Zomato launches 'Zomato Pro Plus' for unlimited free delivery Dainik Gomantak
अर्थविश्व

Zomato ची आता अनलिमिटेड मोफत डिलिव्हरी

देशातील सर्वात मोठी फूड ऑर्डरिंग आणि फूड डिलिव्हरी(Online Food Delivery) कंपनी झोमॅटोने(Zomato) आपल्या ग्राहकांना सुखद धक्का दिला आहे.

दैनिक गोमन्तक

देशातील सर्वात मोठी फूड ऑर्डरिंग आणि फूड डिलिव्हरी(Online Food Delivery) कंपनी झोमॅटोने(Zomato) आपल्या ग्राहकांना सुखद धक्का दिला आहे.झोमॅटो आता आपल्या काही खास आणि निवडक ग्राहकांसाठी 'झोमॅटो प्रो प्लस'(Zomato Pro Plus) ही आपली नवीन सेवा लॉन्च करणार आहे ज्यामधून ग्राहकांना त्यांच्या ऑर्डरसाठी अमर्यादित मोफत डिलिव्हरी मिळू शकणार आहे. अशी माहिती कंपनीचे संस्थापक, एमडी आणि सीईओ दीपिंदर गोयल(Deepinder Goyal) यांनी सांगितली आहे.

गोयल यांनी ट्विटरवर झोमॅटो प्रो प्लस लाँच करण्याची घोषणा करत म्हणाले की,कंपनीने आपल्या ग्राहकांकडून काही फीडबॅक मागवले होते त्यात कंपनीच्या ग्राहकांकडून सर्वात जास्त विनंती करण्यात जी विनंती करण्यात आली ती म्हणजे म्हणजे ज्याप्रमाणे ॲमेझोन आपल्या ग्राहकांसाठी प्राइम सबस्क्रिप्शन देते त्याच आधारावर कंपनीनेही सारखे मोफत वितरण करावे.

"तर ... काही तासांमध्ये, आम्ही निवडक ग्राहकांसाठी आमची मर्यादित आवृत्ती * प्रो प्लस * सदस्यता सुरू करत आहोत ...," असे गोयलयांनी सांगितले आहे.

कशी मिळवता येईल झोमॅटो प्रो प्लस सेवा

गोयल म्हणाले की, सर्व झोमॅटो एडिशन ब्लॅक क्रेडिट कार्ड धारकांना आपोआप झोमॅटो प्रो प्लसमध्ये अपग्रेड केले जाईल, तर इतर सर्वांना झोमॅटो ॲपवरून प्रो प्लस अपग्रेड खरेदी करावे कलागणार आहे.

कंपनीने आपल्या ग्राहकांना झोमॅटो प्रो प्लस सदस्यत्वासाठी आमंत्रण मिळाले आहे की नाही हे तपासण्यासाठी संध्याकाळी 6 नंतर झोमॅटो ॲप उघडण्यास सांगितले आहे . कंपनी झोमॅटो 'प्रो प्लस' सदस्यांसाठी वाढीव शुल्क किंवा अंतर शुल्क आकारणार नाही,उलट त्यांना झोमॅटो प्रोचे सर्व फायदे देखील मिळतील.

'प्रो प्लस' सदस्यता देशभरातील 41 शहरांमध्ये उपलब्ध असेल जिथे झोमॅटो त्याची झोमॅटो प्रो सदस्यता देते. झोमॅटो प्रो अंतर्गत, कंपनी होम डिलिव्हरी ऑर्डरवर अतिरिक्त सवलत देण्याचा दावा करते, तर ती जेवणासाठी बिलावर 40 टक्के सूटही देते.

कंपनीकडे सध्या 1.8 दशलक्ष झोमॅटो प्रो सदस्य आहेत.ज्यांना झोमॅटो प्रोसाठी मेंबरशिप घ्यायची आहे अशांना 3 महिन्यांच्या सदस्यत्वाची किंमत 200 रुपये आहे, तर वार्षिक सदस्यत्वासाठी 750 रुपये शुल्क द्यावा लागणार आहे. अशी माहितीही गोयल यांनी दिली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Viral Video: भर मैदानात घुसला 'बिनतिकीट' पाहुणा! कुत्र्याच्या एंट्रीनं खेळाडूंमध्ये घबराट, पाहा VIDEO

Raj - Uddhav Thackeray: मुंबईत दुमदुमला 'आवाज मराठी'चा; 20 वर्षानंतर राज - उद्धव एकत्र

"हॉटेलचं जेवण चाखल्यावर घरचं आवडेल का?" प्रेमानंद महाराजांनी सांगितलं तरुणांच्या घटस्फोटांचं मुख्य कारण; Watch Video

Crime News: लाकडाच्या भुशात दारु लपवली, कर्नाटकच्या गाडीला गोव्याची नंबरप्लेट लावली; केरी नाक्यावर 12 लाखांचे गोवा बनावटीचे मद्य जप्त

Goa News Live Updates: झाड पडलेल्या घराची वीज मंत्री सुदिन ढवळीकर यांनी केली पाहणी

SCROLL FOR NEXT