मधू य.ना. गावकर
गिमोणे पठारावरून वाहणाऱ्या वरगावच्या ओहळाच्या पात्रात टप्याटप्यावर वसंत बंधारे उभे केल्यास तिथल्या बागायतीला आणि भातशेतीला मुबलक पाणी मिळून वरगाव आणि तिवरे गाव सुजलाम, सुफलाम झाल्याशिवाय राहणार नाही.
वरगाव आणि तिवरे हे गाव महसुलाने जरी वेगळे असले तरी या दोन गावांचे नाते आहे. दोन्ही गावांवरगाव आणि तिवरे हे गाव महसुलाने जरी वेगळे असले तरी या दोन गावांचे नाते आहे.
(goa farming culture)
दोन्ही गावांना बेतकी, वरगांव, तिवरे आणि अडकोण गावांच्या माथ्यावरील पठाराने जैवविविधतेला पोसण्यासाठी पाण्याचा स्रोत पुरवलेला आहे. गिमोणे पठाराच्या दक्षिण बाजूने अडकोण गावचे आट्याळ नावाने ओळखले जाणारे, शेतीबागायतीने नटलेले माळमैदान आहे, त्याच्या कपारीतला पाण्याचा झरा वर्षाचे बाराही महिने जंगली जनावरांची पाण्याची सोय करतो, त्यामुळे गिमोणे डोंगरावर गवे रेडे, डुक्कर, ससे, मेरू, बिबटे अशा जनावरांचे वस्तिस्थान आहे. ना बेतकी, वरगांव, तिवरे आणि अडकोण गावांच्या माथ्यावरील पठाराने जैवविविधतेला पोसण्यासाठी पाण्याचा स्रोत पुरवलेला आहे. गिमोणे पठाराच्या दक्षिण बाजूने अडकोण गावचे आट्याळ नावाने ओळखले जाणारे, शेतीबागायतीने नटलेले माळमैदान आहे, त्याच्या कपारीतला पाण्याचा झरा वर्षाचे बाराही महिने जंगली जनावरांची पाण्याची सोय करतो, त्यामुळे गिमोणे डोंगरावर गवे रेडे, डुक्कर, ससे, मेरू, बिबटे अशा जनावरांचे वस्तिस्थान आहे.
गिमोणे पठाराच्या दक्षिण बाजूने वरगावच्या ओहळाचा जन्म होतो, त्या उगमाकडे आपण गेल्यास ओहळाच्या अद्भूत उगमाचे नैसर्गिक दर्शन घडते, मात्र उन्हाळ्यात ओहळाच्या उगमाकडील खडकाळ भाग सुकलेला असतो, पठाराच्या खालच्या भागात प्रवास केल्यास हा ओहळ आकाशातून उडी मारल्याप्रमाणे गिमोणेच्या कुळागरी भागात आपले अस्तित्व दाखवून घळीतून तिथल्या दोन तटांवरील कुळागराला पाणी पुरवून माड, सुपारी,आंबा, फणस, काजू, केळी, अननस, मिरी, जांब, अशा फळफळावळीच्या झाडाना जगण्याची सोय करतो.
तेथून तो खालच्या भागातील घोंगरे बागायतीतून शांतादुर्गा देवळाकडे आणखी एक लहान ओहळाला कवेत घेऊन, आपला प्रवाह वाढवत धुमकांच्या झरीकडे पोहचतो. वरगावच्या शेतीला पाणी पुरवत मग तिवरेची शेती पिकवण्यास साहाय्य करतो.
वरगावच्या घोंगरे बागायतीच्या डोंगराळ भागात वाघाची गुहा आहे. त्या गुहेत पूर्वी पट्टेरी वाघाचे वास्तव्य होते, आज त्या डोंगराळ भागात अडगळीच्या ठिकाणी गेल्यास गुहा पहावयास मिळते. पठारावर रानडुक्कर, ससे, मेरू, कोल्हे, माकड आणि सरपटणारे प्राणी आहेत. हे रानटी प्राणी पठारावर संचार करून संध्याकाळच्या वेळी ओहोळावर पाणी पिण्यास येतात. याच ओहळाच्या पाण्यावर वरगाव आणि तिवरेची भलीमोठी मैदानी दोन पिकांची सर्द, वायगण अशा नावांनी ओळखली जाणारी उबीर, मायणोमार, गने, डोहलोआख, केगदीआख, मुळाआख, बोकडउबीर, फाल्लार, रणवत, मळी, मारकुणगो, म्हाल्याचो कुडको, कळमार गाण्यार, पूर्वकाळी शिट्टो, नेरमार, दामगो, आजगो, खोचरी, नवण अशी भातपिके पिकायची. त्या रुचकर भातापासून पोहे करून स्थानिक गोवाभर पुरवीत होते.
