Bike Modification
Bike Modification Dainik Gomantak
अर्थविश्व

Bike Modification: हे नियम पाळले नाहीतर तुमची बाईक जप्त होऊ शकते

दैनिक गोमन्तक

Bike Modification: आपल्या गाडीमध्ये नवनवीन बदल करण्यासाठी आजची पिढी नेहमीच उत्सुक दिसून येते. त्याचबरोबर, इतरांपेक्षा आपली दुचाकी वेगळी दिसण्यासाठी बऱ्याचदा बदल केले जातात. परंतु बाईक मॉडीफिकेशन करण्यासाठी काही नियम आहेत. त्या नियमांचे पालन करणे आवश्यक आहे.

पहिल्यांदा हे जाणून घेऊयात तुम्ही तुमची बाईकमध्ये बदल करु शकता का? तर याचे उत्तर आहे तुमच्या दुचाकीमध्ये छोटे-मोठे बदल करु शकता.परंतु त्याआधी तुम्हाला क्षेत्रीय परिवहन कार्यालयातून परवानगी घ्यावी लागेल.

ऑटोमोटिव रिसर्च अॅथॉरिटी ऑफ इंडिया (ARAI) ने प्रमाणित केलेल्या आणि परवानगी दिलेल्या पार्टसचा बाइक मॉडीफिकेशनदरम्यान तुम्ही वापर करु शकता .

वाहनात बदल केल्यानंतर वाहनाच्या रचनेत बदल होतो त्यामुळे गाडीच्या मजबूतीवर परिणाम होतो. यामुळे स्वत: चालक आणि इतर लोकांना अपघाताला सामोरे जावे लागू शकते. त्यामुळे भारतात मोटार व्हेइकल अॅक्टनुसार बाइक मॉडीफिकेशन करण्यास मनाई आहे.

बाइक मॉडीफिकेशन करणे हे बेकायदेशीर आहे. म्हणून वाहनाच्या कोणत्याही भागात बदल करताना नियमांचे पालन करु केले पाहिजे असे सांगितले जाते नाहीतर मोठ्या कारवाईला सामोरे जावे लागण्याची शक्यता आहे.

Panaji News : विरोधकांनी स्वप्नेच पहावी! बाबूश मोन्सेरात

Congress News : काँग्रेसच्या दिग्गजांची पाठ; विराट सभांना फाटा

Panaji News : पणजीत पोर्तुगीजकालीन नाल्यांची सफाई

Goa Dam : पावसाळ्यापर्यंत राज्यात पाणीटंचाईची शक्यता नाही; धरणांमध्ये पुरेसा जलसाठा

Crime News : फोंड्यातील घटना डोक्यात दगड घालून मामाकडून भाच्याचा खून

SCROLL FOR NEXT