Cat Dainik Gomantak
ब्लॉग

Cat: मांजर हे व्याघ्रवंशीय प्राणी अनेक वर्षापासून माणसाने जंगलातून आणून पाळीव बनवला आहे.

Cat: बौद्ध जातककथांत मांजर असते. प्राचीन व अर्वाचीन चित्रांत प्रमुख पात्रांच्या पायाशी बसलेले मांजर असते. सर्व भाषांतील कथा, कविता, चित्रे, शिल्पे, म्हणी यांचे विश्व मांजराने व्यापले आहे.

दैनिक गोमन्तक

Cat: हल्लीच बी. एन. गोस्वामी यांनी लिहिलेले ''The Indian Cat'' हे अफलातून पुस्तक वाचले. मांजर हे व्याघ्रवंशीय प्राणी १०००० ते १२००० वर्षापासून माणसाने जंगलातून आणून पाळीव बनवला आहे. मांजर हा पंचतंत्र, हितोपदेश, इसापनीती, कथासरित्सागर ह्या सर्व पुस्तकांतल्या कथामधले प्रमुख पात्र आहे.

कथेतली मांजराची प्रतिमा स्वार्थी, लोभी, धूर्त, ढोंगी प्राण्याची असते. मांजराला आपल्या धन्यापेक्षा घर प्रिय असते. त्यामुळे गोव्यातील ख्रिश्चन लोक घरकोंड्या माणसाला ''घरकोंबडा'' न म्हणता ''घरमांजर'' म्हणतात.

महंमद पैगंबराला मांजरे आवडत. त्याच्या प्रिय मांजराचे नाव ''मुएझो'' असे होते. ह्या मांजराने पैगंबराला दंश करण्यासाठी येणाऱ्या सर्पाला मारून पैगंबराला वाचवले. त्यामुळे इस्लामला मांजर प्रिय आहे. हे मुएझो मांजर एकदा पैगंबराच्या झग्यावर झोपले होते. पैगंबराला नमाज पढण्यासाठी उठायचे होते.

आपल्या प्रिय मांजराची झोपमोड होऊ नये म्हणून पैगंबराने कात्री घेऊन आपला झगा कापला. महंमद पैगंबराच्या बोटांच्या खुणा मांजराच्या पाठीवर आहेत असे इस्लाम मानते. पैगंबराच्या आशिर्वादामुळे मांजर उंचावरून पडले तरी पाठीवर पडत नाही. ते चार पायांवर पडते व त्याचा जीव वाचतो.

जेझू ख्रिस्तालाही मांजरे आवडत. पण बायबलमध्ये मांजराचा फारसा उल्लेख नाही. बौद्ध जातककथांत मांजर असते. प्राचीन व अर्वाचीन चित्रांत प्रमुख पात्रांच्या पायाशी बसलेले मांजर असते. सर्व भाषांतील कथा, कविता, चित्रे, शिल्पे, म्हणी यांचे विश्व मांजराने व्यापले आहे.

गुणाठ्याच्या कथासरित्सागरातील मांजराविषयीची एक कथा मनोरंजक तशीच उद्‌बोधक आहे. श्रीपती, धनपती, लक्ष्मीपती आणि सुवर्णपती हे चार मित्र भागीदारीने घाऊक धान्यविक्रीचा धंदा करत. एकदा त्यांच्या गोदामातील धान्याची नासधूस उंदीर करू लागले. त्यामुळे चार मित्रांनी एक मांजर पाळले. मांजराने सर्व उंदरांचा फडशा पाडला.

चारही मित्र खूष झाले. ह्या मांजराची चांगली निगा राखता यावी म्हणून त्यांनी ह्या मांजराच्या पुढच्या उजव्या अंगाची काळजी श्रीपतीने घ्यावी, पुढच्या डाव्या अंगाची निगा धनपतीने राखावी, मांजराच्या मागच्या उजव्या अंगाकडे लक्ष्मीपतीचे लक्ष असावे आणि मांजराच्या मागच्या डाव्या अंगाचा अधिकार सुवर्णपतीला असावा असे ठरवले.

एकदा मांजराच्या पुढच्या उजव्या पायाला जखम झाली. हा पाय श्रीपतीच्या वाट्याला येत असल्यामुळे श्रीपतीने मांजराच्या उजव्या पायावरची जखम धुऊन तिला औषध लावले व जखमेवर कापूस व कापडाची चिंधी बांधली.

एके रात्री मांजराचा उजवा पाय जळत्या दिव्याला लागून कापूस व कापडाच्या चिंधीने पेट घेतला. घाबरून मांजर सैरावैरा धावू लागले. गोदामांतल्या सर्व धान्याच्या गोणपाटांत आग लागून ते आगीत भस्मसात झाले.

हे सगळे अरिष्ट श्रीपतीच्या वाट्याला आलेल्या मांजराच्या पुढच्या पायामुळे आल्याने श्रीपतीने आम्हाला नुकसान भरपाई द्यावी असा तगादा अन्य तीन भागीदार लावू लागले.

शेवटी हे प्रकरण न्यायाधीशाकडे गेले. न्यायाधीशाने निवाडा दिला - हा गुन्हा आग लागलेल्या मांजराच्या पुढच्या उजव्या पायाने केलेला नसून मांजराला सगळीकडे धावून, आग पसरण्यास मदत करणाऱ्या मांजराच्या अन्य तीन पायांचा आहे. त्यामुळे धनपती, लक्ष्मीपती आणि सुवर्णपती ह्या तीन भागीदारांनी श्रीपतीला नुकसान भरपाई द्यावी.

ही कथा आजच्या काळाच्या संदर्भात पाहिली पाहिजे. समाजविघातक, धर्मांध, विद्वेषी विचार मांडणाऱ्यापेक्षा हा विचार सोशल मिडियावरून सगळीकडे पसरवणारे अधिक गुन्हेगार असतात.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Monsoon Session: विरोधकांत एकीचा अभाव, सत्ताधाऱ्यांनी घेतली मात्र अधिवेशनपूर्व महत्वाची बैठक; बंद दाराआड चर्चा

Goa AI Center: 'गोव्यात एआय केंद्र स्थापन करणार; 240 सरकारी सेवा थेट व्हॉट्सॲप चॅटबॉटवर मिळणार' मुख्यमंत्र्यांची माहिती

Goa Live News: मी बैठकीत नाही, पण जेवणासाठी सहभागी झालो : सभापती तवडकर...

IND Vs ENG 4th Test: मँचेस्टरचा 'जो रुट' फॅक्टर! चौथ्या कसोटीत काय असणार भारताची रणनीती? जाणून घ्या आकडेवारी

IND vs ENG: गिलसेनेचं टेन्शन वाढलं! इंग्लंडचा संघ झाला सुपर स्ट्रॉंग, जोफ्रानंतर आता 'या' धाकड गोलंदाजाचं संघात पुनरागमन

SCROLL FOR NEXT