Chafa is Beautiful flowers in nature Dainik Gomantak
ब्लॉग

चाफ्या रे चाफ्या किती रे तुझे रंग...

अनेक वनस्पती संपूर्ण अंगावर पुष्पवैभव लेवून चैत्राच्या स्वागताला तयार होतात.

दैनिक गोमन्तक

गोवा: ऋतूचक्रामध्ये वसंत ऋतूला अनन्यसाधारण महत्त्व आहे. फाल्गुन पौर्णिमेनंतर वसंतोत्सवाला सुरुवात होते आणि हा उत्सव पुढे अनेक दिवस चालू राहतो. निसर्ग चारी बाजूंनी तरारून फुलून आलेला असतो. अनेक वनस्पती संपूर्ण अंगावर पुष्पवैभव लेवून चैत्राच्या स्वागताला तयार होतात. चैत्र प्रतिपदा म्हणजेच गुढीपाडवा. हिंदू धर्मसंस्कृतीमध्ये याला विशेष महत्त्व आहे. ही नव्या वर्षाची सुरुवात असते. या वसंतोत्सवामध्ये आणखीन एक झाड सर्वत्र फुलून आलेले दिसते. तो आहे चाफा. कवी, लेखक आणि साहित्यिकांचा हा आवडता वृक्ष आहे. आपल्याकडे हिंदू, ख्रिश्चन, बौद्ध धर्माच्या बहुतांश मंदिर परिसरात हा आढळतो.

आपल्याला धक्का बसेल, हा मूळ भारतीय नाहीच आहे. तो दक्षिण अमेरिकन- ब्राझिलियन आहे. आपल्या गोव्यात तर त्याच्या आठ दहा जाती आहेत. त्या तितक्याच आकर्षकही आहेत. आपल्याकडे त्या कधी आल्या याचा निश्चित नोंद नाही. मात्र जुन्या धर्मप्रसारक, प्रवाशांनी कधीतरी त्या आपल्याकडे आणल्या असाव्यात. त्यामागे त्यांची टिकून राहण्याची आणि पुनरुत्पादन करण्याची क्षमता असावी. कोणत्याही प्रकारच्या जमिनीत फांदी लावली तरी तो मूळ धरतो. या सर्व जाती प्लूमेरिया या एकाच जातीमध्ये येतात. यालाच फ्रॅगिपनी हे सामाईक नाव आहे. नव्या आयुर्वेदात याचे काही उपयोग आहेत. सध्या तो सर्वत्र फुललेला आहे. त्याला जवळून न्याहाळण्याची आणि त्यांचा मंद सुवास घेण्याची संधी सोडू नका.

- अनिल पाटील

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

मंत्रिपद नाही पण मायकल लोबोंना महामंडळ मिळाले; माजी उपमुख्यमंत्री कवळेकरांना कला अकादमीच्या अध्यक्षपदाची लॉटरी

Shetkari Aadhar Nidhi Scheme: पावसानं झोडपलं, सरकारनं सावरलं, 'डिसेंबरपर्यंत प्रति हेक्टर 40 हजार भरपाई देणार'; CM सावंतांची मोठी घोषणा

Bicholim: डिचोलीत दिवसाढवळ्या इमारतीचे गेट तोडताना परप्रांतीय युवकाला पकडले

Goa Live Updates: खोर्लीत शुक्रवारी आकाशकंदील स्पर्धा

फोंड्यात उभा राहणार रवी नाईक यांचा पुतळा; पालिकेने घेतले तीन महत्वाचे निर्णय

SCROLL FOR NEXT