Diwali 2023 Dainik Gomantak
ब्लॉग

Diwali 2023: दीपावली: प्रथा, परंपरा व आख्यायिका

Diwali 2023: तिमिरातून तेजाकडे नेणारा सण म्हणजे दिवाळी. दिवाळीचा सण मोठा, नाही आनंदाला तोटा, असे म्हटले जाते.

दैनिक गोमन्तक

Diwali 2023: प्राचीन काळातील यक्षरात्री, दीपमाला, दीप प्रतिपदुत्सव आणि आताची दिवाळी. दीपावली किंवा दिवाळी म्हणजे दिव्यांचा उत्सव. त्याच्या जितक्या प्रथा, तितक्या परंपरा दिवाळी एक प्राचीन उत्सव आहे. दिवाळी शरद ऋतूत साजरा केला जातो. अंधारावर प्रकाशाच्या विजयाचे प्रतीक म्हणून दिवाळी साजरी केली जाते.

अश्विन कृष्ण द्वादशी म्हणजचे वसुबारस ते कार्तिक शुद्ध द्वितीया म्हणजचे भाऊबीज या कालावधीत दीपोत्सव साजरा केला जातो. दिव्यांची आणि त्यावरोबरीने आनंदाची उधळण करणारा हा सण राज्यातह देशविदेशात साजरा केला जातो. या सणाला घरात व घराबाहेर तेलाचे लहान दिवे लावले जातात. उंच जागी आकाशकंदील लावला जातो. या सणाच्या अनेक प्रथा, परंपरा व आख्यायिका आहेत.

महावीर संवत्'चा आरंभ

जैन धर्माचे चोविसावे तीर्थंकर भगवान महावीर यांनी दिवाळीच्या दिवशीच बिहारमधील पावापुरी येथे अवतार सांगता केली होती. "महावीर सवंत्" त्यांच्या दुसऱ्या दिवशी सुरू होते. त्यामुळे अनेक प्रांतातील लोक याला नवीन वर्षांची सुरुवात मानतात.

प्राचीन जैन ग्रंथात दीपोत्सवाचे वर्णन आहे. महावीर निर्वाणामुळे जी अंर्तज्योती कायमची विझून गेली होती, तिची कमतरता पूर्ण करण्यासाठी आपण बहियोंतीचे प्रतीक म्हणून दिवे लावू, असे कल्पसूत्रात सांगितले आहे. मोगल वंशाचे शेवटचे सम्राट बहादुरशहा जफर दिवाळी सणाच्या रूपात साजरी करत असत, असे सांगितले जाते.

पावसाळा संपून नवीन पिके हाती आल्यानंतर शरद ऋतूच्या ऐन मध्यभागी, आश्विन व कार्तिक या महिन्यांच्या संधिकाळात हा सण येतो. उपलब्ध पुराव्यानुसार, दिवाळी हा सण किमान तीन हजार वर्षे जुना आहे. लक्ष्मीपूजनाच्या प्राचीन काळातील उपलब्ध असलेल्या संदर्भानुसार अगोदर रात्री कुबेरपूजन करण्याची रीत होती.

कुबेर हा शिवाचा खजिनदार आणि धनसंपत्तीचा स्वामी मानला जातो. दीपप्रज्वलन करून यक्ष आणि त्यांचा अधिपती कुबेराला निमंत्रित करून पुजणे हा मूळचा सांस्कृतिक कार्यक्रम होता. परंतु, गुप्तकाळात वैष्णव पंथाला राजाश्रय मिळाल्याने आधी कुबेराबरोबरच लक्ष्मीचीही पूजा होऊ लागली. विविध ठिकाणी झालेल्या उत्खननात कुशाण काळातील अनेक मूर्ती सापडल्या आहेत. त्यामध्ये कुबेर आणि लक्ष्मी एकत्र दर्शविले आहेत.

चौदा वर्षांचा वनवास संपवून रामचंद्र सीतेसह अयोध्येला परत आला, तो याच दिवसांत. श्रीरामांचे स्वागत करण्यासाठी प्रजाजनांनी संपूर्ण नगरीत दिवे प्रज्वलित केले होते, असे सांगितले जाते. पण त्यावेळी त्याचे स्वरूप आजच्यापेक्षा खूपच भिन्न होते. प्राचीन काळी हा यक्षांचा उत्सव मानला जायचा.

