bukhatir children Environmental Awareness Campaign Guided by Sunil Mardolkar Dainik Gomantak
ब्लॉग

Blog : '#गावाखातीर' साठी लहानग्या पर्यावरण स्नेहींची फौज सज्ज

मोहिमेचा एक भाग म्हणून ‘#गावाखातीर’ ह्या चमुतील जुई गावस हिच्या आजोळी निवृत्त शिक्षक मोहन द. नाईक ह्यांच्या घरी दिवडी येथे एक जागरुकता सत्र घेण्यात आले.

गोमन्तक डिजिटल टीम

#गावाखातीर’ ह्या नावाखाली नादोडा, कोलवाळ गावातील पर्यावरणस्नेही मुलांनी आता आपल्या आप्त इष्ट, मित्र मंडळी यांच्या पाठबळाने छोट्या पर्यावरण रक्षकांची फौज मोठी करण्याचा विडा उचलला आहे. ह्यांच मोहिमेचा एक भाग म्हणून ‘#गावाखातीर’ ह्या चमुतील जुई गावस हिच्या आजोळी निवृत्त शिक्षक मोहन द. नाईक ह्यांच्या घरी दिवडी येथे एक जागरुकता सत्र घेण्यात आले. ह्या कार्यक्रमाला दिवडी गावचे उपसरपंच सुनील म्हार्दोळकर ह्यांचे मार्गदर्शन मुलांना लाभले. चतुर्थीच्या वेळी होणारे प्रदूषण कमी करण्यासाठी आपण गावकऱ्यासहीत प्रयत्न करू असे आश्वासन त्यांनी दिले

#गावाखातीरच्या नादोडा टीमच्या सदस्या सृष्टी गावस, अक्षता गावस आणि हर्षा गावस, सई गावस यांनी ही मोहीम कशी सुरु झाली व कशी पुढे नेता येईल ह्याबद्दल मुलांना मार्गदर्शन केले. आपल्या लाडक्या बाप्पाचा सण आपण पर्यावरणाचे भान राखुन साजरा करूया असेही आवाहन त्यांनी जमलेल्या मुलांना केले. त्यानतर ह्या जागरुकता सत्रात मुलांनी कागदी पिशव्या बनवल्या. या पिशव्या नंतर मुलांनी गावातील काही दुकाने, मेडिकल स्टोरला नेऊन दिल्या. प्लास्टिकचा वापर कमी करण्याची विनंती त्यांनी यावेळी संबंधितांना केली. दुकानदारांनीही मुलांचे कौतुक खाऊ देवून केले.

या जागरुकता सत्रात शारदा मंदिर, मिरामार या शाळेतील इयत्ता नववीतील सोहम, हर्षा, कृष्णा, प्रियाशा, नक्षत्रा, अल्डिया, अधिरा, वर्धा ही मुले सहभागी झाली होती. दिवाडी गावातील श्रेया, क्रिषा, कनिष्क, शिवांग, अश्र्वीला, सिद्धी, उर्वी, आराध्या, कृती ही मुले या मोहिमेत होती. पर्यावरणासाठी आपल्या घरी जमलेल्या, ह्या गोव्यातील विविध गावातील मुलांचे कौतुक मोहन आणि शुभांगी नाईक ह्या आजी-आजोबानी केले . #गावाखातिरच्या अश्या शाखा गावोगावी सुरू व्हाव्यात हा ह्या टीमचा मानस आहे. #गावाखातिर’ची टीम नादोडा गावी आहेच. आता हे नाव घेवुन कुठली पुढची टीम पुढे सरसावते आणि पर्यावरण रक्षणाचा विडा स्वखुशीने उचलते त्याची वाट मुले पहात आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Pitru Paksha 2025: ‘या’ दिवशी सुरू होतोय पितृ पक्ष, पूर्वजांना प्रसन्न करण्यासाठी काय कराल? जाणून घ्या तारीख आणि नियम

Cricketer Retierment: आशिया कपपूर्वी भारताच्या 'या' स्टार खेळाडूचा क्रिकेटला रामराम, IPLमध्ये 3 वेळा घेतलीय हॅटट्रिक

Court Ruling: लग्न केलं म्हणून बलात्काराचा खटला रद्द; किशोरवयापासून होते प्रेमाचे संबंध

Karul Ghat Landslide: गणेशभक्तांना फटका! करुळ घाटात दरड कोसळली; परतीचा प्रवास ठप्प

Goa Live News: कुळे येथील मुस्लिम बांधवांच्या जुलूस रॅलीला जिल्हाधिकाऱ्यांनी परवानगी नाकारली

SCROLL FOR NEXT