Nitin Gadkari Dainik Gomantak
अर्थविश्व

Hydrogen Car बाबत नितीन गडकरींचं मोठं वक्तव्य, 1KG मध्ये 400KM धावणार

Hydrogen Car Nitin Gadkari: भारतात लवकरच हायड्रोजन इंधनावर चालणारी वाहने तुम्हाला दिसू लागतील.

दैनिक गोमन्तक

Hydrogen Car Nitin Gadkari: भारतात लवकरच हायड्रोजन इंधनावर चालणारी वाहने तुम्हाला दिसू लागतील. भारत सरकार इलेक्ट्रिक आणि बायो-इंधन वाहनांवर भर देत आहे. केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी म्हणाले की, 'भारतात सर्वसामान्यांना लवकरच हायड्रोजन कार मिळू लागेल.' मंगळवारी एका कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी त्यांनी वाढत्या प्रदुषणाबाबतही चिंता व्यक्त केली.

वास्तविक, हायड्रोजन कारचे उत्पादन आता भारतात (India) होणार आहे. त्याची प्रक्रिया सुरु झाली आहे. सध्या हायड्रोजन तीन प्रकारे बनवले जात आहे. Black Hydrogen जे कोळशापासून बनवले जाते. Brown Hydrogen जे पेट्रोलियम पदार्थापासून पासून बनवले जाते. त्याचा तिसरा प्रकार ग्रीन हायड्रोजन आहे. जे महापालिकेचा कचरा, सांडपाणी किंवा पाण्यापासून बनवता येते.

गडकरी पुढे म्हणाले की, "आम्हाला महापालिकेच्या कचऱ्यापासून हरित इंधन बनवायचे आहे. आता आम्हाला इंधन आयात करायचे नाही, तर निर्यात करायचे आहे. आम्ही शेतीतील कचऱ्यापासून ऊर्जाही बनवू शकतो. त्यासाठी आम्हाला इलेक्ट्रोलायझरची गरज आहे, जे भारत जगातील सर्वोत्तम बनवते. त्याचे काम ऑक्सिजन (Oxygen) वेगळे करणे आणि हायड्रोजन तयार करणे आहे. यासाठी आम्हाला एक जनरेटर हवा आहे, जो इथेनॉल इंधनावर आधारित बनवलेला असेल."

सध्या, भारतात इलेक्ट्रॉनिक वाहनांचा खप एवढा वाढला आहे की, अनेक वाहने एक ते दीड वर्षे प्रतीक्षेत आहेत. लवकरच भारत वाहनांच्या प्रदूषणापासून (Pollution) मुक्त होईल अशी अपेक्षा आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Grah Gochar 2026: 1 सप्टेंबरला बनणार 6 शक्तिशाली राजयोग! 'या' राशींची तिजोरी पैशांनी भरणार; होणार अफाट धन वर्षाव

Weather Update: ऑगस्टमध्ये समाधानकारक पाऊस, सर्वाधिक वाळपईत; जुलैमधील पावसाचा तुटवडा मात्र कायम

Marcel Road Issue: माशेलात 'वर्दळीचा' रस्ता धोकादायक, खड्ड्यांमुळे वाहतुकीला अडथळा; पावसात दुचाकीस्वारांसमोर मोठे संकट

Panaji: थकीत घरपट्टीचा फटका भाडेकरूंना; उत्पन्नाचा दाखला मिळविताना भाडेकरूंच्या मुलांची मोठी कसरत

Police Attack Viral Video: पीएसआयचा गळा आवळला, लोखंडी साखळीने हल्ला... लखनऊमध्ये अतिक्रमण हटवताना राडा; दोन महिलांसह 6 जणांना बेड्या

SCROLL FOR NEXT