Cape  Dainik Gomantak
ब्लॉग

Religious Traditions of Goa : देवभूमी केपे तालुका जगासाठी आदर्श! विजय देसाई

मात्र आपल्‍या चिमुकल्‍या गोव्यात धार्मिक सलोखा जपून श्रद्धेला अग्रथान देणारे लोक मोठ्या संख्‍येने आहेत. केपे तालुका तर संपूर्ण जगाला आदर्श देणारा ठरला आहे.

गोमन्तक डिजिटल टीम

Religious Traditions of Goa : आज आपल्या देशात जाती-धर्माच्या नावावर भेदभाव उफाळून येत आहे. त्यातून संघर्षाची ठिणगी पडण्याची भीती निर्माण झाली आहे. काही धर्मवेडे समाजात फूट पाडण्‍याचा प्रयत्न करीत आहेत.

मात्र आपल्‍या चिमुकल्‍या गोव्यात धार्मिक सलोखा जपून श्रद्धेला अग्रथान देणारे लोक मोठ्या संख्‍येने आहेत. केपे तालुका तर संपूर्ण जगाला आदर्श देणारा ठरला आहे.

या तालुक्‍यात मुख्‍य तीन मंदिरे आहेत व ती म्‍हणजे फातर्पा येथील श्री शांतादुर्गा कुंकळ्ळीकरीण, पर्वत-पारोडा येथील श्री चंद्रेश्‍‍वर आणि जांबावली-केपे येथील श्री दामोदर. विशेष म्‍हणजे ही देवस्‍थाने हिंदूंबरोबरच सर्वधर्मीय भाविकांसाठीही श्रद्धास्‍थाने मानली जातात.

आज रविवार दि. १३ ऑक्‍टोबरपासून राज्‍यात नवरात्रीची धूम सुरू झाली आहे. देवभूमी फातर्पा येथील श्री शांतादुर्गा कुंकळ्‍ळीकरीण संस्थानात हा उत्‍सव मोठ्या थाटामाटात सुरू झाला आहे.

फातर्पा येथीलच श्री शांतादुर्गा फातर्पेकरीण संस्थान, पारोडा पर्वतावर विराजमान श्री चंद्रेश्‍‍वर भूतनाथ मंदिर व जांबावलीच्या श्री दामोदर संस्थानात नवरात्रोत्सवाची धूम नऊ दिवस सुरू असेल. दक्षिण गोव्यातील केपे तालुक्यामध्‍ये येणारी ही प्रमुख देवस्थाने आहेत.

श्री चंद्रेश्र्वर भूतनाथाचा जत्रोत्सव, जांबावलीच्‍या दामबाबाचा गुलालोत्‍सव व श्री शांतादुर्गा कुंकळ्‍ळीकरीण देवीचा जत्रोत्सव व छत्रोत्सव म्हणजे भाविकांसाठी पर्वणीच असते.

जे लोक धर्मांतराला बळी पडून ख्रिस्ती झाले, त्यांचा देव बदलला, परंपरा बदलली, मात्र ते आपल्या आराध्य देवतेला विसरले नाहीत. कुंकळ्‍ळीकरीण देवीला आजही ख्रिस्ती भाविक भजतात. ‘आपण देवीचा मांगणीचा’ असे अभिमानाने सांगणारे अनेक ख्रिस्ती भक्त कुंकळ्‍ळीत आजही आहेत.

हिंदू-ख्रिस्ती धार्मिक सलोख्याचे खरेखुरे स्वरूप आपल्याला जाणून घ्यायचे असेल तर ही देवभूमी योग्य स्थान आहे.

दामबाबाला भजतात शेकडो ख्रिस्‍ती भाविक : हिंदू-ख्रिस्ती भक्तांचा धार्मिक सलोखा जसा फातर्पा व चंद्रेश्‍‍वर पर्वतावर पाहायला मिळतो, तसाच धार्मिक सलोखा जांबावलीत श्री दामोदर देवस्‍थानात दिसून येतो.

देव दामोदराला भजणारे अनेक धर्मांचे लोक मठग्रामनगरीत आहेत. दामबाबाचा गुलाल गालावर लावला नाही तर चुकल्या-चुकल्यासारखे वाटणारे ख्रिस्ती भक्त आहेत.

