RBI to withdraw Rs 2000 currency note from circulation Dainik Gomantak
अर्थविश्व

2000 Rupees Note: दिलासा देणारी बातमी, बँकेत न जाताही बदलता येणार 2000 रुपयांची नोट; जाणून घ्या पटकन

2000 Rupees Note Update: केंद्र सरकारने 2000 रुपयांच्या नोटा चलनातून बाद केल्यानंतर आता लोकांना पुन्हा एकदा लांबच लांब रांगेत उभे राहण्याची चिंता सतावत आहे.

Manish Jadhav

2000 Rupees Note Update: केंद्र सरकारने 2000 रुपयांच्या नोटा चलनातून बाद केल्यानंतर आता लोकांना पुन्हा एकदा लांबच लांब रांगेत उभे राहण्याची चिंता सतावत आहे.

दुसरीकडे मात्र, बँकेने माहिती देताना सांगितले आहे की, ज्यांच्याकडे 2000 रुपयांच्या नोटा आहेत, ते 23 मे पासून ते बदलून घेऊ शकतात. तुम्ही 2000 रुपयांच्या फक्त 10 नोटा एकाच वेळी बदलू शकता.

बॅंकेशिवाय अन्य ठिकाणीही तुम्ही नोटा बदलून घेऊ शकता. बँकेव्यतिरिक्त, तुम्ही बिझनेस करस्पॉन्डंट सेंटरवर नोटा बदलून घेऊ शकता.

करस्पॉन्डंटकडून नोट बदलता येईल

माहिती देताना आरबीआयने (RBI) म्हटले की, ग्रामीण आणि शहरी भागात राहणारे लोक बिझनेस करस्पॉन्डंट सेंटरवर जाऊन नोटा बदलून घेऊ शकतात. 2006 मध्ये, RBI ने बिझनेस करस्पॉन्डंट्सना मान्यता दिली, जे नॉन-बँकिंग मध्यस्थांप्रमाणे काम करतात.

खेडोपाडी आणि शहरांमध्ये बँकेसारखे काम करते

RBI ने हा निर्णय देशभरात आर्थिक सेवांची व्याप्ती वाढवण्यासाठी घेतला होता, जेणेकरुन खेड्यात राहणाऱ्या लोकांनाही सर्व सुविधा मिळाव्यात.

हे बिझनेस करस्पॉन्डंट शहरे आणि खेड्यांमध्ये बँकांसारखे काम करतात. याशिवाय, हे लोक गावात राहणाऱ्या लोकांना बँक खाती उघडण्यासाठी मदत करतात.

तुम्ही बँकेत न जाता नोटा बदलू शकता

तुम्हीही गावात राहत असाल तर तुम्हाला बँकेत न जाताही 2000 रुपयांची नोट बदलून मिळू शकते. आरबीआयने सांगितले की, बँक (Bank) खातेदार बिझनेस करस्पॉन्डंट सेंटरला भेट देऊन 2000 रुपयांच्या 2 नोटा म्हणजेच 4000 रुपयांपर्यंतच्या नोटा बदलू शकतात.

सेंट्रल बँकेने ही माहिती दिली

तसेच, 2,000 रुपयांच्या नोटा बदलण्याची सुविधा आरबीआयच्या 19 क्षेत्रीय कार्यालयांमध्ये दिली जाणार आहे. लोक 23 मे ते 30 सप्टेंबर पर्यंत कोणत्याही बँकेच्या शाखेत जाऊन नोटा बदलू शकतात.

RBI च्या 19 प्रादेशिक कार्यालयांना देखील 2,000 रुपयांच्या नोटा बदलून देण्याची सुविधा दिली जाणार आहे. RBI ची देशभरात 31 ठिकाणी प्रादेशिक कार्यालये आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Medical College: गोमेकॉत नाकातून मेंदूची शस्त्रक्रिया लवकरच सुरु होणार; गोमंतकीय रुग्णांना मिळणार मोफत उपचार!

Maharashtra Election: निवडणूक बंदोबस्तातील गोवा पोलिसाचं मुंबई 'पर्यटन'; फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये उतरला...

Goa News: 'कॅश फॉर जॉब'; त्यांनी "क्लीन चीट" शब्द कुठेच वापरला नाही, मुख्यमंत्री स्पष्टच बोलले! वाचा दिवसभरातील ठळक घडामोडी

भाजपने IFFI आंतरराष्ट्रीय फ्रॉड फेस्टिव्हल केलाय, गोवन फिल्म विभागावरुन काँग्रेसने सरकारला विचारला मोठा सवाल

Goa Crime: गोव्यात आंतरराष्ट्रीय मानवी तस्करी रॅकेटचा भांडाफोड; ओमानमध्ये नोकरीचे आमिष देऊन महिलांना फसवलं, 2 अटक

SCROLL FOR NEXT