You can get your PAN card made in a few minutes Dainik Gomantak
अर्थविश्व

आता घर बसल्या मिळवा पॅन कार्ड, जाणून घ्या ऑनलाईन प्रोसेस

आजच्या काळात महत्वाच्या कागदपत्रांमध्ये पॅन कार्डचा (Pan Card) समावेश करण्यात आला आहे. पॅनशिवाय एखाद्याला अनेक शासकीय कामे, आर्थिक व्यवहारात अडचणींना सामोरे जावे लागते.

दैनिक गोमन्तक

आजच्या काळात महत्वाच्या कागदपत्रांमध्ये पॅन कार्डचा (Pan Card) समावेश करण्यात आला आहे. पॅनशिवाय एखाद्याला अनेक शासकीय कामे, आर्थिक व्यवहारात अडचणींना सामोरे जावे लागते. अनावश्यक त्रास टाळण्यासाठी, आपण शक्य तितक्या लवकर पॅन कार्ड बनवावे. जर तुम्ही पॅनकार्ड बनवण्यासाठी सरकारी कार्यालयात जाण्यास तयार नसाल, तर तुम्ही घरी बसून ते ऑनलाइन करू शकता. पॅनची पडताळणी (Verification) देखील ऑनलाइन केली जाईल. तुम्ही पॅन कार्ड ऑनलाईन करण्याची प्रक्रिया काही मिनिटांत पूर्ण करू शकता.

ऑनलाईन पॅन कार्ड बनवण्याची प्रक्रिया

  • सर्वप्रथम आयकर विभागाच्या वेबसाइट www.incometax.gov.in वर जा. यामध्ये, आधारद्वारे इन्स्टंट पॅनच्या पर्यायावर क्लिक करा.

  • यानंतर, Get New PAN आणि Check Status/Download PAN असे दोन पर्याय दिसेल. यापैकी तुम्हाला नGet New PAN वर क्लिक करावे लागेल.

  • त्यानंतर एक नवीन पान उघडेल. त्यात तुमचा आधार क्रमांक टाका आणि कॅप्चा कोड टाका.

  • यानंतर तुमच्या आधार कार्डशी जोडलेल्या मोबाईल क्रमांकावर एक ओटीपी येईल. हा ओटीपी एंटर करा आणि नंतर तुमचा ई-मेल आयडी टाका. यानंतर, पॅन कार्डसाठी आवश्यक माहिती प्रविष्ट करा.

  • यानंतर तुम्हाला तुमचा पॅन नंबर काही मिनिटांत मिळेल आणि तुम्ही ते पीडीएफ स्वरूपात डाउनलोड करू शकता.

  • यासाठी तुम्हाला या वेबसाइटवर Check Status/Download PAN वर क्लिक करावे लागेल आणि त्यानंतर तुम्ही पीडीएफ मध्ये पॅन कार्ड डाउनलोड करू शकाल. जर तुम्हाला पॅन कार्डची हार्ड कॉपी हवी असेल तर तुम्ही ते 50 रुपये देऊन मिळवू शकता.

ज्यांच्याकडे आधार क्रमांक (Aadhaar card) आहे ते ई-पॅनसाठी अर्ज करू शकतात. यानंतर तुम्हाला लगेच पॅन नंबर मिळेल. ई-पॅनसाठी, एखाद्याने फक्त आधार बेस्ड केवायसी प्रक्रिया पूर्ण करणे आवश्यक आहे आणि त्यानंतर लगेच पीएनएफ स्वरूपात पॅन जारी केले जाते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News Live: 54 जुन्या कदंब बस भंगारात; नव्या EV बसेस घेणार जागा

Operation Sindoor: 'भारत पाकिस्तानसोबत चीनशीही लढत होता...' ऑपरेशन सिंदूरबाबत भारतीय उप सेनाप्रमुखांचे मोठे वक्तव्य

BJP: इतिहासात पहिल्यांदाच भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची सूत्रे महिलेकडे जाणार? RSS चा ग्रीन सिग्नल; 'ही' तीन नावे चर्चेत

Goa Athletics: गोव्यात रंगणार 'मनोहर पर्रीकर स्मृती ॲथलेटिक्स स्पर्धा'; तारखा, ठिकाण जाणून घ्या..

Pakistani Team: 'पाकिस्तान' टीम खेळणार भारतात! क्रीडा मंत्रालयाकडून ग्रीन सिग्नल; 2 करंडकांमध्ये घेणार भाग

SCROLL FOR NEXT