पोर्तुगीजकाळात ज्यांचे धर्मांतरण झाले, मात्र मूळ हिंदू व दामबाबांना आराध्य दैवत मानणारे ख्रिस्ती भक्त आजही आपला धर्म सांभाळून श्री दामोदराच्या चरणी लीन होतात.

श्री दामोदर महाराजांना मानणारे कुंकळ्‍ळीत अनेक ख्रिस्ती भक्त आहेत. काही ख्रिस्ती सोमवारी ‘शिवराक’ ठेवून दामोदरबाबाच्‍या दरबारात हजेरी लावतात.

श्री शांतादुर्गा कुंकळ्‍ळीकरीण

देवी म्‍हणजे ‘मामाय सायबीण’

या देवस्‍थानांची खासियत म्‍हणजे येथे सर्वधर्मीय लोक भक्तिभावाने माथा टेकवतात. ही हिंदू धर्मियांची श्रद्धास्थाने आहेत यात वादच नाही, परंतु तेथे धर्माची भिंती गळून पडतात व श्रद्धेचे पूल व भक्तांच्या भावभावनांचे इमले उभे राहतात.

श्री शांतादुर्गा कुंकळ्‍ळीकरीण देवीला जेवढे हिंदू भजतात, तेवढेच ख्रिस्ती भक्तही मानतात. ख्रिस्ती धर्मगुरू हिंदू देवदेवतांना आंधळे देव किंवा दगडाचे देव म्‍हणून संबोधत.

परंतु गेल्या अनेक पिढ्यांपासून येथील ख्रिस्ती लोक देवी कुंकळ्‍ळीकरीणीला आजही ‘मामाय सायबीण’ म्हणून भजतात. देवीच्या उत्सवात हिंदू भक्तांबरोबरच ख्रिस्ती भक्तही तेवढ्याच उत्साहाने सहभागी होतात.

‘‘मी श्री चंद्रेश्‍‍वराचा भक्त. आमचा देव पर्वतावर बसला आहे’’, असे सांगणारे देव चंद्रेश्‍वर भूतनाथाला मानणारे अनेक ख्रिस्ती भक्त आहेत. काही काम किंवा नवीन उद्योग सुरू करायचा असेल तर प्रसाद-पाकळी घेऊन चंद्रेश्र्वराचा कौल घेणारे ख्रिस्ती भक्त आहेत.

चंद्रेश्वर पर्वताच्या मुळात मुळसा या गावात राहणारे ख्रिस्ती लोक चंद्रेश्वर भूतनाथाला भजतात. एवढेच नव्हे आपला रक्षणकर्ता पर्वतावर विराजमान आहे असे मोठ्या अभिमानाने सांगतात.

चंद्रेश्वराच्या जत्रेला महारथ ओढायलाच हवा या श्रद्धेने पर्वत चढणारे ख्रिस्ती लोक व देवाचे हिंदू भजक एकत्र येऊन कौल घेतात. हे धार्मिक सलोख्याचे उदाहरण सर्वांनीच अंगिकारले पाहिजे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

संत फ्रान्सिस झेवियर विद्यालयाला कारणे दाखवा नोटीस, धबधब्यावर विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात घातल्याचा ठपका

Goa Live News Today: तरुणांना प्रोत्साहन देण्यासाठी दक्षिण महाराष्ट्रासह गोव्यातही अग्निवर भरतीची रॅली

Miraai Project Goa: पडून असणाऱ्या स्क्रॅप वाहनांची समस्या संपणार! ‘मिराई’ प्रकल्पाचे मडकईत उद्‍घाटन; आमदार कामत यांची उपस्थिती

UCC and One Nation One Election : UCC, एक देश एक निवडणुकीची देशाला गरज; मुख्यमंत्री सावंत यांचे संविधान दिनी पुन्हा भाष्य

Cooch Behar Trophy 2024: दोन पराभवानंतरही गोव्याचा 'यश'वर विश्वास; छत्तीसगडविरुद्धच्या लढतीसाठी टीम सज्ज

SCROLL FOR NEXT