पोहे बनवण्यासाठी प्रत्येक शेतकऱ्याच्या घरात लाकडी लाट होती, तिवरेची शेती पिकवण्यास गिमोणेच्या पठारावरून वाहत येणारे पावसाचे पाणी, म्हणजे तिवरे वरगावचे जीवन होय. शेताच्या मध्यभागातून वाहत जाणारा गोड्या पाण्याचा ओहळ जुवारवाड्याकडील बांधाला आपल्या प्रवाहाने छेदत, तो खाजन शेतातील खार पाण्यात मिसळून त्या पाण्यावर करंगुट आणि मुणे भात पिकवून नंतर त्या ओहळाचे पाणी भल्या मोठ्या कोळंब नावाच्या तलावात जाते. गोडेपाणी आणि खारपाणी यांचा मिलाफ होऊन , समुद्रीय जैवविविधतेला म्हणजे मत्स्यसंपदेला जन्म देण्याचे काम हा प्रवाह करतो. कोळंब तलावाचा पाण्याचा साठा पुढे बाणस्तारी -माशेल रस्ता पार करून, तिथल्या मानशीतून बाहेर पडून वाहत कुंभारजुवे खाडीला मिळतो.
आज पूर्वजांच्या कामाना फाटा देऊन आपण शेती करतो, नवीन नवीन बी- बियाणे आणि रासायनिक खते वापरतो. त्याने शेतातील गोडी मासळी, कोगा नष्ट होतो, शेतीचा पोत जाऊन शेती नापीक बनते, हे आपण लक्षात ठेवत नाही. एकदाच मशीन नांगरणीने रोपणी करतो, त्याने जमीन कुजत नाही. पूर्वी बैलाच्या नांगरणीने जमीन चार,पाच वेळा खणून लोण्याप्रमाणे मऊ बनवून, शेतीला शेणखत घालून बियाणे पेरायचे. त्या बियाण्याला ओहळाचे पाणी सोडून तीन साडेतीन महिन्यांनी नैसर्गिक शेती पिकायची. अशा भाताचे लाठीने बनवलेले पोहे खाण्यास रूचकर लागायचे.
बेतकी गिमोणे पठाराला बेतकी, वरगाव, तिवरे आणि अडकोण गावच्या सीमा भिडलेल्या आहेत. पठाराच्या खालच्या भागात धुमकान नावाने प्रसिध्द सदोदित वाहणारी झर वरगावच्या नाल्यास मिळते. झरीला थंड आणि गरम असे दोन झरे वाहतात. उन्हाळ्यात या झरीवर आंघोळीस लोकांची गर्दी असते. शिवाय तिवरेला दोन झरी आहे. घोंगरे बागायतीच्या डोंगराळ भागात कारवीचे जंगल होते. ते फुलल्यावर त्या फुलातील मध खाण्यासाठी मधमाशांची झुंबड उडायची, आमच्या बालपणी गुराना चरावयास नेताना हा नजराणा पहावयास मिळायचा, शिवाय पठारावर, चुरण, कणेर, हासळ, चार, फातरफळ, पिटकळ असा रानमेवा चाखावयास मिळत होता. गिमोणे पठाराच्या खालच्या भागात तिथल्या लोकांची कुळागरे, काजूच्या बागायती मोठ्या प्रमाणात आहेत. पठारावरून वाहणाऱ्या वरगावच्या ओहळाच्या पात्रात टप्याटप्यावर वसंत बंधारे उभे केल्यास तिथल्या बागायतीला आणि भात शेतीला जास्त पाणी मिळून वरगाव आणि तिवरे गांव सुजलाम, सुफलाम झाल्याशिवाय राहणार नाही. आजच्या युवा पिढीने पुढाकार घेतल्यास मानवाच्या भविष्याचा किनारा नक्कीच दूर नाही.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.