Canacona city in Goa Dainik Gomantak
ब्लॉग

Goa: काणकोणात साधनसुविधांची वानवा

राज्‍यातील (Goa) चाळीस मतदारसंघांपैकी काणकोण मतदारसंघ आकाराच्या दृष्टीने सर्वांत मोठा आहे.

दैनिक गोमन्तक

काणकोण: राज्‍यातील (Goa) चाळीस मतदारसंघांपैकी काणकोण मतदारसंघ आकाराच्या दृष्टीने सर्वांत मोठा आहे. पोळे ते गुळे व आगोंद ते खोतीगाव असा त्याचा विस्तार असून त्‍यात लोलये, पैंगीण, श्रीस्थळ, आगोंद, गावडोंगरी, खोतीगाव पंचायत आणि काणकोण नगरपालिकेचा समावेश आहे. मतदारसंघ फेररचना करताना काणकोण तालुक्याचा महसुली गाव असलेले खोला पंचायत क्षेत्र केपे मतदारसंघाला जोडण्यात आले. त्यामुळे या पंचायत क्षेत्रात तालुका प्रशासनाचा अंमल आहे. मात्र पंचायत क्षेत्राचा विकास करण्याचे दायित्व केपेचे आमदार तथा उपमुख्यमंत्री चंद्रकांत कवळेकर यांच्याकडे जाते. (Canacona constituency is the largest of the forty constituencies in the state of Goa)

या मतदारसंघात ५७ मतदार केंद्रे आहेत. आता त्यामध्ये दोन अतिरिक्त मतदानकेंद्राची वाढ अपेक्षित आहे. प्राप्त माहितीनुसार मतदारसंघात क्षत्रिय पागी समाजाचे सुमारे ५५०० मतदार, ख्रिश्चन समाजाचे ३८००, सारस्वत समाजाचे ३५००, अनुसुचित जमातीचे १० हजार, क्षत्रिय मराठा समाजाचे ४८०० मतदार आहेत. आजपर्यत काणकोणातून रमेश तवडकर व वासू पायक गावकर वगळता अल्पसंख्याक मतदार नसलेल्या समाजातून निवडून आलेल्या आमदारांमध्ये संजय बांदेकर, जगदीश आचार्य, विजय पै खोत, इजिदोर फर्नांडिस यांचा समावेश होतो. सर्वाधिक अनुसूचित जमातीचे मतदार गावडोंगरी, खोतीगाव व श्रीस्थळ पंचायत क्षेत्रात आहेत.

संधीचे सोने करावे

सुंदर माझा गोवा, सुंदरच राहावा हीच प्रामाणिक अपेक्षा आहे. मुक्ती मिळून ६० वर्षे झाली, पण दुर्देवाने आम्ही अन्य राज्यांवर अवलंबून आहोत. मद्यार्क सोडल्यास इतर सर्व जीवनाश्यक वस्तू आम्हाला अन्य राज्यांतून आयात कराव्या लागतात. विशेष म्हणजे कष्ट करणाऱ्या मनुष्यबळासाठी आम्ही दुसऱ्या राज्यांवर अवलंबून आहोत. नवीन व्यवसाय करण्यास अनेक संधी आहेत पण आजचा युवक धाडस दाखवत नाही. त्यांना प्रोत्साहन द्यायला हवे. पर्यटन ही आम्हाला मिळालेली देणगी आहे.

शिक्षण क्षेत्रात आघाडीवर, पण...

पोर्तुगीज कालापासून व त्यानंतर येथील समाजधुरिणांनी येथील समाजाची गरज ओळखून तत्कालीन कठीण प्रसंगात येथे शैक्षणिक संस्था स्थापन केल्या. गोवा मुक्तीनंतर औद्योगिक प्रशिक्षण संस्था, नवोदय विद्यालय, २८ वर्षांपूर्वी ज्ञानप्रबोधिनी संस्थेने महाविद्यालय सुरू केले. त्यापूर्वी बारावीनंतरचे शिक्षण घेण्यासाठी येथील विद्यार्थ्यांना मडगाव, पणजी, फोंडा यांसारख्या शहरात धाव घ्यावी लागत होती. शिक्षणाची सोय तालुक्यातच झाली तरी सुशिक्षितांच्या हाताना काम देण्याची व्यवस्था अद्याप मतदारसंघात पर्यायाने तालुक्यात निर्माण झाली नाही. श्रीस्थळ येथील औद्योगिक वसाहतीकडून येथील युवकांच्या मोठ्या अपेक्षा होत्या, मात्र त्या फोल ठरल्या आहेत.

