TCS Hiring Plan Dainik Gomantak
अर्थविश्व-

TCS Hiring Plan: देशातील सर्वात मोठी कंपनी करणार 40 हजार फ्रेशर्सची भरती

TCS Hiring Plan: फ्रेशर्सना हायरिंग प्रक्रियेत कोणताही अडथळा येणार नाही.

दैनिक गोमन्तक

देशातील दुसर्‍या क्रमांकाची आयटी कंपनी टीसीएसने म्हटले आहे की चालू आर्थिक वर्षात ते महाविद्यालयाच्या परिसरातून 40 हजाराहून अधिक फ्रेशर्सना नियुक्त (TCS Hiring Plan) करणार आहेत. टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस सध्या खासगी क्षेत्रातील देशातील सर्वात मोठी एंप्लॉयर आहे. कंपनीच्या एकूण कर्मचार्‍यांची संख्या 5 लाखाहून अधिक आहे. मागील वर्षीही कंपनीने कॅम्पसमध्ये 40 हजार फ्रेशर्स कैम्पस हायरिंग केले होते. कंपनीचे ग्लोबल ह्युमन रिसोर्सचे चीफ मिलिंद लक्कड म्हणाले की, यावर्षी हे हायरिंग आणखी चांगली होईल.

लक्कड म्हणाले की कोरोनाचे संकट असूनही, हायरिंग प्रक्रियेत (TCS Hiring Plan) कोणताही अडथळा येणार नाही. गेल्या वर्षी कामावर 3.60 लाख फ्रेशर्स यात सहभागी झाले होते. बर्‍याच विद्यार्थ्यांची व्हर्च्युअल मुलाखत घेण्यात आली होती. मागील वर्षीही आम्ही महाविद्यालयाच्या परिसरातून 40 हजार फ्रेशर्सची हायरिंग केली होते आणि यंदाही त्याच संख्येने फ्रेशर्सची नियुक्त केली जाईल.

लक्कड म्हणाले की, नोकरी देण्याची प्रक्रिया खूप लांब असतो. असे नाही की कंपनीला प्रोजोक्ट मिळाल्यानंतर हायरिंग प्रक्रिया सुरू होते. एखाद्याला हायर केले जाते तेव्हा पुर्ण प्रक्रीया व्हायला किमान तीन महिने लागतात, त्यानंतरच तो व्यक्ती प्रोजेक्टवर काम करण्यास सुरवात करतो. दरम्यान आपल्या देशात प्रतिभेची कमतरता नाही, असे कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी एन. गणपती सुब्रमण्यम म्हणाले.

नफ्याने गाठली उंची

देशातील सर्वात मोठी सॉफ्टवेअर कंपनी टीसीएसने चालू आर्थिक वर्ष 2021-22 च्या पहिल्या तिमाहीत जबरदस्त नफा कमावला आहे. एप्रिल ते जून या कालावधीत कंपनीचा नफा 28.5 टक्क्यांनी वाढून 9,008 कोटी रुपये झाला. यापूर्वी 2020-21 या आर्थिक वर्षाच्या याच तिमाहीत कंपनीला 7,008 कोटी रुपयांचा नफा झाला होता. चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत कंपनीचे एकत्रित उत्पन्नही 18.5 टक्क्यांनी वाढून, 45,411कोटी रुपयांवर पोहचले आहे.

20 हजाराहून अधिक लोकांना नोकरी

वास्तविक टीसीएसने कोरोना कालावधीत सुमारे 20,409 नवीन कर्मचार्‍यांना नोकर्‍या दिल्या. यामुळे कर्मचार्‍यांची संख्या पाच लाखांच्या वर 5,09,058 वर गेली. टीसीएसचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि व्यवस्थापकीय संचालक राजेश गोपीनाथन म्हणाले की, कंपनीचे कर्मचारी एकमेकांना मदत करण्याच्या दृष्टीने उत्तम भूमिका निभावतात, समाजाला मदत करतात आणि ग्राहकांशी बांधिलकी ठेवतात.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Cutbona Jetty: कुटबण जेटीवर अस्वच्छतेचे साम्राज्य! आरोग्य खात्याच्या पाहणीत अनेक त्रुटी उघड; पाणीपुरवठ्या अभावी कामगारांचे हाल

म्हापसा नालेसफाईचा केवळ फार्स? पावसाळ्यापूर्वी प्रशासनाचा चालढकलपणा; नाल्यातील गाळ काठावरच ठेवल्यानं 'टुगेदर फॉर म्हापसा' संघटनेचा संताप

Goa Assembly Elections 2027: सासष्टीचा 'तो' बालेकिल्ला काँग्रेस पुन्हा जिंकणार? 2027 कडे सर्वांचे लक्ष; नुवे, बाणावली, कुडतरी आणि वेळ्ळी मतदारसंघांत पुन्हा एकदा चुरशीची लढत

Shocking News: रागाचा झटका बेतला जिवावर! स्वतःचा प्रायव्हेट पार्ट कापून देवाला केला अर्पण; बायकोसोबतच्या वादातून 25 वर्षीय तरुणानं उचललं टोकाचं पाऊल

Goa Human Trafficking: हरमल वेश्याव्यवसाय प्रकरणात दोन संशयितांना जामीन, ठोस पुराव्यांचा अभाव; पीडित महिलांनी साक्ष देण्यास दिला नकार

SCROLL FOR NEXT