CM Sukhvinder Singh Sukhu Dainik Gomantak
अर्थविश्व

Old Pension Scheme बाबत मोठी बातमी, लगेच निवडा OPS चा पर्याय; सरकारने जारी केली अधिसूचना!

Old Pension Scheme: जुन्या पेन्शन योजनेबाबत मोठी बातमी समोर येत आहे. सध्या देशातील अनेक राज्यांमध्ये जुनी पेन्शन (OPS News) बाबत वाद सुरु आहे.

Manish Jadhav

Old Pension Scheme: जुन्या पेन्शन योजनेबाबत मोठी बातमी समोर येत आहे. सध्या देशातील अनेक राज्यांमध्ये जुनी पेन्शन (OPS News) बाबत वाद सुरु आहे.

आता तुम्हालाही जुन्या पेन्शनचा लाभ घ्यायचा असेल, तर तुमच्यासाठी उत्तम संधी आहे. तुम्हाला नवीन पेन्शन योजनेत समाविष्ट व्हायचे आहे की, OPS मध्येच राहायचे आहे हे येत्या 60 दिवसांत ठरवावे लागेल. यासंदर्भात सरकारने एसओपीही जारी केली आहे.

60 दिवसांत पर्याय निवडावा लागेल

सरकारने कर्मचाऱ्यांना 60 दिवसांच्या आत पेन्शनचा पर्याय निवडण्यास सांगितले आहे. राज्य सरकार, हिमाचल प्रदेशच्या (Himachal Pradesh) लाभार्थ्यांना ही सुविधा मिळत आहे.

राज्यातील कर्मचाऱ्यांना 1 एप्रिल 2023 पासून जुन्या पेन्शन योजनेचा लाभ मिळणार आहे. यासोबतच जर कोणी अगोदर सेवानिवृत्त झाले असेल तर त्यांना जुनी रक्कम थकबाकीच्या स्वरुपात मिळणार नाही.

शासनाने आदेश जारी केला

दीर्घ प्रतीक्षेनंतर, हिमाचल सरकारच्या वित्त विभागाने OPS लागू करण्यासाठी मानक ऑपरेटिंग प्रक्रिया (SOP) जारी केली आहे. राज्याच्या मुख्य सचिवांनी यासंदर्भात आदेश जारी केला आहे.

तुम्ही निवड न केल्यास तुम्हाला NPS चा लाभ मिळेल

जर कोणत्याही कर्मचार्‍याने (Employees) निर्धारित कालमर्यादेनुसार पेन्शनचा पर्याय निवडला नाही, तर त्या लोकांना फक्त NPS मध्ये ठेवले जाईल.

यासोबतच OPS मध्ये समाविष्ट होणारे सर्व कर्मचारी देखील सामान्य भविष्य निर्वाह निधी केंद्रीय सेवा नियम 1960 अंतर्गत समाविष्ट केले जातील.

दुसरीकडे, जर एखाद्या कर्मचाऱ्याने NPS निवडले तर त्याला 1 एप्रिल रोजी NPS चा हिस्सा देखील जमा करावा लागेल.

जुन्या पेन्शन योजनेचे काय फायदे आहेत?

जुन्या पेन्शन योजनेच्या फायद्यांबद्दल बोलायचे झाल्यास, त्याचा सर्वात मोठा फायदा म्हणजे शेवटच्या काढलेल्या पगाराच्या आधारे केले जाते. याशिवाय महागाईचा दर वाढला की डीएही वाढतो. सरकार जेव्हा नवीन वेतन आयोग लागू करते तेव्हाही पेन्शन वाढवते.

OPS आधीच अनेक राज्यांमध्ये लागू करण्यात आली आहे

जुनी पेन्शन योजना लागू करणाऱ्या राज्यांमध्ये राजस्थान पहिल्या क्रमांकावर आहे. यानंतर पंजाब, छत्तीसगड, झारखंड आणि हिमाचल प्रदेश सरकारनेही जुनी पेन्शन योजना बहाल केली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

डिचोली तालुक्यात झेंडूचे मळे केशरी-पिवळ्या फुलांनी बहरले, कृषी खात्याच्या ‘आत्मा’ योजनेला मोठे यश; शेतकऱ्यांच्या मेहनतीला दसऱ्याचे फळ

Asian Para Games 2026: आशियाई पॅरा गेम्समध्ये भारतीय खेळाडूंची धमाकेदार सुरुवात! 10 मीटर एअर रायफलमध्ये मोना अग्रवालला 'गोल्ड', तर अवनी लेखराला 'सिल्व्हर'

Goa Mining: 'गाव नष्ट होऊ देणार नाही!' होंडा ग्रामसभेत 'सोलये' खाणीचा प्रश्न ऐरणीवर; एनओसी रोखण्यासाठी शेतकऱ्यांचा एल्गार

Goa Sexual Assault Case: वेर्णा सामूहिक बलात्कार प्रकरणातील सहआरोपीला सशर्त जामीन मंजूर; दक्षिण गोवा जिल्हा सत्र न्यायालयाचा निकाल!

Property Dispute Attack: आंबावलीत मालमत्तेच्या वादातून तुफान हाणामारी! लाकडी दांड्याने हल्ला करुन वृद्धाला केले गंभीर जखमी; चौघांविरुद्ध खुनाचा गुन्हा

SCROLL FOR NEXT