Goa Liberation
Goa Liberation Dainik Gomantak
ब्लॉग

Goa Liberation: मुक्तीनंतरचा गोवा एक दृष्टिक्षेप

दैनिक गोमन्तक

Goa Liberation: साडेचारशे वर्षांच्या पोर्तुगीज जुल्मी राजवटीतून आपला गोवा 19 डिसेंबर 1961 साली मुक्त झाला.म्हणजेच 61 साली मुक्त झालेल्या आपल्या गोव्याला आता 61 वर्षे पूर्ण होऊन गेली.पोर्तुगीलची हुकुमशाही राजवटीमुळे येथे विचार करण्याचे, मुक्तपणे संचार करण्याचे, जयहिंदही उच्चारायचे स्वातंत्र्य नव्हते.तरीही ‘खाओ पिओ मजा करो’ ही वृत्ती होती त्यामुळे शांतता,सुबत्तेचे वातावरण होते.

हिंदुस्थानात ब्रिटिश सत्तेविरुध्द देशातील जनता संघटित होत होती. काँग्रेस स्वातंत्र्याची चळवळ चालू होती.सत्याग्रह,भूमिगत चळवळी क्रांतिकारकांचे बलिदान याचे पडसाद गोव्यातही उमटत होते.

गोव्यात मुंबई पुण्याहून येणाऱ्या वृत्तपत्रातूंन गोवा मुक्त करण्याची प्रेरणा मिळत होती.गोमंतकीयांची मुक्तीची चळवळ बळकट करण्यासाठी देशभरामधूनही देशभक्त मंडळी कार्यरत होती.या साऱ्यांच्या साम, दाम, दंड, भेद या माध्यमांतून अखेर १९ डसेंबर १९६१ पासून गोव्यात मुक्तीचे वारे सर्वत्र वाहू लागले.

यानंतर तत्कालीन संघप्रदेश गोवा, दमण व दीवची चौफेर विकासाची घोडदौड सुरु झाली. शिक्षण, उद्योग, क्रीडा या क्षेत्रांबरोबरच मच्छिमारी, पशुपालन, शेती-बागायती आणि लघूउद्योग यांचा प्रामुख्याने उल्लेख करावा लागेल.

गोव्याचे भाग्यविधाते म्हणून ज्यांचा आदराने उल्लेख केला जातो ते या संघप्रदेशाचे पहिले मुख्यमंत्री स्व. भाऊसाहेब बांदोडकर यांच्यापासून मग शशिकलाताई काकोडकर, प्रतापसिंह राणे, दिगंबर कामत, मनोहर पर्रीकर ते विद्यमान मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांचा याबाबतीत प्रामुख्याने उल्लेख करावा लागेल.

गोवा हा शब्द उच्चारला तरी आपल्यासमोर विस्तीर्ण समुद्रकिनारे, नारळी पोफळीच्या बागा, सुंदर मंदिरं,चर्च आणि धबधबे ऊभे राहतात. देशविदेशातील असंख्य पर्यटकांनी याचा मनमुराद आनंद घेतला व घेत आहेत.

गेली अनेक वर्षे पर्यटन हा येथील प्रमुख उद्योग म्हणून गणला गेला आहे. सरकार विविध प्रकारच्या सोयीसुविधा देऊन या उद्योगाला उर्जितावस्था प्राप्त करुन देत आहे. त्यामुळे गोवा हा जागतिक नकाशावर बारमाही पर्यटनाचा प्रदेश म्हणून लोकप्रिय आहे. देशी - विदेशी पर्यटकांची सतत वाढ होत आहे.

आज प्रत्येक खेडेगावात सुस्थितीतील शाळा आहेत. तालुक्यागणिक महाविद्यालयांची भर पडली आहे. उच्च शिक्षण घेण्यासाठी परदेशात जाणाऱ्या विद्यार्थ्यांना अर्थसहाय्य देणारी योजना कार्यान्वित करण्यात आली आहे. मराठी, कोकणी, इंग्रजी, कानडी, उर्दू आदि भाषांमधून प्राथमिक शिक्षणाची सोय झाली असून विद्यापीठापर्यंत शैक्षणिक सुविधांनी झेप घेतली आहे

शिक्षणखात्याच्या सांख्यिकी विभागाच्या माहितीनुसार दोन जिल्ह्यांच्या छोट्याशा गोवा राज्यात पदवीपर्यंतचे शिक्षण देणारी 25, तांत्रिक व व्यावसायिक शिक्षण देणारी २१ महाविद्यालये, प्रत्येक तालुक्यातील आयटीआय केंद्रे, दहावीनंतर व्यावसायिक शिक्षण देणाऱ्या २५ संस्था, सरकारी केंद्रीय व खासगी अशी 82 उच्च माध्यमिक विद्यालये, ३७५ माध्यमिक विद्यालये व १३०० च्या घरात प्राथमिक विद्यालये चालतात,यात वाढही होत आहे.

