्रॅग सादरीकरणे देशात खूप स्पर्धात्मक बनत चालली आहेत. त्यांना प्रचंड संख्येने मिळणारे फॉलोईंग काही ड्रॅग कलाकारांना स्टारपद देखील देते. ड्रॅग हा मनोरंजनाचा प्रकार आहे ज्यात कलाकार उच्च शैलीचा आणि ठळकपणे नजरेत भरणारा पेहराव केला जातो.

19 व्या शतकात थिएटर स्लॅंग (अपभाषा) म्हणून हा शब्द प्रथम वापरला गेला. पुरुषांनी परिधान केलेल्या स्त्रियांच्या कपड्यांकडे निर्देश करणारा तो शब्द होता.

आज अनेक ड्रॅग कलाकार असे आहेत जे व्यवहारात पुरुष म्हणून वावरतात आणि सादरीकरणात स्वतःला स्त्री रूपाने सादर करतात. ड्रॅग क्वीन्स म्हणून ते ओळखले जातात. कोणत्याही लिंगाची व्यक्ती ड्रॅग क्वीन बनू शकते.

गेल्याच आठवड्यात आश्‍वे मांद्रे येथील ‘व्हरांडा’ मध्ये ‘अ रेनबो कलेक्टीव्ह’ (आर्क) या ग्रुपचा ड्रॅग परफॉर्मन्स सादर झाला. भन्नाट आवेश आणि उत्कट अभिव्यक्तीचे हे सादरीकरण एक मूर्तीमंत उदाहरण होते.

हिंदी आणि पाश्‍चात्य गीतांवर चाललेले जरी ते सादरीकरण असले तरी त्या गाण्यातला आशय जणू त्यांचा व्यक्तीगत होता अशा आवेशात प्रत्येक कलाकार ते सादर करत होता.

जीया लबैजा, साल ऑरा, डोलोरेस डेल गोवा, मिस्टिकल फ्लेम, अ‍ॅट्रायसिस आणि सेक्स वॅक्स अशा सहा ड्रॅग क्वीनचा या सादरीकरणात सहभाग होता.

‘व्हरांडा’ रेस्टॉरंटच्या जागेत सुमारे शंभर दर्शक या ड्रॅग सादरीकरणाचा आनंद घेण्यासाठी जमले होते. मुख्य म्हणजे या दर्शकात पंचवीस-तिशीत असलेल्या युवा मंडळींचाच भरणा अधिक होता. सादरीकरणाला त्यांच्या मिळणाऱ्या प्रतिसादाने ती जागा दुमदूमून जात होती.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Assembly Session: टॅक्सी व्यवसाय नींज गोयंकर यांच्या हातात राहिला पाहिजे

Love Horoscope: मनातल्या भावना व्यक्त करायची हीच योग्य वेळ, तुमची 'चंद्र रास' काय सांगते? वाचा

Goa Opinion: कोण म्हणतंय पत्रकारिता संपली?

WI vs AUS: 5 सामने, 5 पराभव! ऑस्ट्रेलियाने 5-0 ने मालिका जिंकत टीम इंडियाच्या 'या' विक्रमाची केली बरोबरी

Konkani Schools: ‘देवनागरी कोकणी’च्या शाळा सुरू करण्यास हरकत नाही! आमदारांनी पुढाकार घ्‍यावा, CM सावंत यांचे आवाहन

SCROLL FOR NEXT