Shivdas Verekar Dainik Gomantak
ब्लॉग

MGP Goa: मगोच्या उज्ज्वल इतिहासाचा साक्षीदार 'शिवदास वेरेकर'

MGP Goa: फोंडा तालुका तर मगोचा बालेकिल्ला म्हणून गणला जात असे.

दैनिक गोमन्तक

MGP Goa: माजी मंत्री शिवदास वेरेकर यांच्या निधनाने मगो पक्षाच्या देदीप्यमान कारकिर्दीचा साक्षीदार काळाच्या पडद्याआड गेला आहे. वेरेकर हे 1989 ते 1994 या कालावधीत फोंड्याचे आमदार होते. त्यावेळी मगो हा राज्यातील आघाडीचा पक्ष होता. फोंडा तालुका तर मगोचा बालेकिल्ला म्हणून गणला जात होता.

वेरेकरांची राजकीय सुरुवात झाली ती नगरसेवक म्हणून. 1985 साली फोंड्याच्या सिल्वा नगर प्रभागातून निवडून येऊन ते नगरसेवक बनले. त्यावेळी रवि नाईक हे फोंड्याचे आमदार होते. पण, 1989 साली त्यांनी मडकईतून निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतल्यामुळे शिवदास यांना संधी मिळाली.

वास्तविक त्या वेळी फोंड्याचे तत्कालीन उपनगराध्यक्ष तथा मगोचे फोंडा प्रमुख महादेव खानोलकर यांना उमेदवारी मिळणार, अशी हवा होती. पण ‘दाने दाने पे लिखा होता है खानेवाले का नाम ’या उक्तीप्रमाणे शेवटी ही उमेदवारी शिवदासांच्या गळ्यात पडली.

त्यामुळे रवि हेच आपले राजकीय प्रणेते असे शिवदास शेवटपर्यंत मानत होते. नंतर 1991 साली झालेल्या घडामोडीत रवि काँग्रेसमध्ये जाऊन मुख्यमंत्री बनले. शिवदास मात्र मगोतच राहिले. इथून रवि व शिवदासच्या दिशा वेगळ्या झाल्या.

1994 साली शिवदास पुन्हा एकदा फोंड्यातून निवडून आले. नंतर 1998 साली ते मंत्रीही बनले. अर्थात हे त्यांचे मंत्रिपद अल्प काळच टिकले. नंतर 1999 साली फोंड्यात रवि नाईकांनी त्यांचा पराभव केला आणि तिथेच त्यांच्या राजकीय कारकिर्दीची इतिश्री झाली. पण, त्यांच्या राजकीय कारकिर्दीचे वैशिष्ट्य म्हणजे त्यांनी मगोच्या त्या उज्ज्वल इतिहासाचे प्रतिनिधित्व केले.

1994 ते 1999 या कालावधीत तर ते डॉ. काशिनाथ जल्मी व रमाकांत खलप यांच्याबरोबर मगोचे आघाडीचे नेते बनले होते. अजूनही ते त्या काळातील रंजक आठवणी सांगायचे. त्यांच्या जाण्याने हा दुवाच आता निखळला आहे.

सध्या ते राजकारणात सक्रिय नसले तरी समाजकारणात व्यग्र असायचे. ‘आबा’या नावाने परिचित असलेले शिवदासबाब अनेक सामाजिक संस्थांतर्फे काम करायचे. ’वैश्य ’समाजाचे तर ते आधारस्तंभ म्हणून गणले जायचे. त्यांच्या जाण्याने गोवा राज्याच्या एका सोनेरी पर्वाचा अस्त झाला आहे एवढे मात्र खरे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT