Zomato Kachra Campaign  Dainik Gomantak
अर्थविश्व

Watch Video : Zomato Ad मध्ये लगानमधील 'कचरा'; नेटकऱ्यांनी झापल्यानंतर जाहिरात मागे घेण्याची नामुष्की

Zomato Kachra Campaign : झोमॅटोच्या नवीन जाहिरातीवरुन गदारोळ झाला होता. ही जाहिरात अत्यंत वर्णद्वेषी असल्याचा आरोप केला आहे. वाढता वाद पाहून कंपनीने ही जाहिरात हटवली.

Ashutosh Masgaunde

Zomato Kachra Ad Controversy: जागतिक पर्यावरण दिनानिमित्त झोमॅटोने निर्मीती केलेल्या नवीन जाहिरातीबाबत गदारोळ झाला. त्यानंतर कंपनीला घाईघाईत जाहिरात मागे घ्यावी लागली.

वास्तविक, Zomato ने या जाहिरातीमध्ये लगान चित्रपटातील 'कचरा' हे पात्र वापरले आणि त्यातून कचऱ्याचा पुनर्वापर कसा करतात हे दाखवण्याचा प्रयत्न केला. जाहिरातीमध्ये कचरा हा खरा कचरा दाखवण्यात आला.

मग काय, सोशल मीडियावर युजर्सनी संताप व्यक्त करत कंपनीवर हल्लाबोल केला. एवढेच नाही तर पत्रकार दिलीप मंडल यांनीही या वादात उडी घेतली आणि त्यांनीही कंपनीला सल्ला देत या जाहिरातीला अत्यंत जातीयवादी म्हटले.

वास्तविक, ही जाहिरात लगान चित्रपटात ‘कचरा’ची भूमिका साकारणाऱ्या आदित्य लखियावर चित्रित करण्यात आली होती. पण कंपनीने लगानमधील कचरा हे दलित पात्र असल्याचे लक्षात घेतले नाही आणि त्यामुळे सोशल मीडियावर खळबळ उडाली.

या जाहिरातीत झोमॅटोने ते कचऱ्याचा पुनर्वापर कसा करतात हे दाखवले. त्याचा योग्य वापर कसा करावा जेणेकरून पर्यावरणाचे रक्षण करता येईल. कंपनीने आदित्यला या जाहिरातीत ‘कचरा’च्या भूमिकेत कास्ट केले आहे.

काय आहे जाहिरातीत?

आदित्यचे पात्र कचरा हे खऱ्या कचऱ्यासारखे दाखवण्यात आले होते. या जाहिरातीत आदित्य कसा टेबलावर उभा आहे हे दाखवण्यात आले आहे. एका ठिकाणी टॉवेल आहेत ज्याला कोणीतरी नाक पुसत आहे. एका ठिकाणी दिवा आहे ज्याच्या जवळ एक मुलगी पुस्तक वाचत आहे. हे कचरा पात्र काही ठिकाणी फ्लॉवरपॉट्स, तर काही ठिकाणी कॉर्क म्हणून दाखवले आहे. झोमॅटोला हे दाखवायचे होते की, कचऱ्याचा पुनर्वापर कसा केला जाऊ शकतो आणि किती वेगवेगळ्या गोष्टींसाठी वापरला जाऊ शकतो.

झोमॅटोची जाहिरात रिट्विट करत पत्रकार दिलीप मंडल यांनी लिहिले की, तुमची जाहिरात अत्यंत जातीयवादी आणि अपमानास्पद आहे. माफी मागा आणि जाहिरात मागे घ्या. अन्यथा तुमच्यावर शेकडो खटले दाखल होतील. आशुतोष गोवारीकर यांनी पहिली चूक केली की त्यांनी दलित पात्राला कचरा असे नाव दिले. आता तुम्ही जखमेवर मीठ चोळत आहात.

“लगान: वन्स अपॉन अ टाइम इन इंडिया” हा २००१ मधील आशुतोष गोवारीकर लिखित आणि दिग्दर्शित चित्रपट आहे. या चित्रपटाची निर्मिती आमिर खानने केली होती,  तसेच अमिरने ग्रेसी सिंग आणि ब्रिटीश कलाकार रेचेल शेली आणि पॉल ब्लॅकथॉर्न यांच्यासोबत भूमिका केल्या होत्या. यामध्ये गाजलेले ‘कचरा’ हे पात्र अदित्य लाखिया याने राकारले होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

ED Goa: गोव्यात ईडीची झाडाझडती; 'सडा अर्बन'ची 1.05 कोटींची मालमत्ता तर जमीन हडप प्रकरणी संदीप वझरकर 3.19 कोटींची जमीन जप्त

Goa: भर पावसात प्रवासी बोट नदीत बुडाली; बाहेर काढण्यासाठी गोवा सरकारने 11 दिवसांत खर्च केले 20 लाख रुपये

Multiple Organ Failure Diseases: एकाच आजारानं हृदय, यकृत अन् मूत्रपिंड खराब होऊ शकतं का? जाणून घ्या वैज्ञानिक कारण अन् प्रतिबंधात्मक उपाय

Goa News Live: अडवलपालमध्ये गढूळ पाण्याचा पुरवठा, 'फोमेंतो' कंपनीच्या रिजेक्शनमुळे समस्या

Pandharpur Wari: 1566 साली लोक जुने गोवेतील रस्त्यांतून, अभंग म्हणत वारीला जात असल्याची नोंद आहे..

SCROLL FOR NEXT