गोव्यात पार पडणार 41वा सूरश्री केरकर संगीत समारोह

 

Dainik Gomantak

ब्लॉग

गोव्यात पार पडणार 41वा सूरश्री केरकर संगीत समारोह

देशातील नामांकित अशा संगीत समारोहामध्ये गणला जाणारा कला अकादमी आयोजित गोव्याचा (Goa) प्रतिष्ठेचा 41वा सूरश्री केसरबाई केरकर संगीत समारोह 14, 15 व 16 जानेवारी 2022 संपन्न होणार आहे.

दैनिक गोमन्तक

मागच्या ४० वर्षांपासून आयोजित होत असलेला, देशातील नामांकित अशा संगीत समारोहामध्ये गणला जाणारा कला अकादमी आयोजित गोव्याचा (Goa) प्रतिष्ठेचा 41वा सूरश्री केसरबाई केरकर संगीत समारोह दि. 14, 15 व 16 जानेवारी 2022राजीव गांधी कला मंदिर, फोंडा (Ponda) येथे संपन्न होणार आहे.

शुक्रवार दि. 14 जानेवारी रोजी सायं. 5.15वा. स्थानिक युवा कलाकार रितिष्का वेर्णेकर यांच्या शास्त्रीय गायनाने महोत्सवाला सुरूवात होईल. बडोद्याचे पं. दीपक क्षीरसागर यांच्या शास्त्रीय स्लाइड गिटार वादनानंतर पहिल्या दिवशीच्या सत्राची सांगता प्रसिध्द गायिका आरती अंकलीकर टिकेकर यांच्या शास्त्रीय गायनाच्या मैफलीने होईल.

शनिवार दि. 15जानेवारी, सकाळच्या सत्रात 10.30 वा. मुंबई येथील युवा गायक कलाकार श्री. धनंजय हेगडे यांच्या शास्त्रीय गायनानंतर कोलकाता येथील प्रसिध्द शास्त्रीय गायक श्री. अर्षद अली खान व पुणे येथील युवा प्रतिभावंत सितारवादक शाकिर खान यांच्या शास्त्रीय गायन-सितार जुगलबंदी सादर होईल. सायंकाळच्या सत्रात 4.00वा. गोमंतकीय युवा कलाकार श्री. सोनिक वेलिंगकर यांच्या एकल बासरी वादनानंतर प्रशांत मल्लीक व निशांत मल्लीक यांच्या धृपद गायन सादर होईल. त्यानंतर बंगळूर येथील श्रीमती संगीता कट्टी कुलकर्णी यांचे शास्त्रीय गायन होईल. या सत्राची सांगता मुंबई (Mumbai) येथील ख्यातनाम तबलावादक विद्वान श्री. योगेश साम्सी व त्यांचे प्रज्ञावंत शिष्य श्री. स्वप्नील भिसे व श्री. चंद्रशेखर गांधी यांच्या तबला त्रिकुटी जुगलबंदीने (तबला ट्रीवो) होईल.

रविवार दि. 16 जानेवारी रोजी सकाळी 10.30 वा गोमंतकीय युवा गायक कलाकार श्री. नितेश सावंत यांच्या शास्त्रीय गायनाने सत्राची सुरुवात होईल तर या सत्राची सांगता कोलकाता येथील प्रख्यात सरोदवादक पं. देबाशिष भट्टाचार्य यांच्या सरोदवादनाच्या मैफलीने होईल. सायंकाळच्या सत्रात 4.00वा. पुणे (Pune) येथील प्रसिध्द गायिका श्रीमती मंजिरी असानारे केळकर यांचे शास्त्रीय गायनानंतर प्रसिध्द गायक श्री. प्रसाद खापर्डे यांची शास्त्रीय गायनाची मैफल होईल. या मैफलीला जोडूनच धारवाड येथील श्रीमती ज्योती हेगडे यांचे रुद्रवीणा वादन होईल. केसरबाई केरकर संगीत समारोहाची सांगता कोलकाता येथील आंतरराष्ट्रीय ख्यातीचे ख्यातनाम शास्त्रीय गायक पं. अजय चक्रवर्ती यांच्या शास्त्रीय गायनाच्या मैफलीने होणार आहे.

या संगीत महोत्सवात पं. योगेश साम्सी, ओजस आधिया, दयानिधेश कोसंबे, उदय कुलकर्णी, मयांक बेडेकर, अमर मोपकर, स्वप्निल मांद्रेकर, ऋषिकेश फडके, महेश वजे हे कलाकार तबल्यावर साथसंगत करतील तर पं. अजय जोगळेकर, राया कोरगांवकर, सुभाष फातार्फेकर, गुरुप्रसाद गांधी, दत्तराज सुर्लकर, प्रसाद गावस, दत्तराज म्हाळशी यांची संवादिनी साथसंगत लाभणार आहे. तसेच मृणाल मोहन उपाध्याय, पं. ज्ञानेश्वर देशमुख हे कलाकार पखवाजवर साथसंगत करणार आहेत. महोत्सवातील कार्यक्रम सर्व रसिकांसाठी खुले आहे. कांही आसने निमंत्रितासाठी राखून ठेवण्यात येतील. कोविड-19ची (Corona) सर्व मार्गदर्शक तत्त्वे पाळून या समारोहास प्रवेश दिला जाणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Hero च्या दोन नव्या बाइक्स लॉन्च! किंमत 1.27 लाखांपासून सुरू, क्रूझ कंट्रोलसह मिळणार अनेक भन्नाट फीचर्स

Mumbai Indians: रोहित शर्माच्या मुंबई इंडियन्सला मोठा धक्का! महेला जयवर्धनेनं सोडलं मुख्य प्रशिक्षकपद; IPL 2027 आधी मोठा बदल

Organic Agriculture: गोव्यात 10 टक्के क्षेत्रातही सेंद्रिय शेती नाही! रासायनिक शेतीचे दुष्परिणाम सांगत उदय प्रभुदेसाई यांचे आवाहन

Drug Bust Case: गोव्यात सात दिवस पाळत, मग ठोकल्या बेड्या! तेलंगण पोलिसांची अमली पदार्थाविरोधात मोठी कारवाई; एलएसडीसह चरसही जप्त

Pakistan Violence: ईशनिंदेचा खोटा आरोप, संतापलेल्या जमावाने पेटवले घर-दुकान, 35 ख्रिश्चन कुटुंबांनी सोडले गाव; पाकिस्तानात पुन्हा निघाले मानवतेचे धिंडवडे

SCROLL FOR NEXT