World Earth Day 2023: गूगलने वसुंधरा दिनानिमित्त बनवले खास डूडल , पहा आजचं डूडल

गूगल खास डूडल तयार करुन आज वसुंधरा दिन साजरा करत आहे
Google Doodle
Google DoodleDainik Gomantak
Published on
Updated on

Google Doodle For Earth Day: गूगल खास डूडल तयार करुन आज वसुंधरा दिन साजरा करत आहे. संपूर्ण भारतभर सुरू असलेल्या उष्मघातामुळे गूगल आज डूडलच्या अद्वितीय कलाकृतीसह जागतिक वसुंधरा दिन साजरा करत आहे. 

आजचे डूडल लोकांना पर्यावरणपूरक होण्यासाठी प्रोत्साहित करताना, हवामान बदलाविरूद्ध कारवाई करण्यासाठी आपण सर्व लहान-मोठ्या मार्गांनी एकत्र कसे काम करू शकतो यावर प्रकाश टाकत आहे.

1970 मध्ये प्रथमच जागतिक पृथ्वी दिवस 2022 साजरा करण्यात आला. 1969 मध्ये, ज्युलियन कोनिग यांनी पर्यावरणाचे रक्षण करण्यासाठी या चळवळीला पृथ्वी दिवस असे नाव दिले आणि हा दिवस 22 एप्रिल रोजी साजरा करण्यात आला.

पृथ्वी दिन संपूर्ण जगभरात वर्षातून दोन दिवस (21 मार्च आणि 22 एप्रिल) साजरा केला जात होता. 1970 मध्ये जेव्हा पृथ्वी दिन पहिल्यांदा साजरा करण्यात आला, तेव्हापासून संपूर्ण जग या दिवशी पृथ्वी दिन साजरा करते.

पर्यावरण रक्षणाबाबत लोकांना जागरूक करणे हा या दिवसाचा उद्देश आहे. यामुळेच या प्रयत्नाचे संयुक्त राष्ट्रांनीही कौतुक केले आणि 2009 मध्ये वसुंधरा दिनाला संयुक्त राष्ट्र संघाचाही पाठिंबा मिळाला.

आजचे खास डूडल

आजचे डूडल आपल्या पृथ्वीला वाचवण्यासाठी व्यक्ती आणि समुदाय एकत्र कसे कार्य करू शकतात हे दाखवते. आपण प्रवास करण्याचा मार्ग, आपण वापरत असलेली वीज, आपण खातो ते अन्न आणि आपण खरेदी करत असलेल्या गोष्टी जगभरातील सर्वात वाईट हवामान बदलाच्या प्रभावांमध्ये फरक करू शकतात.

यंदा जागतिक वसुंधरा दिवसाची थीम आहे Invest in our planet. म्हणजेच आपल्या पृथ्वीवर चांगल्या गोष्टी इनवेस्ट करा ज्याचा फायदा तुम्हाला भविष्यात होणार.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com