Adani buy sugar company News Dainik Gomantak
अर्थविश्व

Adani 'ही' साखर कंपनी विकत घेणार? गुंतवणूकदारांसाठी मोठी संधी

गेल्या दोन दिवसांपासून रेणुका शुगरच्या समभागात जोरदार उसळी पाहायला मिळत आहे.

दैनिक गोमन्तक

गेल्या दोन दिवसांपासून रेणुका शुगरच्या समभागात जोरदार उसळी पाहायला मिळत आहे. गुरुवारी कंपनीचे समभाग वरच्या वळणावर दिसून आले होते. बाजार बंद होईपर्यंत रेणुका शुगरच्या (Sugar) एका शेअरची किंमत 49.50 रुपयांपर्यंत पोहोचले आहे. गेल्या दोन दिवसांतील उसळीमुळे कंपनीच्या शेअरने गेल्या एका आठवड्यात 35% पेक्षा जास्त परतावा दिला. म्हणजेच अवघ्या एका आठवड्यात गुंतवणूकदार श्रीमंत झाले आहेत. (Will Adani buy sugar company Great opportunity for investors)

शेअर बाजाराशी संबंधित जाणकारांच्या मते, रेणुका शुगरचे शेअर्स वधारण्याचे कारण म्हणजे एक बातमी आहे. भविष्यात अदानी समूह ही कंपनी विकत घेऊ शकते, अशी जोरदार चर्चा रंगत आहे. त्याचवेळी, इथेनॉलला प्रोत्साहन देणे हे देखील सरकारकडून स्टॉक तेजीचे मोठे कारण असल्याचे सांगितले जात आहे. या संपूर्ण डीलबाबत कंपनीकडून कोणतेही अधिकृत वक्तव्य देण्यात आलेले नाहीत, आणि असे असतानाही दरात रोजच भाव वाढत आहेत.

रेणुका शुगरच्या शेअर्सच्या वाढीबद्दल, प्रॉफिटमार्ट सिक्युरिटीजचे संशोधन प्रमुख अविनाश म्हणतात की, “कंपनीच्या शेअर्सच्या वाढीचे कारण अनूमान आहे. कंपनीने याबाबत कोणतीही माहिती दिलेली नाहीये. कंपनीच्या मूल्यांकनावर नजर टाकली तर, अदानी समूहाच्या ताब्यात गेल्यानंतरही गेल्या दोन दिवसांतील उडी जरा जास्त आहे. अशा स्थितीत माझा सल्ला आहे की गुंतवणूकदारांनी इतर साखर कंपन्यांच्या शेअर्समध्ये जागा न घेता त्यावर लक्ष केंद्रित करायला हवे.

SMC ग्लोबल सिक्युरिटीजचे संशोधन क्षेत्राचे उपाध्यक्ष सौरभ जैन म्हणतात की, “भारत सरकारच्या इथेनॉल धोरणामुळे साखर क्षेत्रात दीर्घकालीन गुंतवणूक करता येणार आहे. पण बलरामपूर चिनी, धामपूर शुगर आणि त्रिवेणी इंजिनिअरिंग सारखे शेअर्स देखील तुम्हाला खरेदी करता येतील.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Diwali Bonus for Central Govt Employees: केंद्रीय कर्मचाऱ्यांना दिवाळीची मोठी भेट! मोदी सरकारकडून बोनस जाहीर; खात्यात येणार 'इतके' पैसे

Crime News: आधी प्रेमसंबंध, नंतर हत्येचा कट! पत्नीने पतीच्या मदतीने प्रियकराचा गळा आवळला; मृतदेह गोणीत भरून कालव्यात फेकला

Triple Talaq Case: लग्नानंतर 21 वर्षे संसार, 3 मुलं आणि आता...! बायकोला ट्रिपल तलाक देणाऱ्या नवऱ्याला कोर्टाचा दणका; सुनावली 'इतक्या' वर्षांची शिक्षा अन् दंड

VIDEO: 'सर्वात मोठे ओठ' बनवण्याचा अट्टहास! डॉक्टरांनी नकार दिल्यावर महिलेने घरीच घेतलं इंजेक्शन; पुढे नको तेच झालं, पाहा व्हिडिओ

Bulbul Film Festival: बुलबुल बालचित्रपट महोत्सवाची सांगता; 'द ग्रेट ग्रॅंड सुपर हिरो'चे प्रदर्शन, सर्वोत्तम चित्रपटाची घोषणा

SCROLL FOR NEXT