रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडची (Reliance Industries Limited) (RIL) शाखा रिलायन्स रिटेल 200-250 दशलक्ष डॉलरमध्ये सबवे इंक इंडियाची (Subway Inc. India) फ्रँचायझी विकत (Buying a franchise) घेण्याच्या तयारीत असल्याचे समोर येत आहे.
सबवेची सध्या विक्री कमी झाल्याने कंपनी सध्या पुर्नरचनेतून जात आहे. त्यामुळे खर्च कमी करण्याचा प्रयत्न कंपनीचा आहे. असे सबवेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जॉन चिडसे यांनी अहवालातून सांगितले आहे. सबवे सध्याचे फ्रँचायझी आणि स्थानिक भागीदार यांच्याशी सहयोग करुन आपला भारतातील व्यवसाय सुरक्षीत करण्याचा प्रयत्न करीत आहेत.
रिलायन्स रिटेलने FY22 च्या पहिल्या तिमाहित 962 कोटी रुपयांचा निव्वळ नफा मिळविला आहे. जो दरवर्षी पेक्षा 123 टक्क्यांपेक्षा जास्त आहे. जा मागील आर्थिक वर्षात याच कालावधीत 431 कोटी रुपयांच्या तुलनेत आहे.
रिलायन्स सध्या रिटेल, इलेक्ट्रॉनिक्स, फॅशन, जीवनशैली, लक्झरी याची चेन चालवत आहे. कंपनीने 20 जुलैला जस्ट डायलमध्ये 20.97 टक्के भागभांडवल विकत घेतले आहेत. त्यांनी 20 जुलै रोजी जस्ट डायलचे 1 कोटी 20 लाख 61 हजार 163 इक्किटीचे शेअर्स बीएसईवर 1 हजार 020 रुपये प्रती शेअरवर खेरेदी करत, मोठ्या प्रमाणात सौद्यांची आकडेवारी दाखवली आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.