Goa Monsoon 2023:
Goa Monsoon 2023:Dainik Gomantak

Goa Monsoon 2023: परतीच्या पावसाचा डिचोली- सत्तरीला तडाखा; बळीराजा चिंताग्रस्त

जोराचा वारा: हरवळेत शेडसह रिक्षावर भलेमोठे झाड कोसळले, अनेक घरांचे नुकसान

Goa Monsoon 2023: नैऋत्य मॉन्सून परतीच्या मार्गावर असून राज्यात अनेक ठिकाणी या परतीच्या पावसाने पुन्हा जोरदार हजेरी लावल्याने हवेत गारवा निर्माण झाला आहे. डिचोली, सत्तरी तालुक्यासह साखळी, म्हापसा आणि माशेल परिसरात आज परतीच्या पावसाने गडगडाटासह अक्षरशः झोडपून काढले.

काही ठिकाणी झाडे उन्मळून पडली असून घरांचे नुकसान झाले आहे. या पावसाचा मोठा फटका भातशेतीला बसत असून कापणीसाठी आलेले भात पीक आडवे होत असल्याने शेतकरी चिंतेत आहेत.

आजच्या पावसाच्या तडाख्यात हरवळे येथे भलेमोठे झाड शेडवर पडण्याची घटना घडली. या घटनेत हजारो रुपयांचे नुकसान झाल्याचे वृत्त आहे. मयेसह अन्य काही भागातही पडझड झाल्याचे वृत्त आहे. दुपारी पावणेचार वाजण्याच्या सुमारास पर्जन्यवृष्टी सुरू झाली. साधारण पाऊणतास जोरदार पाऊस पडला. पावसामुळे जनजीवनही काहीसे विस्कळीत झाले.

बळीराजा चिंताग्रस्त

यंदा सर्वत्र भातशेती चांगली फुलली आहे. त्यातच कालपासून परतीच्या पावसाची चाहूल लागल्याने शेतकरी चिंताक्रांत बनला आहे. पाऊस पडत राहिल्यास भाताची कणसे आडवी होऊन नासाडी होण्याची भीती आहे.

त्यामुळे काही शेतकऱ्यांच्या कपाळावर आट्या पडल्या आहेत. पावसाचा कहर चालूच राहिल्यास हातातोंडाशी आलेला घास हिरावला जाणार, अशी भीती प्रमोद घाडी यांनी व्यक्त केली आहे.

Goa Monsoon 2023:
Tiger Reserve Project: राज्‍य सरकारकडून वाढीव मुदतीसाठी हालचाली सुरू; SCने अंतरिम स्थगिती फेटाळल्‍याने मोठा पेच

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com