bhimrao ambedkar gives ideas to establish reserve bank of india fights for labours also
bhimrao ambedkar gives ideas to establish reserve bank of india fights for labours also Dainik Gomantak
ब्लॉग

RBI च्या स्थापनेत आंबेडकरांनी बजावली महत्वाची भूमिका, तेव्हा...

दैनिक गोमन्तक

राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर (Babasaheb Ambedkar) यांची आज जयंती आहे. आंबेडकरांचे योगदान सामान्यतः दलितांच्या सामाजिक आणि राजकीय उन्नतीमध्ये मानले जाते, परंतु ते एक महान आर्थिक अभ्यासक देखील होते हे फार कमी लोकांना माहिती आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या स्थापनेतही त्यांचा मोलाचा वाटा होता. राजकीय व्यक्तिमत्त्व असण्यासोबतच आंबेडकर हे एक तल्लख विद्वानही होते, ज्यांची राजकारणापासून अर्थशास्त्रापर्यंत सर्व गोष्टींवर समान पकड होती. त्यांनी अर्थशास्त्रातच डॉक्टरेट पदवी घेतली. हिल्टन यंग कमिशनला त्यांनी दिलेल्या सूचनांनुसार रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया ही संस्था स्थापन करण्यात आली.

Dr B R Ambedkar contribution to Reserve Bank of India

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या (RBI) स्थापनेत महत्त्वाची भूमिकाः 1935 मध्ये रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या स्थापनेत डॉ. आंबेडकर यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. त्यांच्या 'द प्रॉब्लेम ऑफ द रुपी - इट्स ओरिजिन अॅन्ड इट्स सोल्युशन' या पुस्तकात सांगितलेल्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार हिल्टन यंग कमिशनला रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची संकल्पना मांडली. रुपयाची समस्या शेवटी देशांतर्गत चलनवाढीच्या समस्येशी जोडलेली असते हे सुद्धा आंबेडकरांना माहीत होते. त्यांच्या प्रबंधाच्या पुस्तक आवृत्तीच्या प्रस्तावनेत, त्यांनी निदर्शनास आणून दिले: "...रुपयाची सामान्य क्रयशक्ती स्थिर केल्याशिवाय काहीही स्थिर होणार नाही".

Best quotes of Dr BR Ambedkar

हिल्टन यंग कमिशनला भारतीय चलन आणि वित्तविषयक रॉयल कमिशन म्हणूनही ओळखले जात असे. आंबेडकरांच्या पुस्तकाने हिल्टन यंग कमिशनलाही खूप मदत केली. एवढेच नाही तर कामगारांसाठी भीमराव आंबेडकर यांचे मोठे योगदान आहे. देशातील कामगार कायदा तयार करण्यात महत्त्वाची भूमिका बजावणारे भीमराव आंबेडकर यांच्या प्रयत्नांमुळे मजुरांचे कामाचे तास 12 वरून 8 तासांपर्यंत कमी करता आले. याशिवाय महागाई भत्ता, रजा लाभ, कर्मचारी विमा, वैद्यकीय रजा, समान वेतन आणि किमान वेतन यासारख्या सुविधा ज्या आज प्रचलित होत्या, त्या आंबेडकरांच्या प्रयत्नांमुळेच सुरू होऊ शकल्या.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Vardhan Kamat Interview: इन्स्टाग्रामवर फॉलोअर्स नसल्यामुळे अ‍ॅड हातून निसटली; वर्धन कामत यांची दिलखुलास मुलाखत

Lok Sabha Election 2024: शहजाद्यानं राजा महाराजांचा अपमान केला, पण नवाबांच्या अत्याचारावर मौन बाळगलं, PM मोदींचा राहुल गांधींवर हल्लाबोल

Loksabha Election 2024 : सासष्‍टीत ‘आरजी’ला मिळतोय वाढता प्रतिसाद ; एसटीबहुल परिसरावर पगडा

Vasco News : कोरोनाने नव्‍हे, कोळशाने घेतले बळी; वास्‍कोत कॅप्‍टन कडाडले

Ponda News : फोंड्यातील सुपष चोडणकर ‘जेईई‘मध्ये राज्यात प्रथम

SCROLL FOR NEXT