Sambhaji Maharaj
Sambhaji Maharaj Dainik Gomantak
ब्लॉग

Sambhaji Maharaj: अखंड शौर्याचे प्रतिक ! छत्रपती संभाजी महाराज

दैनिक गोमन्तक

सर्वेश बोरकर

‘हा युवराज जरी लहान असला तरी धैर्यशील आहे. आपल्या पित्याच्या कीर्तीस साजेल असाच शूर आहे. शिवाजी महाराजांसोबत राहून तो युद्धकलेत तरबेज झाला आहे.’

हिंदू नववर्ष गुढीपाडव्याच्या आदल्या दिवशी (फाल्गुन अमावास्येला) त्यांनी आपल्या प्राणांची आहुती दिली, त्यामुळे छत्रपती संभाजी महाराजांना धर्मवीर (धर्माचे रक्षक) ही पदवी प्राप्त झाली.

महाराष्ट्रात हिंदवी स्वराज्याचे संस्थापक, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या एकाएकी अकाली जाण्याने, रयतेचा आधार हरवला होता. आपले काय होणार, या चिंतेत जनता असतानाच संभाजी महाराज यांनी स्वत:स राज्याभिषेक करून घेत, जनतेला पुन्हा हरवलेला आधार दिला. 16 जानेवारी 1681 रोजी संभाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला.

स्वराज्याचे दुसरे छत्रपती होऊन छत्रपती शिवाजी महाराजांनी प्रस्थापित केलेली व्यवस्था यापुढेही तशीच राहील, अशी ग्वाही त्यांनी जनतेला दिली. राज्याभिषेकाप्रसंगी कैद्यांना मुक्त करण्याचा रिवाज होता. त्या रिवाजाप्रमाणे छत्रपती संभाजी महाराजांनी कैद्यांना मुक्त केले व मंत्रिमंडाळात नेमून त्यांच्यावर कारभाराची जबाबदारी सोपवली.

छत्रपती संभाजी महाराजांनी राज्याभिषेकाच्या या मंगलप्रसंगी स्वतःच्या नावाची नाणी पाडली, ज्यावर पुढच्या बाजूला ‘श्री राजा शंभू’ तर मागच्या बाजूला ‘छत्रपती’ अशी अक्षरे कोरलेली होती. छत्रपती संभाजी महाराजांच्या राज्याभिषेकानंतर लगेचच बुऱ्हाणपूरवर छापा टाकून त्यांनी 1 कोटी होनांची दौलत स्वराज्यात आणली.

तसेच पुढील आठ वर्षांत शिवरायांच्या स्वराज्यात दुपटीने वाढ केली, सैन्य आणि खजिन्यातही तिपटीने वाढ झाल्याचा उल्लेख आहे. या नव्या दमाच्या कुशल, पराक्रमी सेनानीच्या नेतृत्वाखाली मोहीम फत्ते करण्यासाठी जुने जाणते उत्साही सरदारही तत्पर असायचे, इतकी छाप छत्रपती संभाजी महाराजांनी आपल्या युद्धकौशल्याने पाडली होती. सन 1672च्या सुमारास हिंदुस्थानात प्रवास करणारा एक फ्रेंच प्रवासी अ‍ॅबे कॅरे म्हणतो,

‘हा युवराज जरी लहान असला तरी धैर्यशील आहे. आपल्या पित्याच्या कीर्तीस साजेल असाच शूर आहे. शिवाजी महाराजांसारख्या युद्धकुशल पित्यासोबत राहून तो युद्धकलेत तरबेज झाला आहे. चांगले वयोवृद्ध सेनापतीही संभाजी महाराजांची बरोबरी करू शकणार नाहीत इतके ते तरबेज आहेत.

छत्रपती संभाजी राजे मजबूत बांध्याचे असून अतिरूपवान आहे. सैनिकांची त्यांच्यावर खास मर्जी आहे. ते त्यांना शिवरायांसारखाच मान देतात. फरक इतकाच की, या सैनिकांस संभाजी महाराजांच्या हाताखाली लढण्यात विशेष धन्यता वाटते.’

तो 1686चा काळ होता. बादशाह औरंगजेबाने मराठा साम्राज्याच्या चारही बाजूंनी आपली पकड घट्ट करून छत्रपती शिवाजी महाराज यांच्या हिंदवी स्वराज्याचा सर्वनाश करण्याचा निर्णय घेतला होता. पोर्तुगिजांचा व्हॉइसरॉय फ्रान्सिस्को डी ताव्होरा यांना भेटण्यासाठी त्याने आपला निरोप पाठवला होता. पोर्तुगीज हे मराठ्यांचे मित्र नव्हते.

गोव्यातील आणि कोकणातील मराठ्यांच्या वाढत्या प्रभावावर मात करण्यासाठी त्याने ही ईश्वरप्रणित संधी मानली होती. या मुघल करारावर स्वाक्षरी झाली आणि पोर्तुगिजांनी समुद्रात मोक्याच्या ठिकाणी मुघल नौदलाच्या जहाजांना मुक्त प्रवासाची परवानगी दिली आणि त्यांना तोफा आणि इतर दारूगोळादेखील पुरविला.

द्रष्टे असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांना पोर्तुगिजांच्या संभाव्य धोक्याची कल्पना होती. त्यांच्यावर अंकुश ठेवण्यासाठी त्यांनी गोव्यातील फोंडा किल्ला आधीच सुरक्षित केला होता. या लहानशा पण सामरिकदृष्ट्या महत्त्वाच्या किल्ल्याचे रक्षण शूर योद्धे येसाजी आणि कृष्णाजी कंक या पिता-पुत्रांसह इतर 600 मावळ्यांनी केले होते.

गोव्यात पोर्तुगिजांनी बळजबरीने ख्रिस्तीकरण केल्याच्या तक्रारी, स्थानिक हिंदूंकडून यापूर्वीच छत्रपती संभाजी महाराजांना प्राप्त झाल्या होत्या. पोर्तुगिजांनी मुघलांशी हातमिळवणी केल्याने शेवटचा पेच निर्माण झाला होता. मराठे मुघलांच्या धोक्यापुढे झुकतील, असे गृहीत धरून पोर्तुगिजांनी पुढे जाण्याचा निर्णय घेतला.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Land Grabbing Case: गोवा जमीन हडप प्रकरण; ईडीची 36 जणांविरोधात मनी लाँड्रिंगची तक्रार

Goa And Kokan Today's Live News: जेनिफर ऑलिवेरा यांचे सरपंचपद अबाधित

SSC Result Sanguem : सांगे तालुक्यात सरकारी शाळांची बाजी; दहावीच्या उत्तीर्ण विद्यार्थ्यांवर अभिनंदनाचा वर्षाव

Nepal: नेपाळनेही एव्हरेस्ट, MDH मसाल्यावर घातली बंदी; धोकादायक केमिकलबाबत केली कारवाई

Ponda News : दारूच्या नशेत पर्यटकांची दादागिरी; दाभाळ येथील प्रकार

SCROLL FOR NEXT