First Literary Award to Avadhoot Kudtarkar Dainik Gomantak
ब्लॉग

Blog : अवधूत कुडतरकर यांना पहिला साहित्य सेवा गौरव पुरस्कार

गेली जवळपास 12 वर्षे यशवंत त्रैमासिकाचे संपादक तथा प्रकाशक म्हणून त्यांनी साहित्य क्षेत्रात आपले भरीव याेगदान दिले आहे.

गोमन्तक डिजिटल टीम

साहित्य क्षेत्रात सातत्यपूर्वक भरीव याेगदान देणाऱ्या गोमंतकीय साहित्यिकाला (मराठी तसेच कोकणी) यंदापासून साहिल प्रकाशनतर्फे कै. आशिष नामदेव बुगडे स्मरणार्थ ‘साहित्य सेवा गाैरव पुरस्कार’ देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. राेख रक्कम 10,001/-, स्मृतिचिन्ह व मानपत्र असे या पुरस्कारचे स्वरुप आहे.

यंदापासून देण्यात येणार्या या पहिल्या पुरस्कारासाठी राज्य पुरस्कार विजेते ज्येष्ठ साहित्यिक अवधूत यशवंत कुडतरकर यांची निवड करण्यात आली आहे. 11 ऑगस्ट 2023 राेजी, पणजी येथील इस्न्टिट्यूट मिनेझिस ब्रागांझाच्या काॅन्फरन्स सभागृहामध्ये, सायंकाळी 4.00 वाजता आयोजित हाेणार्या कार्यक्रमात हा पुरस्कार त्यांना प्रदान करण्यात येईल.

1 सप्टेंबर 1949 जन्मलेल्या कुडतरकर यांनी गाेमंतक मराठी अकादमी या शैक्षणिक व साहित्यिक संस्थेत सेवा बजावली असून तेथेच ते निवृत्त झाले. त्यानंतर गेली जवळपास 12 वर्षे यशवंत त्रैमासिकाचे संपादक तथा प्रकाशक म्हणून त्यांनी साहित्य क्षेत्रात आपले भरीव याेगदान दिले आहे.

विविध वर्तमानपत्रे , नियतकालिकांमधून त्यांनी चारपेक्षा अधिक दशके लेखन केलेे आहे.  रंभागर्भ (कवितासंग्रह), हिमनग (कवितासंग्रह), सांजवेळ (डायरी), दिगंबरा (कादंबरी), सुर्याश्व (कवितासंग्रह) अशी अनेक पुरस्कारप्राप्त मराठी पुस्तके त्यांच्या सिध्दहस्त लेखणीतून साकारली आहेत. ‘शक्तिपात’ ही काेंकणी नवलिकाही त्यांच्या नावावर असून त्या नवलिकेलाही अनेक पुरस्कार प्राप्त झाले आहेत.

साहित्य क्षेत्रातील याेगदानबद्दल गाेवा सरकारच्या कला व संस्कृती संचालनालयाने 2008-09 साली मानाचा राज्य सांस्कृतिक पुरस्कार देऊन त्यांना सन्मानित केले आहे. त्याव्यतिरिक्त 1978-79 साली ‘रंभागर्भ’ या कवितासंग्रहासाठी त्यांना कला अकादमी गाेवा व गाेवा मराठी भाषा परिषदचे उत्कृष्ट साहित्य पुरस्कार प्राप्त झाले आहेत. 

1988-89 साली ‘हिमनग’ या कवितासंग्रहासाठी कला अकादमी गाेवाचा उत्कृष्ट साहित्य पुरस्कार त्याना लाभला आहे. 1988-89 साली ‘दिगंबरा’ या हस्तलिखितासाठी गाेमंतक मराठी अकादमीच्या उत्कृष्ट कादंबरी लेखन पुरस्काराचे ते मानकरी ठरले आहेत.

1998 साली द गाेवा हिंदु असाेसिएशन, मुंबईने प्रतिष्ठेचा कविवर्य बा. भ. बाेरकर पुरस्कार देऊन त्यांना सन्मानित केले आहे.  2000-01 साली ‘शक्तिपात’ या नवलिकेसाठी कला अकादमी गाेवा, काेकणी भाषा मंडळ, जनगंगा कुडचडे काेकणी केंद्र, डाॅ. टी. एम. ए. पै फाऊंडेशन, मणिपाल या संस्थांनी त्यांना उत्कृष्ट साहित्य पुरस्कार देऊन सन्मानित केले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Civil Service Transfers: गोवा नागरी सेवेत फेरबदल! गुरुदास देसाई यांची जिल्हाधिकारीपदी वर्णी तर वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या तडकाफडकी बदल्या

Mandre Panch Sexual Harassment Case: पंच रॉबर्ट फर्नांडिसविरोधात अजामीनपात्र वॉरंट जारी; महिलेचा छळ अन् मारहाण प्रकरणात

Mapusa ITI Fire Safety Course: 10वी पास तरुणांसाठी सरकारी रोजगाराची सुवर्णसंधी! म्हापसा 'ITI'मध्ये 24 जागांसाठी प्रवेश, एक वर्षाचा अभ्यासक्रम

Goa Crime Case: दोरीने गळा आवळला, पण मारेकरी कोण? गोव्यात गाजलेल्या 'अनमोड घाट' हत्येचा शेवट; चौघांची निर्दोष सुटका

PM Jan Dhan Yojana Goa: 2,35,200 नागरिकांपर्यंत पोहोचल्या बँकिंग सुविधा! जनधन योजनेत गोव्यातील 'कॅनरा बँक' अव्वल; केंद्रीय अर्थमंत्र्यांनी दिली आकडेवारी

SCROLL FOR NEXT