अंधार दूर करून प्रकाशाचे अस्तित्व निर्माण करणारा दीप मांगल्याचे प्रतीक मानला जातो. याच्या प्रकाशाने आपल्या जीवनातील अंधकार दूर व्हावा म्हणून, हा दीपोत्सव साजरा केला जातो. दुसरीकडे, महाभारत काळात श्रीकृष्णाने अत्याचारी नरकासुराचा वध केल्यानंतर गोकुळवासीयांनी आपला आनंद दिवे लावून व्यक्त केल्याची कथा प्रचलित आहे.

देवीने महाकालीचे रूप धारण करून राक्षसांचा वध केला होता. त्याचा वम केल्यानंतरही महाकालीचा क्रोष कमी झाला नव्हता. तेव्हा भगवान शंकराने स्वतः देवी चरणी लोटांगण घातले. शंकराच्या शरीर स्पशनि महाकालीचा क्रोध शांत झाला. त्याची आठवण म्हणून लक्ष्मीची पूजा केली जाते. या दिवशी तिच्या रौद्ररूपाची पूजा करण्याची प्रथा आहे. बळीराजाने आपल्या पराक्रमाच्या जोरावर त्रैलोक्यावर विजय मिळविला होता.

या विजयाने भयभीत झालेल्या देवांनी भगवान विष्णूची प्रार्थना केली. त्यांची प्रार्थना ऐकून विष्णूने वामन रूप धारण करून वळी राजाकडून लोन यायाने त्र्यैलोक्य घेतले. बळीच्या दानशूरपणामुळे प्रसन्न झालेल्या विष्णूने त्याला पाताळाचे राज्य देऊन भू. लोकवासी त्याच्या आठवणीनिमित्त प्रत्येक वर्षां दिवाळी साजरी करतील, असे अश्वासन दिल्याचे सांगितले जाते.

सुवर्ण मंदिराचे बांधकाम दिवाळी दिनीच

शिखांचे सहावे गुरू हरगोविंदसिंग बादशाह जहांगीरच्या कैदेतून सुटून कार्तिक अमावास्येच्या दिवशी अमृतसरला आले होते, असे म्हटले जाते. अमृतसर येथील सुवर्णमंदिराचे बांधकाम दिवाळीच्या दिवशी सुरू झाले होते. गौतम बुद्धांच्या अनुयायांनी त्यांच्या स्वागतासाठी लाखो दिवे लावून दिवाळी साजरी केली होती.

सम्राट विक्रमादित्याचा राज्याभिषेक दिवाळीच्या दिवशी झाला. त्याच दिवशी दिवे लावून जनतेने आनंद साजरा केला होता, असे सांगितले जाते. पंजाबमध्ये जन्मलेल्या स्वामी रामतीर्थ आणि महाप्रयाण या दोघांचा जन्म दिवाळीच्या दिवशी झाला होता. त्यांनी दिवाळीच्या दिवशी गंगाकिनारी स्नान करताना "ओम" म्हणून समाधी घेतली होती.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Battle of Galwan: रक्ताने माखलेला चेहरा, हातात धारदार शस्त्र अन् डोळ्यात देशभक्तीची चमक, 'गलवान'मधील सलमानचा पहिला लूक आला समोर

ED Goa: गोव्यात ईडीची झाडाझडती; 'सडा अर्बन'ची 1.05 कोटींची मालमत्ता तर जमीन हडप प्रकरणी संदीप वझरकर 3.19 कोटींची जमीन जप्त

Video: अप्रतिम अन् शानदार...! भर पावसात मुलांसोबत 'गजराज'नं लुटला क्रिकेटचा आनंद; सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल

Goa: भर पावसात प्रवासी बोट नदीत बुडाली; बाहेर काढण्यासाठी गोवा सरकारने 11 दिवसांत खर्च केले 20 लाख रुपये

Multiple Organ Failure Diseases: एकाच आजारानं हृदय, यकृत अन् मूत्रपिंड खराब होऊ शकतं का? जाणून घ्या वैज्ञानिक कारण अन् प्रतिबंधात्मक उपाय

SCROLL FOR NEXT