Book Reading Dainik Gomantak
ब्लॉग

Book Reading: वाचण्यासाठी वाचावेच लागते...

Book Reading: आवड म्हणून किंवा कामाचा भाग म्हणून, पुस्तके वाचावी लागतात.

दैनिक गोमन्तक

Book Reading: पुस्तके चाळायला अनेकांना आवडत असतील, पण ती वाचावीत व पचवावीत हे सर्वांनाच कळते असे नाही. जेव्हा तुम्ही पुस्तक वाचनाचे अनेकांचे अनुभव वाचता तेव्हा छाती दडपून जाते. ‘अरे अमुक अमुक उल्लेखलेले पुस्तक मी वाचलेच नाही’, अशी कबुली आपण मनातल्या मनात देतो. शेवटी एक खरे की पुस्तके वाचून न संपणारी गोष्ट आहे असेच म्हणावे लागते.

एखादा आपल्याकडे अमुक संच आहे तमुक पुस्तके आहेत अशा वल्गना जरूर करतो, पण खरोखरच त्यांनी ती पुस्तके वाचलेली असतात का? की नुसती शोभेसाठी ठेवलेली असतात? हा लाखमोलाचा प्रश्न आहे. कारण तुम्ही अमुक पुस्तक वाचले आहे का? असा धीट प्रश्न एखादाच विचारू शकतो. आपण एखादे पुस्तक वाचले आहे, असे गृहीत धरतो व विविध अनुमाने काढतो.

एखादे पुस्तकालय कायमचे बंद होते तेव्हा खऱ्याखुऱ्या वाचकाला दुःख जरूर होते पण, त्यासाठी मोर्चा, संप करणे होत नसते. पण एक खरे की वाचनातून तुमचा मूड बदलू शकतो. आपण जर दु:खी असलो तर एखाद्याचे चरित्र वाचून, ‘हा पठ्ठा जर मार्ग काढून जगू शकतो तर आपण का नाही?’, असे विचार आपल्याला सावरून धरतात. हातपाय नसलेली, दिव्यांग माणसे वावरत असतात, पण आपले दुःख ती आपल्यासमोर मांडत नाहीत. असे अनुभव आपल्याला वाचनातून मिळू शकतात आणि आपली विचारसरणी पार बदलून जाते.

अनेकदा जो लेखक आपल्याला समृद्ध करत असतो तो कदाचित कफल्लक असू शकतो,किंवा एखाद्या कारणामुळे तो / ती दुःखी असू शकतो /शकते . पण परकाया प्रवेशामुळे आपल्या दुःखाच्या स्थितीचा पत्ताही न लागू देता आपल्यापर्यंत त्याचे विचार तो पोहोचवतो.

सुरुवातीला कोणीतरी पुस्तक आणून ठेवतो, ते तुमच्या हाती लागले आणि नंतर वाचनाचा किडा शरीरात येतो. मग तुम्ही काय भस्म्या आजार झाल्याप्रमाणे पुस्तकांचा फडशा पाडता. मग तुम्हांला तुमच्या आवडीचा पत्ता लागतो आणि त्या आवडीच्या शोधात पुस्तकांचा मागोवा घेत वाचत सुटता. गावात वाचनालय असले तर ठीक अन्यथा जिथे असेल तेथून पुस्तके आणण्याचा सपाटा सुरू करता.

मोबाइल, टीव्ही, नेट आल्याने वाचनात काही अंशी तरी खंड पडला हे मान्य करायलाच हवे. वाचन विशेषांकात प्रकर्षाने वाचकांचे अनुभव वाचायला मिळतात. त्यांचे अनुभव वाचल्यानंतर आपले वाचन किती थिटे आहे, हे लक्षात येते.

अलीकडे पुस्तक विक्रीचा भाग म्हणून टॉप पाच,दहा अशा निवडक पुस्तकांची यादी झळकते. तो विक्रीचा, जाहिरातीचा भाग असतो हे एव्हाना चाणाक्ष वाचकांना समजलेले असते. पण आपल्या हाती फक्त एवढेच असते ते म्हणजे त्याकडे दुर्लक्ष करायचे. असो! शेवटी आपण वाचतो ते का? हे जर समजले तर त्या दृष्टीने आपली वाटचाल नक्कीच होईल.

आपण डॉक्टरांच्या सल्ल्याने म्हणा, कुठे वाचून म्हणा किंवा मित्रांच्या सल्ल्याने म्हणा व्यायाम करतो. योग वर्गालाही जातो. पण, मेंदूच्या व्यायामासाठी वाचनाला पर्याय नाही. मन सक्रिय राहते. अनेकदा आपले रूक्ष जीवन बदलायला कारणीभूत ठरते. लेखन करणाऱ्यांना तर वाचन म्हणजे ऊर्जा.

वाचनातून एखादी कल्पना सुचू शकते,माहितीही मिळू शकते. आपण जरा मोठे झालो की आपली आवड असेल तीच पुस्तके जास्त वाचतो. काहीवेळा कामाचा भाग म्हणून आवड नसूनही पुस्तके वाचावी लागतात. पण, एक खरे, कुठलेही पुस्तक तुम्ही वाचा, त्यातून तुमचे नुकसान तरी होत नाही.

होकार, नकार पचवायला हीच पुस्तके शिकवतात आणि हो वर्तमानात कसे जगावे याची शिकवणही हीच पुस्तके देतात ना! काही म्हणतील आपला वेळ वाया गेला, त्याचे काय? पण जे काही वाचले ते नवीन होते ना, हा फायदाच नव्हे का ? पण अलीकडे मात्र गुगल, फेसबूक, नेट आदींच्या माध्यमातून काय वाचनात येईल आणि काय नाही हे सांगणे कठीण.

मजकुराचा धबधबा म्हणता येईल. काहीवेळा त्या मजकुराचे काही खरे नसते. अशा मजकुरावर विश्वास ठेवून काहीजण पुढे जातात. त्या विचारांचा पगडा त्यांच्यावर राहतो. मग काय खरे काय खोटे, हा प्रश्न अनुत्तरित राहतो. पण हाती पुस्तक असलेल्यांचा अनुभव वेगळाच . ही दरी वाढत जाणार हे नक्कीच. आपण मात्र आपल्या हाती असलेल्या पुस्तकावर जास्त प्रेम करणार.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Today's News Live: शापोरा – हणजूण येथून ११ वर्षीय मुलगा दोन दिवसांपासून बेपत्ता, शोध सुरु

Randeep Hooda At IFFI: बिरसा मुंडांच्या जीवनावर सिनेनिर्मिती व्हावी! अंदमान सेल्युलर तुरुंगात गेल्यानंतर मात्र.. ; रणदीप हुडाने मांडले स्पष्ट मत

Goa Politics: अदानी प्रकरणावरुन काँग्रेस-भाजप मध्ये कलगीतुरा! पाटकरांचे आरोप; वेर्णेकरांचे प्रत्युत्तर

Pilgao Farmers Protest: पिळगावात तिसऱ्या दिवशीही ‘रस्ता बंद’; खाण कंपनीच्या भूमिकेकडे ग्रामस्थांचे लक्ष

Vidhu Vinod Chopra At IFFI: 'माझ्या सिनेमाच्या पहिल्या 'शो'ला चार-पाचच प्रेक्षक होते..'; चोप्रांनी सांगिलता 'खामोश'चा दिलखुलास किस्सा

SCROLL FOR NEXT