आणखी सोपे झाले हो! आता साध्यातल्या साध्या फोनवरुन करता येणार UPI पेमेंट

RBI Governor: भारत डिजीटल क्रांतीमध्ये आपले योगदान देत आहे. डिजीटल पेमेंट सुविधा देशात प्रत्येक ठिकाणी मिळत आहे.
RBI Governor
RBI GovernorDainik Gomantak
Published on
Updated on

RBI Governor: भारत डिजीटल क्रांतीमध्ये आपले योगदान देत आहे. डिजीटल पेमेंट सुविधा सध्या देशात प्रत्येक ठिकाणी मिळत आहे. यातच आता रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) चे गव्हर्नर शक्तीकांत दास यांनी सांगितले की, 'आम्ही UPI प्रणाली ऑपरेट करण्यासाठी फीचर फोनचाही आधार घेत आहोत.'

दरम्यान, इंदूरमधील देवी अहिल्या विद्यापीठ (डीएव्हीव्ही) येथे आयोजित कार्यक्रमात RBI गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी हे वक्तव्य केले. यूपीआय पेमेंट सिस्टमला आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताचे एक मोठे यश म्हणून पाहिले जात आहे.

हा रिझर्व्ह बँकेच्या पुढाकारांपैकी एक आहे. मात्र, सरकारच्या भक्कम पाठिंब्याशिवाय हे शक्य झाले नसते. सरकारच्या पाठिंब्याने, आरबीआयने (RBI) यूपीआयला जगातील सर्वात मोठी पेमेंट प्रणाली बनवण्यात महत्त्वाचे योगदान दिले, असे आरबीआय गव्हर्नर म्हणाले.

RBI Governor
जगात भारी! RBI गव्हर्नर शक्तीकांत दास ठरले सर्वोत्तम बॅंकर

दास यांनी पुढे सांगितले की, 'ऑगस्ट महिन्यात UPI व्यवहाराचा रेकॉर्ड झाला. 10 अब्ज पेक्षा जास्त UPI व्यवहार झाले. सप्टेंबर 2016 मध्ये यूपीआयची सुरुवात झाली, मात्र नंतर वाढ स्थिर राहिली. आता हा आकडा 10 अब्जापेक्षा अधिक झाला आहे. पण तो पुरेसे नाही, तो आणखी वाढेल.'

''आम्ही डिजिटल पेमेंटला प्रोत्साहन दिले आहे, परंतु UPI संबंधी मुख्य आव्हान हे आहे की, त्यासाठी स्मार्टफोनची आवश्यकता असते. परंतु आपल्या देशात मोठ्या संख्येने लोक फीचर फोन वापरत आहेत.

आम्ही UPI प्रणाली ऑपरेट करण्यासाठी फीचर फोन बनवण्यासाठी काही उत्पादने लाँच केली आहेत. आम्ही हे सुनिश्चित करण्यासाठी देखील पावले उचलली आहेत की, ज्या भागात खराब कनेक्टिव्हिटी आहे, तिथे एका वॉलेटद्वारे कोणीही UPI वर व्यवहार करु शकतो,'' असेही ते पुढे म्हणाले.

दास पुढे म्हणाले की, "आम्ही अशा काही देशांपैकी आहोत, ज्यांनी सीबीडीसी (सेंट्रल बँक डिजिटल करन्सी) वर एक पायलट प्रोजेक्ट सुरु केला, ज्याचे नाव 'ई-रुपी' आहे. ते चलनाचे डिजिटल युनिट आहे. पायलट प्रोजेक्ट आधीच कार्यरत असून अनेक चाचण्या सुरु आहेत.''

RBI Governor
New RBI Guidelines: बँकांच्या मनमानीला चाप; RBI कडून कर्ज खात्यावरील दंडाच्या नियमांत बदल

दरम्यान, महागाईबाबत बोलताना दास म्हणाले की, ''जुलै महिन्यासाठी 14 ऑगस्ट रोजी जारी करण्यात आलेला नवीन महागाई (Inflation) दर 7.4 टक्के होता. ज्यामुळे सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला होता.

पण मुख्यत: भाजीपाल्यांच्या वाढलेल्या किमतींमुळे महागाई मोठ्या प्रमाणात वाढली. टोमॅटोचे भाव 200 टक्क्यांहून अधिक वाढले आणि नंतर टोमॅटोच्या भाववाढीचा परिणाम थेट इतर भाज्यांवर झाला त्यामुळे महागाईचा भडका उडाला.''

भाजीपाल्यांचे दर जे वाढले आहेत, त्याचा परिणाम सप्टेंबरपासून कमी होण्यास सुरुवात होईल, अशी अपेक्षा आहे. प्रत्यक्षात टोमॅटोचे भाव खाली आले आहेत. टोमॅटो वाजवी दरात उपलब्ध व्हावेत यासाठी सरकारने अनेक उपाययोजना केल्या आहेत. सप्टेंबरपासून एकूण चलनवाढीचा दर कमी होण्यास सुरुवात होईल, असेही ते पुढे म्हणाले.

RBI Governor
RBI on Unsecured Lending: आरबीआयने बदलले नियम, पर्सनल लोन आणि क्रेडिट कार्ड लोन मिळणे होणार कठीण

दास पुढे म्हणाले की, "भारत हा सर्वात वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था आहे, सरकार आणि रिझर्व्ह बँक यांच्यातील समन्वयित पाऊंलामुळे हे शक्य झाले आहे.''

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com