How Many Years Will Your Money Double in Post Office Scheme Know rule of 72  Dainik Gomantak
अर्थविश्व-

Post Office Scheme: कीती वर्षात दुप्पट होतील तुमचे पैसे? जाणून घ्या 72 चा नियम

पोस्ट ऑफिस योजना त्या लोकांसाठी आहे ज्यांना आपल्या पैशाची सुरक्षित ठिकाणी गुंतवणूक करायची आहे.

दैनिक गोमन्तक

पोस्ट ऑफिस योजना (Post Office Scheme) त्या लोकांसाठी आहे ज्यांना आपल्या पैशाची सुरक्षित ठिकाणी गुंतवणूक करायची आहे. पोस्ट ऑफिस अनेक बचत योजना चालवते आणि सरकार त्यावर उत्तम परताव्याची हमी देते. पोस्ट ऑफिस योजनेत तुमचे पैसे 100% सुरक्षित राहतात. तुमचे पैसे केव्हा दुप्पट होतील याची गणना करण्यासाठी 72 चा नियम वापरला जातो, ज्यामुळे तुमचा गुंतवलेला पैसा किती काळात दुप्पट होणार आहे याची कल्पना येते.

काय आहे नियम 72?

72 चा नियम हा एक प्रकारचा फॉर्म्युला आहे, ज्याचा वापर करून तुमचे पैसे कधी दुप्पट होतील याची गणना करता येते. हे खरं तर गणितीय समीकरणांवर आधारित एक तंत्र आहे, ज्यावरून हे अगदी सहजपणे कळू शकते की तुमचे पैसे किती वर्षांत दुप्पट होऊ शकतात. या नियमानुसार, व्याजदराला 72 ने भागून मिळालेली रक्कम हे तुमच्या प्रश्नाचं उत्तर असेल म्हणजे तुमचे कीती पैसे दुप्पट होतील हे या फॉर्म्युला मधून कळेल. हे साधारणपणे एफडी इत्यादी गुंतवणुकीसाठी चांगले काम करते.

पोस्ट ऑफिस बचत बँक खाते

तुम्ही तुमचे पैसे पोस्ट ऑफिस बचत खात्यात ठेवल्यास, तुम्हाला पैसे दुप्पट होण्यासाठी जास्त काळ प्रतीक्षा करावी लागेल कारण त्यावर फक्त 4 टक्के प्रतिवर्ष व्याज लागते. म्हणून तुमचे पैसे 18 वर्षात दुप्पट होतील.

पोस्ट ऑफिस रेकरिंग डिपॉजिट

सध्या तुम्हाला पोस्ट ऑफिस रिकरिंग डिपॉझिट (RD) वर 5.8 टक्के व्याज दिले जात आहे, त्यामुळे या व्याजदराने पैसे गुंतवले तर ते जवळजवळ 12.41 वर्षांत दुप्पट होईल.

पोस्ट ऑफिस मासिक उत्पन्न योजना

पोस्ट ऑफिस मासिक उत्पन्न योजना (MIS) वर सध्या 6.6 टक्के व्याज मिळत आहे. जर या व्याजदराने पैसे गुंतवले गेले तर सुमारे 10.91 वर्षात ते दुप्पट होईल.

पोस्ट ऑफिस ज्येष्ठ नागरिक बचत योजना

सध्या पोस्ट ऑफिस ज्येष्ठ नागरिक बचत योजना (SCSS) वर ७.४ टक्के दराने व्याज दिले जात आहे. या योजनेत, तुमचे पैसे सुमारे 9.73 वर्षांत दुप्पट होतील.

पोस्ट ऑफिस PPF

पोस्ट ऑफिसच्या 15 वर्षांच्या सार्वजनिक भविष्य निर्वाह निधीवर (PPF) सध्या 7.1 टक्के व्याज मिळत आहे. या दराने तुमचे पैसे दुप्पट होण्यासाठी सुमारे 10.14 वर्षे लागतील.

पोस्ट ऑफिस राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र

सध्या पोस्ट ऑफिस नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेट (NSC) वर ६.८ टक्के दराने व्याज दिले जात आहे. ही 5 वर्षांची बचत योजना आहे, ज्यामध्ये आयकर देखील वाचवला जाऊ शकतो. जर या व्याजदराने पैसे गुंतवले गेले तर ते सुमारे 10.59 वर्षांत दुप्पट होईल.

पोस्ट ऑफिस टाइम डिपॉझिट (TD)

सध्या 1-3 वर्षांच्या पोस्ट ऑफिस टाइम डिपॉझिटवर (TD) 5.5 टक्के व्याज उपलब्ध आहे. तुम्ही यामध्ये गुंतवणूक केल्यास तुमचे पैसे सुमारे 13 वर्षांत दुप्पट होतील. त्याचप्रमाणे, तुम्हाला 5 वर्षांच्या मुदत ठेवीवर 6.7 टक्के व्याज मिळत आहे. या व्याजदराने पैसे गुंतवले तर तुमचे पैसे सुमारे 10.75 वर्षांत दुप्पट होतील.

पोस्ट ऑफिस सुकन्या समृद्धी खाते योजना

पोस्ट ऑफिस सुकन्या समृद्धी खाते योजनेवर सध्या सर्वाधिक ७.६ टक्के व्याज मिळत आहे. मुलींसाठी चालवल्या जात असलेल्या या योजनेत पैसे दुप्पट होण्यासाठी सुमारे 9.47 वर्षे लागतील.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT