Goa  Dainik Gomantak
ब्लॉग

‘टोटेम',श्रद्धा कॅमेरा आणि बरेच काही..

दैनिक गोमन्तक

माणसांनी नृत्यातून केलेली एखाद्या प्राणिमात्राची अनुकृती, अशा स्वरूपातली लोकनृत्ये जगभर बघायला मिळतात. उदाहरणार्थ, नेपाळमधील याकनृत्य, नागालॅंडमधील हेतालुली नृत्य, आफ्रिकेतील सांबरनृत्य किंवा गोव्यातील (Goa) ‘मोरूलो’ हे लोकनृत्य.

आदिम अवस्थेतल्या मनुष्यामध्ये आजुबाजूच्या एखाद्या प्राणिमात्राशी स्वतःचे अस्तित्त्व जोडण्याची वृत्ती दिसून येते. त्याला मानववंशशास्त्रात ‘टोटेमिझम’ (totemism)असे म्हणतात. आपल्या जमातीचा जन्म त्या विशिष्ट प्राणिमात्राशी/वनस्पतीशी संबंधित आहे, अशी टोटेमिझम पाळणाऱ्या समुदायाची सामान्यपणे श्रद्धा असते. रामायणात किष्किंधेतील जमातीचा वानर म्हणून आलेला उल्लेख टोटेमशी संबंधित आहे, असे काही अभ्यासक मानतात. सामान्यपणे असे पशु/वनस्पती टोटेम म्हणून मान्यता पावतात ज्यांचे काही गुण त्या आदिम अवस्थेतील मानवाला अनुकरणीय वाटत असतात. अनुकरणाचा विधी केला की त्या टोटेमचे गुणधर्म आपल्यात संचारतात अशा श्रद्धेतून मनुष्य तसे करायचा.कालांतराने उत्पादन साधनांमध्ये होणाऱ्या विकासाबरोबर ‘टोटेम’ प्रेरणा मागे पडते, मात्र तिचे ठसे नृत्यासारख्या कलेंमध्ये तसेच मिथकांमध्ये टिकून राहतात. उदाहरणार्थ, विष्णूचे काही अवतार.

कोणीतरी बनण्याच्या (आणि बनवण्याच्या) कलेचे - म्हणजेच अभिनयकलेचे - आणि अभिनयकलेच्या आस्वादाचे प्राथमिक ट्रेनिंग मनुष्याला देण्यात ‘टोटेम’ प्रेरणेचा मोठा वाटा आहे. कधी संपूर्ण समुदाय प्रत्यक्ष अनुकृतीत सहभागी होई तर कधी समुदायाच्यावतीने काही व्यक्ती अनुकृतीचा विधी करीत. अनुकृतीमुळे अनुकरण करणाऱ्याच्या अंगी विशिष्ट गुण निर्माण होतात, अशी अनुकरणाच्या विधीमध्ये प्रत्यक्ष सहभागी नसणाऱ्यांचीही श्रद्धा असायची. लोकमानसात अजूनही दृढमूल असलेल्या या श्रद्धेमुळेच निळू फुलेंसारख्या सज्जन गृहस्थाला अनेकदा त्रास झाला. ‘मी नथुराम गोडसे बोलतोय’ नाटकात आपल्याला नथुरामच्या भूमिकेत पाहून, गोपाळ गोडसे यांच्या तोंडून ‘दादा’ असे शब्द निघाले, असे शरद पोंक्षे पूर्वी सांगायचे.

व्यक्तिमत्त्व पालटावरच्या या श्रद्धेचा वारसा इलेक्शन नाट्यानेही आपल्या परीने जपलेला आहे. वाघ-वाघीण, सिंह, कोल्हे यांसारखे पशु बनण्याचे प्रयत्न किंवा ‘वो सांप हैं, और मैं नेवला हूं’ यांसारख्या घोषणा तर थेट टोटेमकाळात घेऊन जातात.एखादा अभिनेता फक्त दाढी वाढवतो आणि त्याच्यात महाकवीचा संचार झाल्याचा भास होतो. कधी तो वल्कले नेसून साधू बनतो. पगडी घातली की सिख होतो आणि कपाळावर विशिष्ट टिळा लावला की जैन होतो. ब्रेख्तच्या ‘रेझिस्टिबल राइज ऑफ आर्तुरो उई’ या नाटकात हिटलरवर बेतलेले आर्तुरो उई हे पात्र एका अभिनेत्याकडून प्रशिक्षण घेताना ब्रेख्तने दाखवले आहे. फ्रेंडरिक बासिल या नटाकडून हिटलरने शब्दफेक आणि हावभावाचे ट्रेनिंग घेतले होते, असे म्हणतात.

व्यक्तिमत्त्व पालटण्याच्या कलेचा मापदंड म्हणून ‘परिपूर्ण अभिनेता’ अशी एक संकल्पना रूढ आहे. म्हणजे, चांगला अभिनेता बनण्यासाठी आवाजाचा कुशल वापर जमला पाहिजे. वैविध्यपूर्ण वापरासाठी उपयुक्त असे कमावलेले शरीर हवे. त्याकरिता नटाने व्यायाम केला पाहिजे. (मात्र व्यायामाचा अभिनय करून भागणार नाही.) नृत्य, गायनाबरोबरच त्याला काही वाद्ये वाजवता आली पाहिजेत. या गुणांचा समुच्चय ज्याच्यात आहे, त्याचे नाणे खणखणीत मानावे. तंत्रज्ञानातील बदलांबरोबरच यशस्वी होण्याकरिता नटापाशी आणखी एक गुण असणे अलीकडच्या काळात अनिवार्य झाले आहे - कॅमेऱ्याचे (Camera) अचूक भान आणि ज्याच्या हाती कॅमेरा आहे त्याच्यावर नियंत्रण!

साईबाबांची समस्या

साईबाबांच्या भूमिकेमुळे अनेकांसाठी वंदनीय ठरलेल्या गोव्यातील (Goa) एका अभिनेत्याला याच श्रद्धेमुळे अनेक दिव्यांतून जावे लागले. देव सर्वत्र असतो असे म्हटले तरी ठराविक ठिकाणी साईबाबा बसलेले दिसू नयेत, अशी जनसामान्यांची अपेक्षा असते. कधी खाणपट्ट्यातील ट्रकमालक ट्रक रांगेत उभे करून साईबाबांनी (Sai Baba) प्रत्येक ट्रकला आशीर्वाद द्यावा, अशी प्रार्थना करायचे. हे प्रयोगानंतर होत असे, यावरून अभिनेत्यावर गुदरणाऱ्या दारुण प्रसंगाची कल्पना येईल.

- नारायण आशा आनंद

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Saint Francis Xavier: सुभाष वेलिंगकरांच्या अटकेसाठी उद्रेक; पर्यटक, विद्यार्थ्यांचे हाल, गोव्यात दिवसभर कुठे काय घडलं?

Goa HSE Board Exam: गोवा बारावी बोर्ड परीक्षेच्या वेळापत्रकात बदल, JEE परीक्षेमुळे मोठा निर्णय

Goa Today's News Live: गोव्यातील सर्व धर्मियांमध्ये संत फ्रान्सिस झेवियर यांचा DNA; मंत्री सिक्वेरा

Fact Check: गोव्यात बोट पलटी होऊन 23 लोकांचा मृत्यू, 64 बेपत्ता; व्हायरल व्हिडिओ मागील सत्य काय?

Tourist in Goa: गोव्यात धार्मिक तणाव, पर्यटकांची पायपीट तर शाळकरी मुलांचे हाल!!

SCROLL FOR NEXT