टाटा सन्सचे प्रमुख एन. चंद्रशेखरन बनले एअर इंडियाचे प्रमुख

टाटा सन्सचे प्रमुख एन. चंद्रशेखरन यांची एअर इंडियाच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
N Chandrasekaran
N ChandrasekaranDainik Gomantak
Published on
Updated on

टाटा समूहाने एअर इंडियाचे नवे अध्यक्ष म्हणून नटराजन चंद्रशेखरन यांची नियुक्ती केली आहे. सोमवारी मंडळाने त्यांची नियुक्ती निश्चित केली. तत्पूर्वी, 14 फेब्रुवारी रोजी टाटा सन्सने तुर्की एअरलाइन्सचे माजी प्रमुख इल्कर IC यांची एअर इंडियाचे (Air India) मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) आणि व्यवस्थापकीय संचालक म्हणून नियुक्तीची घोषणा केली होती. परंतु IC ने ही ऑफर नाकारली. टाटा सन्सचे अध्यक्ष चंद्रेशखरन (N Chandrasekaran) हे कंपनीसोबत 100 हून अधिक टाटा ऑपरेटिंग कंपन्यांचे प्रवर्तक आहेत. ऑक्टोबर 2016 मध्ये ते टाटा सन्सच्या बोर्डात सामील झाले असून जानेवारी 2017 मध्ये त्यांची अध्यक्षपदी नियुक्ती झाली. (Tata Sons chief N Chandrasekaran appointed as President of Air India)

N Chandrasekaran
'...घरचं जेवण मिळणार नाही'; चित्रा रामकृष्ण यांनी केलेली विनंती न्यायालयाने फेटाळली

दरम्यान, टाटा सन्सचे अध्यक्ष चंद्रेशकरन टाटा स्टील, टाटा मोटर्स, टाटा पॉवर आणि टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (TCS) यासह विविध समूह ऑपरेटिंग कंपन्यांच्या मंडळाचे प्रमुख देखील आहेत. चंद्रशेखरन हे टाटा समूहाचे प्रमुख असलेले पहिले गैर-पारशी व्यक्ती आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com