YouTuber Arjun Yogan paid off his father's debt of Rs 40 lakhs from his YouTube earnings:
YouTube हे एक असे व्यासपीठ आहे, जिथे तुम्हाला जे पाहिजे ते पाहायला मिळते. पण इथे तुम्ही फक्त व्हिडिओच पाहू शकत नाही तर पैसेही कमवू शकता.
YouTube वर जम बसवल्यास तुम्ही महिन्याला लाखो रुपये कमवू शकता. आम्ही हे असेच म्हणत नाही. कारण, एका तरुणाने यूट्यूबवरून एवढी कमाई केली आहे की, त्याने त्याच्या वडिलांचे ४० लाखांचे कर्ज फेडले आहे. आणि त्या तरुणाचे नाव आहे, अर्जून योगान.
ब्रिटनमध्ये राहणारा अर्जुन योगन सांगतो की, त्यांच्या घरात कोणीही कमावत नव्हते. आई आजारी असताना वडील कामावर जाऊ शकत नव्हते. यामुळे त्याच्यावर 40 लाखांचे कर्ज झाले होते.
या सर्व निराशाजनक परिस्थितीत अर्जूनने YouTube च्या माध्यमातून भारघोस कमाई सुरू केली. आणि बघता बघता त्याने वडिलांचे 40 लाखांचे कर्ज फेडले. आजही अर्जून YouTube वरुन लाखो रुपये कमावतोय.
सुरुवातील अर्जून एक जॉब करत करत YouTube वर व्हिडिओ बनवायला चालू केले. त्यातून त्याला थोडेफार पैसे मिळू लागले. पण जेव्हा अर्जूनला त्याच्या पगाराइतके पैसे मिळायला लागले तेव्हा त्याने आपला पूर्ण वेळ YouTuber होण्याचा निर्णय घेतला.
पूर्ण वेळ YouTuber झाल्यानंतर अर्जून बक्कळ कमाई करू लागला. बघता बघता त्याने यातून आपल्या वडिलांचे 40 लाखांचे कर्ज फेडले. आता अर्जून महिन्याला लाखो रुपये कमाई करत आहे.
सध्या अर्जुनचे लंडनमध्ये स्वतःचे पेंटहाऊस आहे. त्याच्याकडे बीएमडब्ल्यू कारही आहे.
अर्जूनची गोष्ट ऐकूण आता तुमच्या मनात प्रश्न असेल की YouTube वरून कमाई करणे इतके सोपे आहे का? YouTube व्हिडिओंमधून पैसे सहज कमावता येतात का? स्वतःच जाणून घ्या...
YouTube व्हिडिओंमधून कमाईचा सर्वात मोठा स्त्रोत म्हणजे जाहिराती (YouTube Ads), याचा कन्टेन्ट क्रिएटरच्या कमाईचा मोठा वाटा असतो.
व्हिडिओमध्ये दिसणार्या जाहिरातींमधून कन्टेन्ट क्रिएटर आणि कंपनी दोघेही पैसे कमवतात. YouTube वरील कमाई सुरू होण्यासाठी काही अटी पूर्ण कराव्या लागतात. त्या पूर्ण झाल्यानंतर कमाई सुरू होते.
आजकाल यूट्यूब शॉर्ट्स ट्रेंडमध्ये आहेत. कंपनीने यावर्षी या संदर्भात विविध बोनस कार्यक्रमही जाहीर केले. चॅनलच्या कन्टेन्टनुसार आणि व्हिव्जनुसार क्रिएटरला पैसे मिळतात. कंपनीच्या नियम आणि अटींनुसार, क्रिएटर यातून 10 हजार डॉलर्सपर्यंत पैसे कमावू शकतो.
या पर्यायांव्यतिरिक्त, तुम्ही YouTube प्रीमियम सब्सक्रायबर आणि चॅनेल सब्सक्रायबरच्या मदतीने देखील कमाई करू शकता. सबस्क्रिप्शनमधून जी काही कमाई होते त्याचा सर्वाधिक फायदा कन्टेन्ट क्रिएटर्सना होतो.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.