Elon Musk To Introduce Free Voice And Video Calling On X, Twitter To Overtake Whatsapp:
WhatsApp चा यूजर बेस प्रचंड आहे. जगभरात सुमारे 270 कोटी लोक याचा वापर करतात. तर दुसरीकडे ट्विटर यूजर्सची संख्या जागतिक स्तरावर सुमारे 40 कोटी आहे.
अशा परिस्थितीत इलॉन मस्कचा ट्विटर WhatsApp यूजरबेसच्या तुलनेत खूपच मागे आहे. मात्र, आता एलोन मस्क ट्विटरवर व्हिडिओ आणि ऑडिओ कॉलिंगचा पर्याय देऊन मोठा बदल करणार आहेत.
ट्विटरचे मालक एलोन मस्क यांनी नुकतेच जाहीर केले आहे की, ते लवकरच ट्विटरवर ऑडिओ आणि व्हिडिओ कॉल करण्याचा पर्याय देणार आहेत. त्याचा थेट परिणाम WhatsApp वर दिसून येत आहे.
यातून मस्क WhatsApp चे यूजर्स ट्विटरवर खेचण्याचा सर्वोत्तम प्रयत्न करत आहेत. यामुळे WhatsApp चे मालक मार्क झुकेरबर्ग यांच्यासमोर नवे आव्हान निर्माण झाले आहे. पण या सर्व घडमोडींमुळे यूजर्सना मोठा फायदा होणार आहे.
Android तसेच iOS यूजर्स ट्विटरवर व्हिडिओ कॉलिंग आणि ऑडिओ कॉलिंगचा आनंद घेऊ शकतील. याशिवाय मॅक आणि पीसीवरही व्हिडिओ आणि कॉलिंगचा पर्यायही उपलब्ध असेल.
ही सुविधा कदाचित फक्त ब्लू सबस्क्रिप्शन म्हणजेच सशुल्क यूजर्ससाठी उपलब्ध असेल. मात्र, इलॉन मस्क यांनी याबाबत सध्या कोणतीही घोषणा केलेली नाही. पण ही कंपनीची प्रीमियम सेवा असू शकते.
ट्विटरवरून ऑडिओ किंवा व्हिडीओ कॉल करण्यासाठी मोबाईल नंबरची आवश्यकता असणार नाही. अशा स्थितीत व्हिडिओ आणि ऑडिओ कॉल्सद्वारे फसवणूक होण्याची शक्यताही कमी होईल.
WhatsApp आणि ट्विटरवर व्हिडिओ आणि ऑडिओ कॉलिंग सुविधा उपलब्ध झाल्यास सामान्य मोबाइल आणि मेसेजिंग पूर्णपणे संपणार नाही. पण त्याची संख्या नक्कीच कमी होईल.
देशभरात 5G सेवा सुरू झाल्यानंतर डेटाचा वापर वाढेल. अशा परिस्थितीत इंटरनेट कॉलिंगमध्ये सुधारणा होईल. त्यामुळे नॉर्मल कॉलिंगमध्ये घट होण्याची शक्यता आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.