<div class="paragraphs"><p>Worlds Richest Person Elon Musk</p></div>

Worlds Richest Person Elon Musk

 

Dainik Gomantak

अर्थविश्व

जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तीच्या संपत्ती घट

दैनिक गोमन्तक

जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती आणि टेस्ला आणि स्पेसएक्स कंपनीचे मालक एलन मस्क (Elon musk wealth) यांची संपत्ती नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी 304 अब्जांवर पोहोचली आहे. परंतु गेल्या तीन दिवसांत टेस्लाच्या शेअर्समध्ये झालेल्या घसरणीमुळे त्यांचे मोठे नुकसान झाले आणि एका झटक्यात मस्कची संपत्ती 30 अब्जांनी कमी झाली.

271 अब्ज डॉलर्सची संपत्ती उरली

नवीन वर्षाची सुरुवात एलोन मस्कसाठी चांगली होती. जानेवारीच्या पहिल्या ट्रेडिंग दिवशी, टेस्लाचे शेअर्स रॉकेट वेगाने वाढले आणि लवकरच मस्कची संपत्ती पुन्हा 300 अब्जच्या पुढे गेली. मात्र, लवकरच हा आकडा खाली घसरला. म्हणजेच जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तीने (worlds richest person elon musk) सुमारे 30 अब्ज कमावले आणि गमावले. टेक्सास-आधारित टेस्ला कंपनीचे सीईओ एलन मस्क(elon musk) आता अंदाजे $271.5 अब्जांचे मालक आहेत.

बुधवारी टेस्लाचे

शेअर्स सर्वाधिक घसरले, सोमवारी टेस्लाचे शेअर 13.5 टक्क्यांनी वाढले, त्यामुळे मस्कची संपत्ती वाढली, पण त्यानंतर मंगळवार ते गुरुवार या कालावधीत त्याचे शेअर्स घसरत राहिले. दरम्यान, बुधवारी सर्वात मोठी घसरण झाली, जेव्हा एलन मस्कच्या संपत्तीत एकाच दिवसात सुमारे 14 अब्ज डॉलरची घट झाली तेव्हा टेस्लाचे स्टॉक बुधवारी 5 टक्क्यांहून खाली घसरले. मात्र या घसरणीनंतरही कंपनीचे बाजार भांडवल 1.08 ट्रिलियनचे आहे. जे एक वर्षापूर्वीच्या तुलनेत 44 टक्के अधिक आहे.

वर्षाच्या पहिल्या दिवशी 1.41 अब्ज कमावले

विशेष म्हणजे, वर्षाच्या पहिल्या ट्रेडिंग दिवशी मस्कच्या संपत्तीत जोरदार वाढ झाली होती.मस्कने प्रति तासात 1.41 अब्ज डॉलर्सची कमाई केली होती. यामुळे, मस्कची एकूण संपत्ती एका दिवसात $33.8 अब्ज म्हणजे 2,51,715 कोटी रुपयांनी वाढली. मस्कची हीच संपत्ती आता 271.5 अब्ज डॉलरवर आली आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa 11th Admission: अवाजवी शुल्क आकारल्यास तात्काळ कारवाई; CM सावंत यांचा विद्यालयांना इशारा

Yellow Alert In Goa: गोव्यात यलो अलर्ट, पुढील दोन दिवस महत्वाचे

Goa Drugs Case: इवल्याशा गोव्यात ड्रग्जचा सुळसुळाट; 3.8 कोटींचे अमली पदार्थ जप्त

Goa Crime News: समाज कल्याण खात्याचे मंत्री फळदेसाईंना धमकी, 20 कोटी खंडणीची मागणी; संशयिताला जामीन

पेरु देशाचा मोठा निर्णय! ट्रान्स लोकांना केले 'मानसिक रुग्ण' घोषित; सरकार देणार मोफत उपचार

SCROLL FOR NEXT