आज पर्यटन क्षेत्र मंदावलेल्या स्थितीत असले तरी ते नक्कीच भरारी घेणार आहे. हीच योग्य वेळ आहे पर्यटन क्षेत्रात बोकाळलेली बेशिस्त मोडून काढायची. शिक्षण आणि क्रीडा क्षेत्रात क्रांती घडवण्यास आमच्याकडे खूप संधी आहेत. त्याकडे दुर्लक्ष होता कामा नये. आयआयटी संदर्भात लवकरात लवकर निर्णय व्हावा ही अपेक्षा. पर्यटन आणि शेती व्यवसायाला चालना देण्यासाठी मास्टर प्लॅन बनवून कृती करणे आवश्यक आहे. एकमेव ओद्योगिक वसाहत दुर्लक्षित आहे. लोकप्रतिनीधींकडून नवीन उद्योग मतदारसंघात उभारण्यासाठी प्रयत्न व्हावेत.

- अरुण वामन भट, पैंगीण

युवा पिढीला उद्यमशील बनवावे

शेतकरी राजा होणार ही कल्पना सत्यात उतरण्याची गरज आहे. सरकारने शेती-बागायतीसाठी अनेक योजना, सुविधा निर्माण केल्या. त्यातून खरोखरच किती पडीक जमीन लागवडीखाली आली याचा लेखाजोखा मांडायला हवा. गोवा स्वयंपूर्ण व्हावा ही अपेक्षा आहे. त्यासाठी युवकांना कौशल्यपूर्ण व उद्यमशील बनवावे लागेल. गावातील मनुष्यबळ गावातच राहयला हवे यासाठी येथील हाताना काम मिळेल याची तजवीज व्हायला हवी.

- कमलाकर म्हाळशी, श्रीस्थळ

पायाभूत सुविधा निर्माण कराव्यात

मतदारसंघात अजूनही अंतर्गत भागात चांगले रस्ते नाहीत. पाणी पुरवठा, वीज पुरवठा सुरळीत नाही. मतदारसंघात सुमारे दहा हजार सुशिक्षित बेकार आहेत. सर्वांनाच सरकारी नोकरी देणे शक्य नाही. प्रदूषण विरहीत फार्मास्युटिकल्ससारखे उद्योग बेरोजगारी कमी करण्यास सहाय्य करतील. काणकोण किनारी पर्यटनासाठी प्रसिद्ध आहे. मात्र त्या उद्योगाच्या विकासासाठी पायाभूत सुविधा निर्माण झाल्या नाहीत. पाळोळे या आंतरराष्ट्रीय कीर्तिच्या किनाऱ्यावर पार्किंगची सोय नाही. पर्यटक येण्यासाठी कोकण रेल्वेच्या सर्व गाड्यांना काणकोण रेल्वे स्थानकावर थांबा द्यायला हवा.

- रमेश बाबय कोमरपंत, चावडी

सुभाष महाले

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Ranji Trophy 2024: मोहितचा 'पंजा' अन् फलंदाजांचा जलवा, गोव्यानं उडवला मिझोरामचा धुव्वा; नोंदवला सलग चौथा विजय!

Goa Live Updates: एंटर एअरचे पहिले चार्टर गोव्यात दाखल!

Rajbagh Beach: राजबाग किनाऱ्याने घेतला 'मोकळा श्वास'! पर्यटन खात्याकडून सात बेकायदेशीर बांधकामे उद्ध्वस्त

Goa Onion Rates: कांद्याने आणले डोळ्यात पाणी! नासाडीमुळे दोन दिवसात दरांमध्ये तब्बल २० रुपयांनी वाढ, जाणून घ्या सध्याचा भाव

Margao News: स्वच्छतेसंदर्भात मडगाव पालिकेचा महत्त्वाचा निर्णय; या कारणासाठी नागरिक, पर्यटकांकडून वसूल केला जाईल दंड

SCROLL FOR NEXT