मुक्तिपूर्वीपासून उद्योग क्षेत्राच्या बाबतीत खाण उद्योग हा मुख्य व्यवसाय होता. मजुरांपासून मॅनेजरपर्यंत लाखो लोकांच्या उपजिविकेचे ते साधन होते. या उद्योगाची लाट आली यात मुख्यत्वे धेंपे, चौगुले, साळगांवकर, बांदोडकर, यांचा उल्लेख करावा लागेल. दुर्दैवाने कायदेशीर खाणी, प्रदूषण आदींच्या विळख्यात गेल्या.हा व्यवसाय रखडला असून हजारो कुटुंबांवर त्यामुळे उपासमारीची वेळ आली आहे.

तरी सरकार इतर उद्योगांना प्रोत्साहन देऊन परप्रांतिय उद्योगपतीना जागा, पाणी, वीज, रस्ते आदींची सुविधा उपलब्धी करुन देऊन निरनिराळे उद्योग येथे आणून बेरोजगारांना रोजगाराची हमी देत आहे. क्रीडाक्षेत्राबाबत सांगायचे म्हणजे मुक्तिपूर्व काळापासून फुटबॉल हा खेळ गोवेकरांचा जीव की प्राण आहे,

यासाठी ग्रामीण भागांपासून शहरांपर्यंत उत्तम प्रकारची क्रीडांगणे उभी राहिली आहेत. विविध प्रकारचे देशी - विदेशी खेळ तसेच क्रिकेट मधून देशपातळीवर खेळणारे खेळाडूही तयार झाले आहेत. मी येथे मुक्तिपूर्वीच्या गोव्याचा उल्लेख करताना फक्त पोर्तुगीज राजवटीचा उल्लेख केला असला तरी गोवा राज्यातील पुराणवस्तू संग्रहालय पणजी आणि पिलार वस्तुसंग्रहालयातुन गोव्याचा शेकडो वर्षांच्या भोज, मौर्य, शिलाहार, कदंब इ. राजघराण्यांपर्यंतचा, पोर्तुगीजपुर्व इतिहासाचा प्रत्यय येतो.

अशा सुजलाम सुफलाम निसर्ग सौदर्याने नटलेल्या गोव्यावर आज दृष्टिक्षेप टाकला की पर्यटनाच्या नावाखाली ज्या अश्लाघ्य गोष्टींनी वेढा घातला आहे त्याकडे दुर्लक्ष करुन कसे चालेल? सध्या गोव्याचे वैभव असणाऱ्या निसर्गालाच जणू गिळंकृत करण्याचा प्रयत्न होत आहे. इथल्या पर्यावरणाचे प्रश्न् निर्माण होताहेत.कॅसिनो, वेश्याव्यवसाय, अंमलीपदार्थांची वाढती देवघेव आणि रगेल आणि रंगीत पार्ट्यांचा नको तितका प्रभाव वाढला आहे.

याविरोधात सुजाण नागरिकांकडून सर्व थरातून आवाज उठविला जातोय. दुर्दैवाने सरकारचे या गंभीर विषयांकडे दुर्लक्ष आहे असे नागरिकांचे मत बनत चालले आहे.

यासाठी मुक्तिदिनाच्या निमित्ताने सरकारचे नम्रपणे विनंती कराविशी वाटते की, मुक्त गोव्यात चांगल्याचा संचार होऊ द्यावा. अप्रिय,विनाशकारी चरित्र्यहीन गोष्टींना पायबंद घालावा. या गोमंतभूमीतील तमाम देव - देवतांनी संबंधितांना तशी सद्‍बुध्दि देवो, हीच या समयी प्रार्थना.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Todays Update: लाटंबार्से पंचायतीत सत्ताबदल अटळ; आमदार चंद्रकात शेट्ये यांना मोठा धक्का

Margao: दिगंबर कामतांची चिंता वाढली; मडगावमध्ये सरदेसाईंचा 'जनता दरबार', शेकडो लोकांना मांडल्या समस्या

Goa Assembly Session: ST आरक्षणासाठी युरी आलेमाव अधिवेशनात आवाज उठवणार; 'अस्मिताय दिसा'सह 4 खाजगी ठराव

Goa News: कोलवा PSI ने मारहाण केल्याचा आरोप करणाऱ्या महिलेवर खंडणीचा गुन्हा, पतीसह झाली होती अटक

Futsal Goa: गोव्याच्या आंबेली स्पोर्टस क्लबचा गतविजेत्यांना मिनर्व्हा अकादमीला धक्का, उपांत्य फेरीत प्रवेश

SCROLL FOR NEXT