Gauri Pujan: सुवासिनी आजही जपताहेत चवथीतील पारंपरिक प्रथा  Dainik Gomantak
ब्लॉग

Gauri Pujan: सुवासिनी आजही जपताहेत चवथीतील पारंपरिक प्रथा

डिचोलीसह राज्यभरात देवीची पूजा उत्सहात

दैनिक गोमन्तक

डिचोली: सुवासिनींच्या आनंदाला उधाण देणारा देवी अर्थातच ‘गौरी पूजन’ (Gauri Pujan) सोहळा डिचोलीसह राज्‍यातील विविध भागांत परंपरेप्रमाणे आज (मंगळवारी) पारंपरिक पध्दतीने उत्साहात साजरा करण्यात आला. गेले तीन दिवस कहर केलेल्या पावसानेही आज दिवसभर उसंत घेतल्याने सुवासिनींचा आनंद द्विगुणित झाला.

गौरी अर्थातच मंगलमूर्ती गणरायाची मातोश्री. चतुर्थी काळात गणपती पूजनाबरोबरच डिचोलीतील धुमासे, मेणकुरे, साळ, कारापूर, सर्वण, व्हाळशी आदी बहुतेक भागांत गौरी अर्थातच देवी पुजण्याची प्रथा रूढ आहे. आजही या भागातील सुवासिनी परंपरागत चालत आलेली ही प्रथा जपून आहेत. चतुर्थीच्या पाचव्या दिवशी गौरी पूजन सोहळा साजरा करण्यात आला. गौरी पूजनाच्या दिवशी व्रतस्थ सुवासिनी नऊवारी लुगडे नेसून आणि साजश्रुंगार करून गावातील नैसर्गिक झरा किंवा विहिरीवर जाऊन कलशातून निर्मळ पाणी घरी आणतात. या पाण्यालाच पवित्र समजून गौरी अर्थातच देवी मानले जाते.

कलशातून जलरूपातील गौरी घरी आणल्यानंतर त्याची विधिवत पूजा करतात. गौरी पूजनाच्या दिवशी सायंकाळी देवीचा प्रसाद म्हणून भाजी-भाकरी वाटण्याची प्रथाही परंपरागत आहे. सायंकाळी सुवासिनी भाजी प्रसाद वाटतात. वर्षपध्दतीप्रमाणे गुरुवारी डिचोली तालुक्‍यातील मेणकूरे, धुमासे, साळ आदी भागात ‘गौरी’ सोहळा उत्साहात पार पडला. सकाळी जलरूपातील गौरी घरी आणल्यानंतर विधिवत पूजा करून हौशे भरण्यात आले. नंतर देवदेवतांना हौशे अर्पण करण्यात आले. सायंकाळी भाजी-भाकरीचा प्रसाद वाटण्यात आला.

सत्तरीतही पार पडला विधी

पर्ये सत्तरीत गणेश चतुर्थीतील गौरी पूजन हा महत्त्‍वाचा उत्सव आज मोठ्या उत्साहात साजरा झाला. चतुर्थीच्या पाचव्या दिवशी येथील बहुतांश ९६ कुळी मराठा समाजातर्फे हा विधी साजरा केला जातो. सत्तरीतील बऱ्याच गावांमध्ये हा समाज असल्याने हा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला गेला. पेडणे तसेच राज्‍यातील इतर भागांतही हा उत्सव साजरा करतात. दोडामार्ग तालुक्यातही असा प्रकार आहे तर सावंतवाडी व इतर कोकण भागात गौरीच्या मूर्तीचे पूजन करतात.

साकोर्डा भागात हौशे साजरे

साकोर्डाच्या अनेक भागांत मंगळवारी पारंपरिकरीत्या गौरी पूजनाचा (हौशे) कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. बहुतांश गावात चतुर्थीच्या पाचव्या दिवशी हौशे साजरी करण्याची परंपरा आहे, असे तयडे गावातील सगुण गावकर यांनी सांगितले. सुवासिनी कुलदेवतेला हौशे अर्पण केल्यानंतर गावातील प्रत्येक गणपतीच्या चरणी सुवासिनी आपापले हौशे अर्पण करून कुटुंबातील लहान-मोठ्या सगळ्या सदस्यांना वाटण्‍यात आले. संध्याकाळी वाजत गाजत, घंटानादात गौरीचे विसर्जन करण्यात आले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Droupadi Murmu: राष्ट्रपती मुर्मूंचे गोव्यात जोरदार स्वागत! विक्रांत युद्धनौकेवर पाहिले नौदलाचे सामर्थ्य

Rashi Bhavishya 08 November 2024: तुमच्या परदेश वारीचं स्वप्न पूर्ण होणार; जाणून घ्या कसा असेल आजचा दिवस

Elvis Gomes: 'हा सगळा दाखवण्यापुरता प्रकार'! सरकारी जागेतील अतिक्रमणांवरील कारवाईबाबत गाेम्‍स असे का बोलले? वाचा..

'Cash For Job Scam' मध्ये 44 पीडित! अजून तक्रारदार असण्याची शक्यता; 'दीपश्री'ने ठकवले पावणेचार कोटींना

Goa Electricity: हायकोर्टाच्या 'शॉक'नंतर वीज विभागाला जाग, नवीन जोडणीसंदर्भात नियम होणार कठोर

SCROLL FOR NEXT