Epfo Dainik Gomantak
अर्थविश्व

EPF Withdrawal: कोरोना इमर्जन्सीमध्ये पीएफ खात्यातून पैसे काढायचे? जाणून घ्या ऑनलाइन प्रक्रिया

कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने (EPFO) कोविड-19 च्या दुसऱ्या लाटेदरम्यान, आपल्या सदस्यांना दुसरा नॉन-रिफंडेबल COVID-19 अॅडव्हान्स मिळवण्याची परवानगी दिली आहे.

दैनिक गोमन्तक

कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने (EPFO) कोविड-19 च्या दुसऱ्या लाटेदरम्यान, आपल्या सदस्यांना दुसरा नॉन-रिफंडेबल COVID-19 अॅडव्हान्स मिळवण्याची परवानगी दिली आहे. ज्या सदस्यांनी यापूर्वी COVID-19 (Covid 19) अॅडव्हान्सचा लाभ घेतला आहे ते आता दुसऱ्या अॅडव्हान्सचा देखील फायदा घेऊ शकतात. दुसऱ्या कोविड-19 चा लाभ घेण्याची प्रक्रिया ही पहिल्या प्रमाणेच आहे.

या तरतुदीनुसार, तीन महिन्यांसाठी मूळ वेतन आणि महागाई भत्त्याच्या मर्यादेपर्यंत किंवा EPF खात्यात (Epfo)सदस्याच्या जमा झालेल्या रकमेच्या 75% पर्यंत, जे कमी असेल ते नॉन-रिफंडेबल पैसे काढण्याची तरतूद आहे. मात्र, सदस्याला तेवढीच रक्कम काढावी लागेल, असे नाही तर सदस्य कमी रकमेसाठी सुध्दा अर्ज करू शकतो. मात्र पुढील अॅडव्हान्स ला परवानगी दिली जाणार नाही.

पैसे काढण्यासाठी ऑनलाइन अर्ज कसा करावा?

- https://unifiedportal-mem.epfindia.gov.in/memberinterface/ वर जा

- तुमचा UAN, पासवर्ड आणि कॅप्चा कोड टाकून तुमच्या खात्यात लॉग इन करा.

- ऑनलाइन सेवांवर जा आणि दावा निवडा (फॉर्म-31, 19, 10C आणि 10D)

- नाव, जन्मतारीख आणि तुमच्या आधार क्रमांकाचे शेवटचे चार अंक यासारख्या तपशीलांसह एक नवीन वेबपेज उघडेल.

- वेबपृष्ठ तुम्हाला तुमचा बँक खाते क्रमांक Verify करण्यास सांगेल.

- तुमच्या स्क्रीनवर एक पॉप-अप दिसेल, जो तुम्हाला 'सर्टिफिकेट ऑफ अंडरटेकिंग' प्रदान करण्यास सांगेल.

- बँक खाते क्रमांक सत्यापित झाल्यानंतर, 'ऑनलाइन दावा करण्यासाठी पुढे जा' वर क्लिक करा.

- ड्रॉप डाउन मेनूमधून, तुम्हाला 'पीएफ अॅडव्हान्स (फॉर्म 31)' निवडावे लागेल.

- बाहेर काढण्याचा उद्देश विचारला जाईल, येथे 'साथीचा उद्रेक (COVID-19)' निवडा.

- आवश्यक रक्कम प्रविष्ट करा आणि चेकची स्कॅन केलेली प्रत अपलोड करा आणि तुमचा पत्ता प्रविष्ट करा.

- आधार नोंदणीकृत तुमच्या मोबाईल क्रमांकावर वन टाइम पासवर्ड (OTP) पाठवला जाईल.

- तुम्हाला एसएमएसद्वारे ओटीपी मिळेल, तो प्रविष्ट करा.

अश्याप्रकारे संबंधित प्रक्रिया पुर्ण होणार आणि आवश्यक ते मदत मिळेल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Asia Cup 2025: IND vs PAK मॅच होणार नाही! आशिया कपमधून पाकिस्तान 'आऊट', आता 'या' देशाच्या संघाला मिळणार संधी

Viral Video: लहान मुलांना वाचविण्यासाठी जर्मन शेफर्डने बाल्कनीतून घेतली उडी; पाहा व्हिडिओ

Budget Friendly India Tour: दिल्ली, गोवा, जयपूर...14 दिवसांत भारत दर्शन; कसा कराल बजेटफ्रेन्डली प्रवास? वाचा प्लॅन

Viral Video: "असले मित्र नको रे बाबा!" धोकादायक मस्करीचा व्हिडिओ व्हायरल; त्याची 'ही' अवस्था पाहून नेटकरी संतप्त

Operation Sindoor: पाकिस्तानच्या ‘पळपुट्या' नौदलाची पोलखोल! ‘ऑपरेशन सिंदूर’दरम्यान नौका ग्वादर बंदरात लपवल्या; सॅटेलाईट फोटोंमधून खुलासा

SCROLL FOR NEXT