टाटा, महिंद्रा, जीपसह सर्व कारवर सवलती मिळत आहे. फेब्रुवारीमध्ये दहा कारवर 2.5 लाखांपर्यंत सूट मिळत आहे. ब्रँड आणि मॉडेलवर अवलंबून, या महिन्यात सूट 1 लाख ते 2.5 लाख रुपयांपर्यंत आहे.
कंपनीच्या वेबसाइटनुसार, Jeep Meridian SUV ची किंमत 27.75 लाख रुपयांपासून सुरू होते. फेब्रुवारी महिन्यात जीप कंपास फक्त 20.99 लाख रुपयांमध्ये खरेदी करता येईल. दिल्लीतील काही डीलर्स जीप मेरिडियन एसयूव्हीवर 2.5 लाख रुपये आणि जीप कंपासवर 1.7 लाख रुपयांची सूट देत आहेत. जीप मेरिडियन एसयूव्ही देशातील टोयोटा फॉर्च्युनर, स्कोडा कोडियाक आणि फॉक्सवॅगन टिगुआन यांना टक्कर देते.
दिल्ली NCR मधील काही डीलर्स ग्राहकांना Tata Safari SUV च्या खरेदीवर रु. 1.25 लाखांपर्यंत सूट देत आहेत. अलीकडेच, टाटा मोटर्सने आपल्या नेक्सॉन, हॅरियर आणि सफारी मॉडेलच्या कारचे रेड डार्क संस्करण नवीन वैशिष्ट्यांसह लॉन्च केले आहे. कंपनीने या वाहनांच्या स्पेशल एडिशनमध्ये मोठ्या आकाराची टचस्क्रीन सिस्टीम आणि ADAS फीचर देखील दिले आहे.
या दहा कारवर मिळत आहे सवलत
जीप मेरेडियन (2.5 लाख), जीप कम्पास (1.7 लाख), टाटा सफारी (1.25 लाख), स्कॉडा कुशक (1.25 लाख), टाटा हॅरिएर (1.2 लाख), ह्युदाई अल्काझर (1.2 लाख), किया सेलटॉस (1.07 लाख), महिंद्रा थार (1 लाख), होंडा सिटी (70 हजार- 1 लाख) , ह्युदाई वेर्णा (1 लाख)
महिंद्रा थार एसयूव्हीची एक्स-शोरूम किंमत 9.9 लाख रुपये आहे. कंपनीची कार रियर व्हील ड्राइव्ह आणि फोर व्हील ड्राइव्ह अशा दोन्ही प्रकारात उपलब्ध आहे. या महिन्यात पेट्रोल इंजिनसह सुसज्ज Mahindra Thar (Thar Petrol AT 4WD) खरेदी करून मोठी बचत केली जाऊ शकते. कंपनीने ऑफर केलेल्या सवलतीच्या फायद्यांमध्ये रोख सवलत, कॉर्पोरेट सूट आणि अॅक्सेसरीज पॅकेजचा समावेश आहे.
ग्राहकांना थारच्या खरेदीवर 60,000 रुपयांची सूट मिळू शकते. तर Hyundai Verna, Honda City आणि Kia Seltos या वर्षी अपडेटसह बाजारात लॉन्च केले जाऊ शकतात. कंपनी 2022 मॉडेलची ही वाहने सवलतीसह विकत आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.