Share Market Dainik Gomantak
अर्थविश्व-

Share Market: सुपर फ्रायडे! सेन्सेक्स प्रथमच 64000 च्या पुढे, निफ्टीही सर्वोच्च पातळीवर

Share Market: पहिल्यांदाच सेन्सेक्स 64 हजारांचा टप्पा ओलांडून 64,718 अंकांच्या पातळीवर बंद झाला. यादरम्यान सेन्सेक्स 800 अंकांनी वाढला.

Ashutosh Masgaunde

Sensex and Nifty50 Hits all Time High: आठवड्यातील शेवटचा दिवस देशांतर्गत शेअर बाजारासाठी सुपर फ्रायडे ठरला. जोरदार खरेदीनंतर सेन्सेक्स बीएसई आणि एनएसई निफ्टी सर्वकालीन उच्च पातळीवर बंद झाला.

पहिल्यांदाच सेन्सेक्सने 64 हजारांचा टप्पा ओलांडला आणि 64,718 अंकांच्या पातळीवर बंद झाला.

यादरम्यान सेन्सेक्स 800 अंकांनी वाढला. निफ्टीही पहिल्यांदाच 216 अंकांनी वाढून 19,189 अंकांच्या पातळीवर बंद झाला.

ऑटो, पीएसयू आणि आयटी क्षेत्र तेजीत

शुक्रवारच्या ट्रेडिंग सत्रादरम्यान, जिथे सेन्सेक्सने इंट्राडे 64,768 ची पातळी गाठली, तिथे निफ्टीनेही चौफेर खरेदीनंतर प्रथमच 19,201 चा स्तर गाठला.

जुलै मालिकेच्या पहिल्या दिवशी बाजारात बंपर रॅली पाहायला मिळाली. या काळात ऑटो, पीएसयू बँकिंग आणि आयटी क्षेत्रातील शेअर्समध्ये प्रचंड वाढ झाली.

शुक्रवारच्या ट्रेडिंग सत्रादरम्यान, BSE सेन्सेक्स 1.26% व NSE निफ्टी 1.14% वाढला.

जूनचा शेवटचा दिवस देशांतर्गत शेअर बाजारासाठी नवा विक्रम ठरला, तर अदानी समूहाला तोटा सहन करावा लागला. अदानी समूहासाठी हा महिना संमिश्र ठरला आहे. गेल्या आठवड्यात थोडी रिकव्हरी झाली होती, पण आठवड्याच्या आणि महिन्याच्या शेवटच्या दिवशीही तोट्यात राहिला.

9 स्टॉक घसरले

आठवड्याच्या आणि महिन्याच्या शेवटच्या दिवशी व्यवहार संपल्यानंतर अदानी समूहाच्या 10 पैकी 9 समभागांचे भाव घसरले. त्याचवेळी समूहाच्या केवळ 1 शेअरच्या किमतीत किंचित वाढ झाली.जूनचा शेवटचा आठवडा अदानी समूहासाठी काहीसा चांगला गेला होता.

किंमत 6 टक्क्यांहून अधिक घसरली

आजच्या व्यवसायातील सर्वात मोठी घसरण अदानी ट्रान्समिशनच्या किमतीत झाली. आजच्या व्यवसायात स्टॉक 6 टक्क्यांहून अधिक तोट्याने बंद झाला. अदानी पोर्ट्सचा स्टॉक 2.30 टक्क्यांहून अधिक घसरला. अंबुजा सिमेंट, अदानी पॉवरचे भाव सुमारे 2-2 टक्क्यांनी घसरले.

या स्टॉक्सचेही नुकसान

एनडीटीव्हीची किंमत सुमारे 1.50 टक्क्यांनी घसरली, तर अदानी ग्रीनला 1.30 टक्क्यांहून अधिक तोटा सहन करावा लागला. अदानी एंटरप्रायझेस आणि अदानी विल्मार हे फ्लॅगशिप शेअर्स सुमारे 1-1 टक्क्यांनी तोट्यात होते. अदानी टोटल गॅस किंचित घसरणीसह बंद झाला, तर एसीसी सिमेंटच्या किमतीत किरकोळ वाढ झाली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Online Betting Raid: गोवा पोलिसांचा डबल धमाका! ऑनलाइन सट्टेबाजी आणि दलालांवर एकाच वेळी कारवाईचा बडगा

Dewald Brevis: 22 वर्षीय बेबी एबीचं वादळ, ऑस्ट्रेलियाला धुतलं, विराट कोहली- बाबर आझमचा विक्रम उद्ध्वस्त

Goa Tourism: 'अन्यथा पर्यटन सेवा बंद करू!' म्हादईवरील रिव्हर राफ्टींग निधीसाठी पंचायत आक्रमक

Cristiano Ronaldo In Goa: गोव्यात 'ख्रिस्तियानो रोनाल्डो'ला पाहण्याचे स्वप्न अधांतरी; खेळण्याबाबत अनिश्चितता कायम

Rahul Gandhi: "चोरी चोरी, चुपके चुपके..." राहुल गांधींनी केला 'वोट चोरीचा' व्हिडिओ; निवडणूक आयोगावर साधला निशाणा

SCROLL FOR NEXT