price hike : मागील दोन वर्षांपासून कोरोनामुळे सर्वसामान्य हैराण झाले आहेत. घरगुती गॅस ही हजारात मिळत आहे. तर पेट्रोल आणि डिझेलच्या शंभरीपार गेलेल्या किंमतींमुळे सर्वसामान्यांचे बजेट पार कोलमडले आहे. त्यातच भर म्हणून आता सर्वसामान्यांना परवडणारा चहा तर अनेकांचा ताण कमी करणारी कॉफी अन् दोन मिनिटांत भूक भागवणाऱ्या मॅगी ने खिशाला झटका दिला आहे. मॅगीसोबतच चहा आणि कॉफीच्या किंमतीत वाढ झाल्याने यापुढे मॅगी, चहा आणि कॉफी पिण्यासाठी खिसा जरा मोकळा करावा लागणार आहे. (Maggie, coffee and tea are expensive)
नेस्लेने आपल्या प्रोडक्ट्सच्या किंमती वाढवल्याने मॅगीच्या किंमतीमध्ये 9 ते 16 टक्केंपर्यंत वाढ झाली आहे. त्यामुळे 12 रुपयेला मिळणाऱ्या मॅगीसाठी (Maggi) जास्त पैसे मोजावे लागणार आहेत. आधी 12 रुपयांना मिळणारी मॅगी 14 रुपयांना घ्यावी लागणार आहे. तर 96 रुपयांना मिळणारे मॅगी पाकिट आता 105 रुपयांना घ्यावे लागणार आहे.
कॉफीच्याही किंमतीत वाढ
मॅगी पाठोपाठ कॉफीच्याही (Coffee) किंमतीत वाढ झाली असून Bru च्या किंमतीमध्ये 3 ते 7 टक्क्यांनी वाढ झाली असून ब्रू गोल्ड कॉफीच्या किंमतीत 3 ते 4 टक्के वाढ झाली आहे. तर नेस्कॅफे कॅफे क्लासिकमध्ये ही वाढ होईल. आधी 78 रुपये कॉफी 80 रुपयात विकत घ्यावी लागेल. 145 रू मध्ये मिळणाऱ्या कॉफीच्या पाकिटाची किंमत 150 रुपये होणार आहे.
चहा ही 3.7 ते 5.8 टक्केंनी वाढला
ब्रू गोल्ड कॉफीच्या (Coffee) किंमतीत 3 ते 4 टक्के वाढ झाली असून चहाच्या (Tea) किंमतीत ही 3.7 ते 5.8 टक्क्यांनी वाढ झाली आहे. ब्रूक बॉन्डचा चहाची किंमत 1.5 ते 14 टक्क्यांनी वाढली आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.