Photography  Dainik Gomantak
ब्लॉग

हा खेळ सावल्यांचा...

चंदन गावकरचे ‘प्ले ऑफ दि शॅडो’ (Play of the Shadow) या फोटोला (Photo) 45 व्या राज्य कला (Art) प्रदर्शनात स्थान मिळाले होते.

दैनिक गोमन्तक

चंदन गावकर याने आपल्या मोबाइलवर काढलेले हा फोटो, फ्रेम इट' या राष्ट्रीय छायाचित्र स्पर्धेत 'फोटो सर्कल सोसायटी' च्या रिबन पुरस्कारास प्राप्त ठरला. रोख रक्कम, रिबन आणि प्रमाणपत्र असे या बक्षीसाचे स्वरूप आहे. 'फोटो सर्कल सोसायटी' ही महाराष्ट्रामधील छायाचित्र क्षेत्रातील प्रतिष्ठित अशी संस्था आहे. ‘प्ले ऑफ दि शॅडो’ या चित्राला 45 व्या राज्य काल प्रदर्शनात स्थान मिळाले होते. तसेच राष्ट्रीय पातळीवर छायाचित्र प्रदर्शनात स्वीकारले गेले होते.

‘प्ले ऑफ द शॅडो’ या छायाचित्राबद्दल चंदन लिहितो, ‘2018 सालापासून प्रतिमा कैद करण्यासाठी मी स्मार्ट फोनचा (Smartphones) वापर करतो आहे. हे छायाचित्र मी करंजाळे किनाऱ्यावर 2019 च्या दरम्यान ‘अझुस झेन फोन-3 ’ या माझ्या पहिल्याच स्मार्ट फोनवर घेतले. मी किनाऱ्यावर फिरत होतो. जवळच एकटा आपली सायकल कडेला ठेवून मासेमारी करत होता. या सायकलमुळे तयार झालेल्या सुंदर सावल्या मला आवडल्या. संध्याकाळी चारच्या सुमारास सूर्याच्या बॅकलाईट’मुळे ही जादू घडली आहे. प्रतिमा तर अगदी साधारणच होती. मला वैयक्तिकरित्या अतिशय साध्या गोष्टीतले सौंदर्य कॅमेरात (Camera) टिपणे आवडते. साधेपणातच उत्कृष्टता असते असे मला वाटते. सौंदर्य सारीकडेच असून आपल्याजवळ ते समजून घेण्याची आणि क्षणात टिपण्याची क्षमता असावी. साधारणात जे ‘असाधारण’ आहे, ते नजरेत येण्यासाठी आपल्या प्रयत्नात सातत्य हवे.

चंदनच्या फोटोग्राफीची सुरुवात 2001 साली झाली. 2003 पासून त्याने राज्य, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरच्या फोटोग्राफी (Photography) स्पर्धेत भाग घ्यायला सुरुवात केली. त्याला लाभलेल्या पुरस्कारामुळे (Award) आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरच्या सन्मानामुळे त्याला ‘सिग्मा ॲकॅडमी ऑफ फोटोग्राफी’ या प्रतिष्ठित संस्थेचे आजीवन सदस्यत्व बहाल करण्यात आले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Ferrari Seized: महाराष्ट्रात नोंदणीकृत 7.5 कोटींची 'फेरारी' कर्नाटकमध्ये चालवली म्हणून केली जप्त; काय नेमकं प्रकरण? वाचा

Goa News Live: 54 जुन्या कदंब बस भंगारात; नव्या EV बसेस घेणार जागा

Operation Sindoor: 'भारत पाकिस्तानसोबत चीनशीही लढत होता...' ऑपरेशन सिंदूरबाबत भारतीय उप सेनाप्रमुखांचे मोठे वक्तव्य

BJP: इतिहासात पहिल्यांदाच भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची सूत्रे महिलेकडे जाणार? RSS चा ग्रीन सिग्नल; 'ही' तीन नावे चर्चेत

Goa Athletics: गोव्यात रंगणार 'मनोहर पर्रीकर स्मृती ॲथलेटिक्स स्पर्धा'; तारखा, ठिकाण जाणून घ्या..

SCROLL FOR NEXT