अग्निशमन अधिकारी प्रशांत धारगळकर Dainik Gomantak
ब्लॉग

अग्निशमन अधिकारी प्रशांत धारगळकर

दैनिक गोमन्तक

ही व्यक्ती अश्या असतात की त्याना स्वत:च्या जीवाची पर्वा नसते. काळ-वेळ न बघता आपल्यासमोर जी व्यक्ती संकटात सापडते, त्याला सहीसलामत वाचवणे हेच आपले आद्य कर्तव्य आहे असे ते मानतात. बोलण्यापेक्षा कृतीतून ते सिद्ध होतात. अशा व्यक्तीत मालपे, पेडणे येथील अग्निशामन दलाचे अधिकारी प्रशांत धारगळकर यांचा आवर्जून उल्लेख करावा लागेल. समाजाचे आम्ही काहीतरी देणेकरी लागतो या प्रेरणेनेच प्रशांत धारगळकर यांचे कार्य चालु असते.

पदवीपर्यंत शिक्षण घेतलेल्या प्रशांत यांनी नोकरीपुर्वी क्रीडा क्षेत्रात राज्य, राष्ट्रीय पातळीवर उत्कृष्ठ कामगिरी बजावलेली आहे. कबड्डी त्याचा आवडता खेळ. कबड्डीच्या विकासासाठी ते आजही प्रयत्न करत असतात, नवीन कबड्डीपटू तयार व्हावेत यासाठी तालुका व राज्य पातळीवर कबड्डी स्पर्धा आयोजित करण्याचा त्यांचा नेहमीच हातभार असतो. दहावीत शिकत असताना राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेत गोव्याच्या संघातून त्यांचा सहभाग होता. त्यावेळी संघाच्या यशात त्यांचा महत्वाचा वाटा राहिला. गोव्याच्या संघाचे त्यांनी अनेक वेळा कर्णधारपद सांभाळले व आपल्या संघाला पारितोषिके मिळवून दिली आणि एक उत्कृष्ठ खेळाडू म्हणून त्यांनी नावलौकिक प्राप्त केला. 1986 ते 2005 या दरम्यान ते खेळाडू आणि प्रशिक्षक म्हणूनही कार्यरत राहिले

1988 साली ते अग्निशामन दलात रुजू झाले. आपल्या आठ तासांच्या ‘ड्युटी’तच आपला कार्यकाळ असतो हे त्याना मान्य नाही. नोकरीपलीकडे जो वेळ मिळेत तोदेखील समाजाच्या हितासाठी वापरावा यासाठी ते सतत धडपडत असतात. सरकारी नोकरी करूनही समाजसेवा करता येते हे त्यांच्याकडे पाहून कळते.

6 मार्च 2006 रोजी माशेल येथे सुमारे 60 ते 70 फुट खोल परंतु वापरात नसलेल्या विहिरीत आत्महत्या करण्याच्या उद्देशाने एका मुलीने उडी मारली होती . त्यावेळी प्रशांत ओल्ड गोवा कार्यालयात कार्यरत होते. प्रशांत जेव्हा त्या मुलीला वाचवायला विहिरीत उतरले तेव्हा प्रथम त्याना त्या विहिरीतील कोब्रा नागाचा सामना करावा लागला. चार तासाच्या झुंजीनंतर प्रशांत यांनी त्या मुलीला जीवनदान मिळवून दिले. सापाचा सामना करत, आपला जीव धोक्यात अस्तानाही आपले कर्तव्य निभावणाऱ्या प्रशांत यांची सरकारने दखल घेत 2006 साली मुख्यमंत्री सुवर्णपदक देवून सन्मानपुर्वक गौरव केला. खान्डोळा पंचायातीनेही रोख रक्कम देवून त्यांचा गौरव केला , 2015 साली कुर्टी, फोंडा येथे दरड कोसळली होती. दोघेजण मातीच्या ढिगाऱ्याखाली सापडले होते. त्या दोघानाही त्या मातीतून काढून जीवनदान देल्याचे काम प्रशांत यांनी केले . त्यासाठी त्याना खात्याकडून गौरवही लाभला.

एका दिवाळीच्या दिवशी प्रशांत आपल्या खाजगी वाहनाने आपल्या पत्नीला घेवून डॉक्टरकडे जात होते. त्याच वेळी मुंबईचा एक टेम्पो पेडणेमार्गे म्हापसा येथे जात होता, त्या वाहनामधून धूर येत होता हे वाहनचालकाच्या लक्षात आले नव्हते. प्रशांत यांच्या लक्षात येताच त्यांनी त्या वाहनाचा पाठलाग करून ते वाहन थांबवले, सर्व प्रवाशाना खाली उतरवून घेतले आणि आग विझवली.

2017 मध्ये तोरसे येथील राष्ट्रीय महामार्ग 17 वर असलेल्या आंब्याच्या झाडाला ट्रकाची धडक बसून ट्रक शेजारी दुकानात घुसला होता केबिनचा चक्काचूर झाला होता. चालक केबिनमध्ये अडकून पडला होता. वेळ रात्रीची होती. सहकार्याला कुणीच नव्हते. प्रशांत यांनी दोन तास मदतकार्य करून त्या चालकाला जीवनदान मिळवून देण्यास मदत केली.

10 मार्च 2017 रोजी मालपे उतरणीवर चार वाहनांचा अपघात झाला होता. त्यातील एक मोठा कंटेनर रस्त्याच्या मधोमध दुभाजक ओलांडून उलटा झाला होता. या कंटनरच्या केबिनचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. त्यात एक युवक अडकून पडला होता. प्रशांत व त्यांच्या सहकाऱ्यांनी त्यालाही जीवनदान दिले. या त्यांच्या कामासठी मुख्यमंत्री लक्ष्मिकान्त पार्सेकर यांनी त्याना सौर्यपदक देवून गौरव केला . आपल्या कर्तव्यात आपली बहिण अनुराधा शिरोडकर, भावोजी अनिल शिरोडकर, भाऊ प्रेमनाथ व पत्नी यांचे सदोदित आपल्याला प्रोत्साहन मिळते असे ते सांगतात.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Subhash Velingkar: सुभाष वेलिंगकरांची अटक अटळ? कोर्टाचा दिलासा नाही, जामीन अर्जावर सोमवारी सुनावणी

Saint Francis Xavier: सुभाष वेलिंगकरांच्या अटकेसाठी उद्रेक; पर्यटक, विद्यार्थ्यांचे हाल, गोव्यात दिवसभर कुठे काय घडलं?

BKC ते आरे JVLR पंतप्रधान मोदींचा मेट्रोने प्रवास; शाळकरी विद्यार्थी, महिलांशी साधला संवाद पाहा Video

Goa HSE Board Exam: गोवा बारावी बोर्ड परीक्षेच्या वेळापत्रकात बदल, JEE परीक्षेमुळे मोठा निर्णय

गिरीत बंदिस्त खोलीत आढळला मृतदेह , संशयास्पद मृत्यूचा कुटुंबियांचा अंदाज; गोव्यातील ठळक बातम्या

SCROLL FOR NEXT