YouTube|India Dainik Gomantak
अर्थविश्व

YouTube चे 'हे' 5 धमाकेदार फीचर्स खास तुमच्यासाठी! इंटरनेटशिवायही धडाधड चालणार शॉर्ट्स

Latest YouTube Features: गातील सर्वात मोठे व्हिडिओ प्लॅटफॉर्म असलेले YouTube यूजर्सचा अनुभव सुधारण्यासाठी वेळोवेळी नवीन फिचर्स आणत राहते.

Manish Jadhav

YouTube New Features 2025: जगातील सर्वात मोठे व्हिडिओ प्लॅटफॉर्म असलेले YouTube यूजर्सचा अनुभव सुधारण्यासाठी वेळोवेळी नवीन फिचर्स आणत राहते. अलीकडेच, YouTube ने प्रीमियम यूजर्ससाठी 5 नवीन फिचर्स सादर केले आहेत, ज्यामुळे केवळ मनोरंजनच सोपे होणार नाही तर तंत्रज्ञानाचा वापर करण्याचा एक चांगला अनुभव देखील मिळणार आहे. चला तर मग या फिचर्सबद्दल जाणून घेऊया...

हाय क्वालिटी साऊंड

YouTube ने प्रीमियम यूजर्ससाठी 256kbps बिटरेटवर ऑडिओ सपोर्टचे फिचर उपलब्ध करुन दिले आहे. यामुळे, संगीत आणि व्हिडिओंचे साउंड आउटपुट पूर्वीपेक्षा सुधारले आहे. हे फीचर आधीच यूट्यूब म्युझिकवर उपलब्ध होते, पण आता ते यूट्यूब व्हिडिओंवरही उपलब्ध करुन देण्यात आले आहे.

शॉर्ट्ससाठी PiP मोड

आता YouTube शॉर्ट्स “पिक्चर इन पिक्चर” मोडमध्ये पाहता येतील. हे फिचर्स तुम्हाला मल्टी-टास्किंगची सुविधा देते. उदाहरणार्थ, तुम्ही दुसऱ्या अॅपवर काम करताना शॉर्ट्सचा आनंद घेऊ शकता.

ऑफलाइन शॉर्ट्स

YouTube ने iOS यूजर्ससाठी ऑटोमॅटिक डाउनलोड फीचर उपलब्ध केले आहे. याद्वारे तुम्ही इंटरनेटशिवायही शॉर्ट्स पाहू शकता. हे फिचर विशेषतः त्यांच्यासाठी उपयुक्त आहे जे इंटरनेटच्या (Internet) कमतरतेमुळे कंटेंट पाहू शकत नाहीत.

आस्क फिचर

यूट्यूब म्युझिकमध्ये “आस्क म्युझिक” हे फीचर उपलब्ध करुन देण्यात आले आहे. या फिचर्सच्या मदतीने तुम्ही फक्त व्हॉइस कमांड वापरुन खास म्युझिक शोधू शकता.

Ask Chat फीचर

आयफोन यूजर्ससाठी "आस्क चॅट" (Ask Chat) बटण उपलब्ध करुन दिले आहे. त्याच्या मदतीने, तुम्ही व्हिडिओमध्ये दाखवलेल्या  कंटेंटशी संबंधित प्रश्न विचारु शकता. या नवीन फिचर्समुळे YouTube Premium अधिक आकर्षक आणि उपयुक्त बनले आहे. हाय क्वालिटीचा ऑडिओ, पीआयपी मोड आणि ऑफलाइन शॉर्ट्स यासारख्या फिचर्समुळे केवळ मनोरंजन सोपे होत नाही तर यूजर्संना एक चांगला तांत्रिक अनुभव देखील मिळतो. YouTube चे हे पाऊल ते इतर प्लॅटफॉर्मपेक्षा वेगळे आणि यूजर्स अनुकूल बनवते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Mega Project: कारापूर-सर्वण मेगा प्रकल्पावर 2 दिवसांत निर्णय, शिष्टमंडळाची मुख्यमंत्र्यांसोबत बैठक; अधिकाऱ्यांना कागदपत्रे तपासण्याच्या सूचना

Indian Cricketers Ban: भारतीय क्रिकेटमध्ये आतापर्यंतचा सर्वात मोठा फ्रॉड! अंडर-19 वर्ल्ड कप स्टार अडकला जाळ्यात; 65 खेळाडूंवर बंदी

Goa Accident: गोव्यात अपघातांची धडकी भरवणारी आकडेवारी! 19 महिन्यांत 1107 जणांचा मृत्यू; दिवसाला दोन जीवांचा बळी

Shukra Gochar 2026: वैभव अन् संपत्तीचा कारक बदलणार चाल! शुक्राचे नक्षत्र गोचर 5 राशींसाठी ठरणार वरदान; धनाचा होणार वर्षाव

Madgaon Urban Bank: मडगाव अर्बनच्या ठेवीदारांना पुन्हा धक्का; पैसे मिळण्याची निश्चित तारीखच नाही! 4.20 कोटींच्या वसुलीसाठी 154 खटले

SCROLL FOR NEXT