Google CEO Sundar Pichai  Dainik Gomantak
अर्थविश्व-

Google Lay off: गुगलमध्ये एकीकडे 12,000 कर्मचाऱ्यांची कपात; तर दुसरीकडे CEO ना तब्बल 'इतका' पगार

सुंदर पिचाई यांना सामान्य कर्मचाऱ्यापेक्षा 800 पट जास्त पगार

Akshay Nirmale

Google Lay off: जगातील सर्वात मोठ्या कंपनीपैकी एक असलेल्या गुगलने सन 2022 मध्ये एकीकडे सुमारे 12 हजार कर्मचाऱ्यांना नारळ दिला आहे. तर दुसरीकडे याच वर्षात गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांना सुमारे 19 अब्ज रूपये पगार कंपनीने दिला आहे.

Google चे 44 वर्षीय भारतीय वंशाचे CEO सुंदर पिचाई यांना 2022 मध्ये गुगलकडून सुमारे $ 226 दशलक्ष म्हणजेच 18.54 अब्ज रुपये (१८५४ कोटी रूपये) पगार मिळाला आहे. ही रक्कम सामान्य कर्मचाऱ्याच्या पगारापेक्षा 800 पट जास्त आहे.

सीईओ पदावर बढती आणि अनेक उत्पादने यशस्वीपणे लॉन्च केल्याबद्दल गुगलच्या नुकसानभरपाई समितीने पिचाई यांना इतका भरघोस पगार दिल्याचे बोलले जात आहे.

पिचाई यांच्या नेतृत्वाखाली, Google ने प्रामुख्याने जाहिराती आणि YouTube व्यवसायातून नफा मिळवला आहे. यावेळी कंपनीने मशीन लर्निंग, हार्डवेअर आणि क्लाउड कॉम्प्युटिंगमध्येही गुंतवणूक केली आहे.

त्याचबरोबर कंपनीने म्हटले आहे, पिचाई यांना स्टॉक अवॉर्डमुळे इतका पगार मिळाला आहे. त्यांच्या पगारात अंदाजे $ 218 दशलक्ष म्हणजेच रु. 17.88 अब्ज स्टॉक अॅवॉर्डचा समावेश आहे.

दरम्यान, Google ची मूळ कंपनी असलेल्या Alphabet कडून विविध स्तरावर जगभरात नोकऱ्यांमध्ये कपात केली जात आहे. अल्फाबेट कंपनीने जानेवारीमध्ये घोषणा केली होती की जगभरातील कार्यालयातून 12,000 नोकऱ्यांची कपात केली जाईल. कर्मचाऱ्यांची ही संख्या कंपनीतील एकूण कर्मचारी संख्येच्या 6 टक्के इतकी आहे.

दरम्यान, या महिन्याच्या सुरुवातीला Google च्या लंडन कार्यालयातील शेकडो कर्मचार्‍यांनी राजीनामा दिला होता.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Karthik Aaryan In Goa: 'रुह बाबा'नं पुन्हा जिंकलं चाहत्यांचं मन; गोव्यात एन्जॉय करतानाचे फोटो केले शेअर!

Winter Care Tips: हिवाळ्यात त्वचेची घ्या विशेष काळजी; 'हे' घरगुती उपाय नक्की ट्राय करा!

Margao Police: हुल्लडबाजांना चाप; मडगाव पोलिसांनी जप्त केल्या मॉडिफाईड बुलेट

South Goa Beach: दक्षिण गोव्यातील समुद्र किनाऱ्यांची धूप वृध्दी सुरुच; राष्ट्रीय अभ्यासातून खुलासा!

Shruti Prabhugaonkar: गोमंतकीयांना कोट्यवधी रुपयांना गंडवणाऱ्या श्रुतीला अवघ्या १० दिवसात जामीन

SCROLL FOR NEXT